शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

प्रतिक्रियांना प्रत्युत्तर... (भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक)

काही दिवसांपुर्वी मी माझा (भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक ) या नावाने लेख लिहिला होता, तो सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन वाचु शकता...



हा लेख प्रकाशीत होताच समाजातील विविध स्तरांवरुन विविध प्रकारच्या प्रतिक्रीया यायला लागल्या. आपल्या देशातील विविधतेप्रमाणे सर्वांच्या प्रतिक्रियांमध्ये विविधता होती, परंतु एकता कुठेच दिसत नव्हती, हा लेख वाचुन काही बुद्धद्वेष्ट्यांनी माती खाल्लीच, तर काहींनी भाषाशुद्धीकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा पराक्रम केला. या सर्वांना प्रतिउत्तर देण्याएवढी यांची लायकी तर नाही आहे, परंतु बुद्धांबद्दल कोणाच्या मनात किंचितही संभ्रम असेल तर तो दुर व्हायला हवा असे मी माझे कर्तव्य मानुन हा लेख लिहित आहे.



सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे कि प्रस्तुत लेख हा भगवान बुद्धांचे गुण दर्शविणारा आहे. त्याच्यामध्ये गणपतीच्या आरतीसारखी कोणाची काल्पनीक थोरवी सांगीतलेली नाही, तर सम्यक संबुद्धाचे गुण सांगीतलेले आहेत.


हा सम्यक संबुद्ध म्हणजे कोण.,? सिद्धार्थ गौतम का.? नाही.. सम्यक संबुद्ध हे एक पद आहे याचा अर्थ होतो संपुर्ण जागृत असा. ह्या विश्वाचे सत्य जाणणारा. तो कोणी ईश्वर नव्हे, त्याचा अवतार किंवा दुतही नव्हे. तर सम्यक संबुद्ध हे एक पद आहे, ते आपल्यासारखा कोणताही मनुष्य भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेल्या धम्ममार्गावर चालुन प्राप्त करु शकतो... आणि ते प्राप्त करण्यापुर्वी जे गुण कोणत्याही मानवामध्ये येण्याची गरज आहे. ते गुण मी मागील लेखामध्ये सांगीतले आहेत. त्याचा मुख्य अर्थ लक्षात न घेता कोणीही वेड्यांप्रमाणे संदर्भहीन टीका का करावी..? कदाचित टिकाकार वेडे तर नसतील ना..? नाही ते वेडे तर मुळीच नाहीत. परंतु त्यांच्या मनात भगवान बुद्धांच्या प्रती असलेल्या धर्मद्वेषामुळे ते मनुष्य लोक सोडुन असुर लोकांत वास करत आहेत. (असुर म्हणजे क्रोधी व भांडखोर जीव, आता असुरांच्या गुणांवर लेख लिहिण्याची गरज पडु नये, नाहीतर असुर गुण लिहिल्यावर तो तुम्हाला तुमचा अपमान वाटायचा.)



सम्यक संबुद्धाचे हे सर्व गुण वाचुन मार आणि असुर लोक म्हणतात,,


बुद्धाने कुठला शोध लावला आहे..? ज्याला बुद्धाच्या धर्माबद्दल 'अ' सुद्धा माहीत राहत नाही ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, परंतु आपण महाधर्मज्ञानी आहोत असे भासवतात... तसे बुद्धाने कुठला शोध लावला, हे मारांना आणि असुरांना सुरुवातीला समजणे कठीण जाते, परंतु मी मनुष्याच्या नात्याने काही असुरांना मनुष्यत्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करुन पाहतो, तर महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन भगवान बुद्धांबाबत म्हणतात...



"भविष्याचा धर्म हा विश्वव्यापी धर्म राहणार आहे. त्यामुळे माणसाचा वैयक्तिक ईश्वर मागे पडून आणि धार्मिक कट्टरता तसेच धर्मशास्र या गोष्टी मागे पडतील. तो धर्म भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही विषयांना व्यापेल आणि तो धार्मिकदृष्टीने भौतिक आणि आध्यात्मिक बाबीँचे ऐक्य निर्माण करणारा अर्थपूर्ण असेल. बौध्द धर्म हा वरील कसोट्यांना पूर्णपणे उतरतो आणि जर कोणता धर्म आधूनिक विज्ञानाच्या कल्पनांशी सूसंगत असेल तर तो बौध्द धर्मच होय. बौद्ध धर्मात मानवाला व आधुनिक विज्ञानाला पडलेल्या सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य आहे. माझा जन्म ख्रिश्चन धर्मात झालेला असला तरी मी धार्मिक व्यक्ति नाहीय. परंतू जर मी तसा(धार्मिक) झालो तर मी बौध्दच होईल !"


--अल्बर्ट आइनस्टाईन



आईनस्टाईन म्हणतात,, मानवाला पडलेल्या पुर्ण प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही, परंतु बुद्धाच्या धर्मात एवढे सामर्थ्य आहे..

एवढा मोठा शास्त्रज्ञ जो भगवान बुद्धांना जगातील पहिला वैज्ञानीक मानतो., असे का..? तुम्हा असुरांनुसार भगवान गौतम बुद्धांनी कोणताचा शोध लावला नसेल म्हणुन काय..? जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीबद्दल संपुर्ण ज्ञान नसेल, तर आपल्या ठाई असलेल्या अर्धवट ज्ञानाच्या बळावर हे असुर लोक असले बिनबुडाचे आरोप का करतात..?



भगवान बुद्धांनी फार मोठे संशोधन केले आहे, आपल्या मनावर होणाऱ्या आजारांना कशाप्रकारे मात देतायेईल, याचा मार्ग सांगीतला. काही असुर म्हणत होते कि, बुद्धाच्या धर्माची आणि विज्ञानाची तुलना कशाला करता,..? खरंतर मी कधीच तुलना केली नव्हती जे काही सांगीतले ते बुद्धाचे गुण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असली टिका करणारे हेच असुर वेदातील विज्ञान, इत्यादी विषयांवर निबंध लिहित असतात... असो..


तर काही भाषाशुद्धीवाले होते, जे मुख्य मुद्यांवर प्रतिक्रिया न देता काना, मात्रा, उकार इत्यादी चुकींवर शुद्धलेखनाच्या चुकींवर लक्ष वेधुन घेतात... अशा विचारसरणीचा मी धिक्कार करतो...



आणि भगवान बुद्धांना जातीय कक्षेत मांडुन, समाजात जातीय द्वेष, धर्मद्वेष... पसरवु पाहणाऱ्या सर्व जातीय वादी व धर्मांध लोकांचा जाहीर निषेध करतो.... परंतु हे सर्व असुर प्रवृत्तीचे जातीय वादी व धर्मांध सर्व प्रकारच्या दुराचाराचा मार्ग सोडुन एक दिवस बुद्ध भगवंतांनी सांगीतलेल्या सदाचाराच्या मार्गावर येतील अशी खात्री आहे, म्हणुन मी आपल्या मंगल मैत्रीची कामना करतो....



भगवान बुद्धांनी ब्रह्मजाल सुत्तामध्ये सांगीतलेल्याप्रमाणे,, कोणताही व्यक्ती बुद्ध, धर्म व संघाची निंदा करत असेल तर त्याच्याशी वैरभावना ठेवु नये, त्याच्याप्रती असंतोषाने वागु नये, नाही मनात त्याचा कोप करावा. त्याने आपलीच हानी होते. आपण सत्याचा शोध घ्यायला हवा. ते जे काही बोलत आहेत ते सत्य आहे कि असत्य हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा. (म्हणुनच मनात निर्माण झालेले संभ्रम दुर करण्यासाठी हा लेख लिहिण्यात आला आहे. तेव्हा वरील लेखामध्ये ज्यांच्या साठी असुर हा शब्द वापरला आहे, त्यांच्या प्रती लेखकाच्या मनात कोणतीही द्वेष भावना नाही आहे, हे समजुन घ्यावे...)



मंगल मैत्री...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)

२. मराठी धम्मपद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा