बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

चार आर्यसत्य

बुद्ध धम्माचा मुळ पाया कोणता? याचे उत्तरभिधम्मपिटकातील दुसरा ग्रंथ विभंग त्याच्या चौथ्या भागात अर्थात सच्च विभंग नावाच्या ग्रंथात मिळते.


सच्च विभंगातील प्रथम सुतंत भाजनियात सुतंताच्या भाषेत चार आर्यसत्याची प्रस्तावना करुन म्हटले आहे.

चत्तरिआरियसच्चानि

१. दुःख अरियसच्चं
२. दुःख समुदयं अरियसच्चं
३. दुःख निरोध अरियसच्चं
४. दुःख निरोधगामिनि पटिपदा अरियसच्चं



१. पहिले आर्यस्त्य - दुःख



दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म वृद्धत्व, आजार, मृत्यु, क्लेष आणि सर्वप्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तुची प्राप्ती तथा आवश्यक वस्तुची अप्राप्ती म्हणजे दुःख होय. हे प्रश्न इच्छा नसणारे प्रश्न आहेत. लोक हे प्रश्न टाळण्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्न करतात व त्यापासुन मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. हे आर्यसत्य समस्यांशी निगडीत आहे. हे आर्यसत्य प्रतीपादन करुन.समस्याविषयक परिस्थीती व तिचे आकलन विषयी मदत करते. ह्या करीता प्रथन आत्मपरिक्षण आवश्यक आहे. आत्मपरिक्षणा शिवा हे सत्य पुर्ण होत नाही. काळजीपुर्वक निरिक्षणावरुन स्पष्ट होते की जीवन हे अस्थिर आहे.



२. दुसरे आर्यसत्य - दुःखाचे मुळ



बुद्धाने दुःखाच्या उगमस्थानाविषयी सांगितलेले आहे की, प्रत्येक दुःखाच्या मुळा शी उत्कट इच्छा (तृष्णा) असते. त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरीता, अस्तित्वाकरीता किंवा आत्मनाशाकरीता असु शकते.


आपली तीव्र इच्छा हिच मुळ दुःखाचे कारण होय. उदा. राहुलला मोटारकार हवी आहे, तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, १५, १६ तास अविश्रांत काम करतो. पैसा मिळवितो. श्रम पडल्यामुळे आजारी पडतो, त्याला दुःख होते. यावरुन तीव्र इच्छा ही मुळ दुःखाचे कारण आहे. सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानुन जीवन प्रवाह चालु ठेवावा. म्हणजे गरीबांनी गरीबच राहावे असे नाही, तर मध्यम मार्गाचा अवलंब करावा...



३. तिसरे आर्यसत्य - दुःख निररोध



बुद्ध धम्माचा मुळ उद्देश आहे तो दुःख निरोध. लोभ द्वेष व भ्रम यांचा शेवट करणे हा मुळ हेतु आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे, तो आचसणात आणला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याशिवाय तृष्णा क्षीण होत नाही.



४. चौथे आर्यसत्य - दुःख निरोधासाठी मार्ग शोधणे



बुद्धधम्म जीवनाचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे निती होय आणि नितीचा विकास म्हणजे दुःख निरोधन होय. केवळ नितीच आपल्याला निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचवु शकते. आर्य सांगतात कि जगात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचे निरोध केला पाहिजे आणि दुःखाच्या निरोधासाठी मार्ग आहे, त्यालाच धम्म शिकवणुकीप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्यात आठ घटकांचा समावेआहे. त्यालाच मध्यममार्ग सुद्धा म्हणतात. ते पुढीलप्रमाणे :


१. सम्यक दृष्टी
२. सम्यक संकल्प
३. सम्यक वाचा
४. सम्यक कर्मांत
५. सम्यक आजीविका
६. सम्यक व्यायाम
७. सम्यक स्मृती
८. सम्यक समाधी



थोडक्यात कोणत्याही प्रश्नांची उकल करण्यासाठी शीलाचे पालन करणे आवश्यक आहे. (आत्मसंयम तथा नीती), समाधी (मनसंयम) व प्रज्ञा आवश्यक आहेत. म्हणुन प्रज्ञा, शील, करुणा ह्या तीन बाबीला धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. ह्या तीन बाबींवर आर्य अष्टांगिक मार्ग आधारित आहे.



काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा ह्या दुःखाच्या मुळाशी असतात. त्यांच्याविषयी प्रत्येकाला जाणीव असावी. तृष्णेवर प्रभुत्व प्राप्त करणे म्हणजे तो जीवनातील सर्वात मोठा विजय होय

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी


५.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा