मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

तीन प्रकारच्या मिथ्या (नास्तिक) मान्यता


प्रस्तावना :


आज आपल्या सभोवताल विविध जाति, संप्रदायाचे लोक राहतात. परंतु प्रत्येकाच्या मान्यता (श्रद्धा) एकमेकांच्या पासून भिन्न असतात. सामान्यतः आपल्या समाजामध्ये आपल्याला दोन मुख्य प्रकारच्या मान्यता दिसून येतात :

 आस्तिक
 नास्तिक


         ह्या दोन्ही मान्यता एकाच नदीचे दोन किनारे आहेत. जे कधीच एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत. ह्या दोन्ही परंपरेतील विद्वानांचा असा दावा आहे कि, आमच्याच मान्यता सत्यआहेत, बाकीच्यांच्या मिथ्या. भगवान बुध्द आस्तिक कि नास्तिक याबाबतीत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. परंतु मी सांगतो पारंपारिक पाली तीपिटक वाचल्यावर आपल्याला समजून येईल कि, भगवान ना आस्तिक मतप्रवर्तक ना नास्तिक मतप्रवर्तक त्यांचा मार्ग हा दोघांच्या मधला मार्ग होता. हेच कारण असेल कि आजच्या काळात आपल्याला आस्तिकच नाहीत तर नास्तिक सुद्धा भगवान बुद्धांच्या मार्गाला फसवा मार्ग आहे असे असा प्रचार करताना दिसतात. हा प्रसंग आज नव्याने जन्माला अशातला भाग नाही, त्यांच्या समकाळात सुद्धा नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही मतप्रवाहामध्ये त्यांचे विरोधक होते. कारण बुद्धांनी आस्तिकच नाहीत तर नास्तिक परंपरेतील अनेक चुकीच्या मान्यतांचा विरोध केला होता. असो.... असे असले तरी खरी स्पर्धा ह्या कट्टर आस्तिक आणि कट्टर नास्तिक यांच्यातच असते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या मान्यता असलेल्या लोकांनी ह्या महत्वपूर्ण लेखाचे वाचन अवश्य करावे.


       अगदी आजच्या प्रमाणेच बुद्धांच्या काळात सुद्धा ईश्वरवादी तसेच निरीश्वरवादी लोक सुद्धा होते, त्यांच्या विविध प्रकारच्या मान्यता होत्या, त्यांच्यापैकी कोणत्या मान्यता मिथ्या आणि कोणत्या मान्यता सम्यक याचा उपदेश भगवानांनी अंगुत्तर निकायाच्या तिकनिपातातील विभिन्न वाद सुत्ता मध्ये केला आहे. त्याचा सारांश इथे देत आहे.


मिथ्या (नास्तिक) मान्यता : •  काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व त्याच्या पूर्व जन्मात केलेली कर्मांचे फळ आहे.
 • काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व ईश्वर निर्मित आहेत.
 •  काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते कोणत्याही कारणाविना घडत आहेत, त्यांच्या मागे कोणतेच कारण नाही.विवेचन :


प्रथम मिथ्या  धारणा : •  काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व त्याच्या पूर्व जन्मात केलेली कर्मांचे फळ आहे. त्यांना मी विचारतो कि आयुष्यमान तुमच्या मतानुसार पूर्व जन्मातील कर्मांच्या फळानुसारच लोक प्राणी हिंसा करणारे, चोरी करणारे बनतात, अब्रह्मचारी बनतात. काय पूर्व जन्माच्या फळाच्या स्वरूपातच लोक शिवीगाळ करणारे, व्यर्थ बडबड करणारे बनतात, पूर्वजन्मातील कर्मांच्या स्वरूपातच लोक लोभी, क्रोधी बनतात, किंवा पूर्वजन्मातील कर्मांच्या फळाच्या स्वरूपातच लोक मिथ्या (नास्तिक, आंधळी, सत्याचे दर्शन नसलेली) दृष्टी वाले बनतात.


          याप्रकारे पुर्वाकार्मांनाच सर्वकाही मानणाऱ्या लोकांच्या मनात कसल्याही प्रकारची इच्छा जागत नाही, ना ते कसल्याही प्रकारचे प्रयत्न करतात. ते कोणत्याच प्रकारचे कार्य (कर्म) करण्याची आवश्यकता समझत नाहीत. तेव्हा त्यांना श्रमण कसे म्हटले जाऊ शकते ? ते अनारक्षित आहेत कारण त्यांची स्मृती नष्ट झाली, अर्थात त्यांचे इंद्रिय असंयमित आहेत,ते स्मृतिमान नाहीत. अशा प्रकारच्या मतांच्या लोकांवर हा माझा आरोप आहे.


उदाहरण :  भगवान बुद्धांच्या काळात निर्गंथ (जैन) नावाचे श्रमण होते, ज्यांचा अशा प्रकाराचा सिद्धांत होता. या मताच्या अनुसार आपल्याला येणारे सुखकर आणि दुःखकर अनुभव हे आपल्या पूर्व जन्मातील कर्मावर आधारित असते. म्हणून या जन्मात काही कर्म केले नाहीत तर पुढील जन्मात काही भोगावे लागणारच नाही, हा त्यांचा सिद्धांत असल्यामुळे ते सर्व प्रकारच्या कर्मांचे क्षय करण्यातच गुंतले राहतात, त्यानुसार ज्याने आपल्या सर्व कर्मांचे क्षय केले त्याला निर्वाण किंवा मोक्ष प्राप्ती झाली असे म्हणतात.दुसरी मिथ्या धारणा : • काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते सर्व ईश्वर निर्मित आहेत. त्यांना मी विचारतो - कि प्राणी हिंसा करणारे, चोरी करणारे, अब्रह्मचारी, शिवीगाळ करणारे, व्यर्थ बडबड करणारे, लोभी, क्रोधी, मिथ्यादृष्टीसंपन्न, इत्यादी सर्व जे काही जीव आहेत ते सर्व ईश्वरनिर्मित फळाच्या स्वरूपातच बनतात.?


        याप्रकारे, ईश्वरनिर्मिती मुळेच सर्वकाही घडणाऱ्या लोकांच्या मनात कसल्याही प्रकारची इच्छा जागत नाही, ना ते कसल्याही प्रकारचे प्रयत्न करतात. ते कोणत्याच प्रकारचे कार्य (कर्म) करण्याची आवश्यकता समजत नाहीत. तेव्हा त्यांना श्रमण कसे म्हटले जाऊ शकते ? ते अनारक्षित आहेत कारण त्यांची स्मृती नष्ट झाली, अर्थात त्यांचे इंद्रिय असंयमित आहेत,ते स्मृतिमान नाहीत. अशा प्रकारच्या मतांच्या लोकांवर हा माझा आरोप आहे.


उदाहरण : आज जे काही लोक स्वतःला आस्तिक समजतात, त्यांच्या अशा मिथ्या मान्यता आहेत, त्यांच्या मते आपल्या सोबत ज्या काही सुखदायक किंवा दुःखदायक गोष्टी घडत असतात त्या सर्व सृष्टीनिर्मात्या ईश्वराच्या इच्छेनेच घडतात अशी त्यांची मान्यता आहे.तिसरी मिथ्या धारणा :


 • काही श्रमण आणि ब्राह्मण अशा मताचे आहेत कि, मनुष्य जे काही सुखकर किंवा दुःखकर अनुभव करतो ते कोणत्याही कारणाविना घडत आहेत, त्यांच्या मागे कोणतेच कारण नाही. त्यांना मी विचारतो कि - प्राणी हिंसा करणारे, चोरी करणारे, ब्रह्मचारी, शिवीगाळ करणारे, व्यर्थ बडबड करणारे, लोभी, क्रोधी, मिथ्यादृष्टीसंपन्न, इत्यादी सर्व जे काही जिव आहेत, ते सर्व कोणत्याही हेतुविना (कारणाविना, योगायोगाने) बनतात का ?

        याप्रकारे अशा मान्यतेच्या लोकांमध्ये जे समजतात कि घडणाऱ्या गोष्टी कोणत्याही कारणाविना, कोणत्याही हेतुविना घडतात त्यांच्या मनात कसल्याही प्रकारची इच्छा जागत नाही, ना ते कसल्याही प्रकारचे प्रयत्न करतात. ते कोणत्याच प्रकारचे कार्य (कर्म) करण्याची आवश्यकता समजत नाहीत. तेव्हा त्यांना श्रमण कसे म्हटले जाऊ शकते ? ते अनारक्षित आहेत कारण त्यांची स्मृती नष्ट झाली, अर्थात त्यांचे इंद्रिय असंयमित आहेत,ते स्मृतिमान नाहीत. अशा प्रकारच्या मतांच्या लोकांवर हा माझा आरोप आहे.

उदाहरण : भगवान बुद्धांच्या काळात अजित केसकंबल नावाचा एक नास्तिक मतप्रवर्तक होता, त्याची आणि त्याच्या पंथाची अशी मान्यता होती कि घडणाऱ्या गोष्टी कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) घडत असतात. आज स्वतःला जे लोक नास्तिक समजात त्यांचीही अशीच मान्यता आहे, कि घडणाऱ्या सर्व गोष्टी कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) घडत असतात.


अशाप्रकारे भगवान बुद्धांच्या मतानुसार वरील तीन मान्यता ह्या मिथ्या (नास्तिक) मान्यता आहेत, ज्याच्या मान्यता ह्या सम्यक नाहीत, मिथ्या आहेत ते अज्ञानाच्या घोर अंधकारात खितपत पडलेले असतात.


विवेचन :
 •  ज्या लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी ह्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहेत. त्यांनी सांगावे कि - तुम्हाला परीक्षेत बरे किंवा वाईट मार्क्स मिळाले, अपघात झाला, नौकरी मिळाली इत्यादी सर्व बऱ्या वाईट गोष्टी ते पूर्वजन्मात केलेल्या कर्माचे फळ आहेत काय...? सचिन तेंडुलकर चांगला क्रिकेटर बनला, त्यांना भारतरत्न हा सन्मान मिळाला, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनले, कसाब ला फाशी झाली ते त्यांच्या पूर्वजन्मात केलेल्या कर्माचे फळ आहे काय..? भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला, ऑलिम्पिक मध्ये केवळ एक पदक जिंकले हे पदक विजेत्याचे पूर्वजन्मातील केलेल्या कर्माचे फळ आहे काय..? जर पूर्वजन्मातील कर्मांद्वारे तुमचे आजचे जीवन घडणार असेल तर मग आता प्रयत्न करून काय उपयोग..?

 •  ज्या लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी ह्या सर्व ईश्वराच्या इच्छेनेच घडणाऱ्या आहे, सर्व गोष्टींचा निर्माता ईश्वर आहे, त्याच्या इच्छे विरुद्ध काहीच होत नाही. त्यांनी सांगावे कि - तुम्हाला परीक्षेत बरे किंवा वाईट मार्क्स मिळणे, नौकरी मिळणे किंवा न मिळणे इत्यादी सर्व ईश्वराच्या मर्जीत आहे. तर मग तुम्ही अभ्यास कशाला करता ? म्हणजे कोणी अभ्यास करो किंवा न करो, परीक्षेत पास केवळ ईश्वरच करवतो, जर तसे आहे तर मग नापास होणाऱ्या लोकांनी त्याचे काय घोडे मारले होते.. त्यांच्यातील बरेच लोक तर ईश्वराचे परम भक्त असतात. सचिन तेंडुलकर क्रिकेट चा बादशहा ईश्वराच्या इच्छेने झाला कि त्याच्या इच्छेच्या विरुध्द..? त्यामध्ये त्याचे कर्तुत्व नव्हते काय..? समजा भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट चा सामना सुरु आहे, जेव्हा भारत सामना जिंकतो तेव्हा पाकिस्तान्यांचा देव सुध्दा भारताला जिंकवतो काय. किंवा पाकिस्तान ने सामना जिंकला यामध्ये भारतातील देवांची सुद्धा इच्छा असेलच, म्हणूनच रुसलेल्या ईश्वराला (देवतांना) खुश करण्यासाठी (जेणे करून भारत क्रिकेट सामना जिंकावा यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ सुद्धा केले जातात. (इथे कथित ईश्वर मानवी भावनांचा गुलाम आहे हे समजते.) त्यांनी आमच्या प्रार्थना स्थळांना हानी पोहोचविली म्हणून आम्ही त्यांची हत्या करणार, अशी विचारांचे काही ईश्वरवादी असतात. परंतु ते कधी असा विचार करताना दिसत नाहीत, कि जे काही घडले त्यात ईश्वराची काहीच इच्छा नसेल काय.....?

 •  काही लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी कोणत्याही हितुविना, कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) घडणाऱ्या आहेत. - वरील ज्या दोन मिथ्या (नास्तिक) धारणा आहेत, त्या आज स्वतःला आस्तिक समजणाऱ्या लोकांमध्ये आढळतात. परंतु हि धारणा स्वःताला आस्तिक समजणाऱ्या लोकांमध्ये सापडते. त्या लोकांची अशी धारणा आहे कि घडणाऱ्या सर्व सुखदायक आणि दुःखदायक गोष्टी ह्या कोणत्याही कारणाविना घडत असतात. परंतु त्यांची हि धारणा मिथ्या आहे, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे कोणते न कोणते कारण असते. आणि जी गोष्ट घडण्याच्या मागे कोणते कारण राहत नाही त्या गोष्टीला चमत्कार असे म्हणतात.उदाहरण :


 •  सचिन तेंडुलकर महान क्रिकेटर बनला ते कोणत्याही कारणाविना (योगायोगाने) ?
 •  मोदी प्रधानमंत्री बनले ते योगायोगाने ?
 •  कॉंग्रेस निवडणूक हरली
 •  फडणवीस मुख्यमंत्री झाले.
 •  भारत मंगळावर गेला.
 •  अमेरिका महासत्ता आहे,
 •  जगात काही लोक श्रीमंत तर काही लोक गरीब आहेत.

        इत्यादी अनेक उदाहरणे सांगता येतील जे सिध्द करतात कि घडणाऱ्या प्रत्येक सुखदायक किंवा दुःखदायक गोष्टी मागे कोणते ना कोणते कारण असते. वरील ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या घडण्याच्या मागे कोणते ना कोणते कारण आहे, त्या योगायोगाने घडलेल्या नाहीत. त्यासाठी त्यांनी तशी कर्मे केली आहेत आणि त्याची फळे ति भोगत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष द्या आणि अनुभव करा कि त्यां घडण्याच्या मागे कोणते न कोणते कारण असेलच. आणि ज्याची कारणे आपण समजू शकले नाहीत याचा अर्थ आपले ज्ञान कुठे तरी कमी आहे असाच होतो.

भगवान बुद्धांनी या तीन मिथ्या मान्यतांचा उपदेश केल्यानंतर सम्यक धर्माचा उपदेश अंगुत्तर निकायाच्या तिकनिपातातील विभिन्न वाद सुत्ता मध्ये केला आहे, आपण ते पूर्ण सुत्त वाचून काढावे.


विभिन्न वाद सुत्त इथे वाचा  :

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन आणि निर्माण होणारे गैरसमज


इतिहासात डोकावुन बघितले तर असे आपल्या लक्षात येईल की प्राचीन काळापासुन धर्माच्या विरोधकांनी बुद्ध, धम्म आणि संघाच्या बाबतीत अफवा पसरवायला सुरुवात केली होती. भगवान बुद्ध, धर्म आणि संघाबद्दल लोकांच्या मनात आकस निर्माण करण्यासाठी "जेणे करुन लोक बुद्ध, धर्म आणि संघाची निंदा करोत" या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवुन धर्माच्या विरोधकांनी लोकांची दिशाभुल करण्या करीता अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या, धर्माचा अपप्रचार केला.


पशू पेक्षाही रानटी जीवन जगणाऱ्या माणवाला मानवता शिकविणाऱ्या धर्ममार्गाला त्याच्याच मायदेशातुन हद्दपार करुन त्यांच्या अशा प्रयत्नामध्ये थोड्याफार प्रमाणात का म्हणता येईना पण ते यशस्वी झाले. शतकानुशतके आपल्या मातृभुमीपासुन दुर राहिलेल्या ह्या कल्याणकारी धर्माचे त्याच्या मायदेशात मोठ्या थाटामध्ये स्वागत झाले. परंपरेने चालत असलेल्या अपप्रचार अनेक माध्यमांद्वारे दुर होऊ लागले. असे असले तरी सुद्धा धर्माच्या संबंधी अपप्रचाराच्या द्वारे पेरण्यात आलेले अनेक चुकीचे समज आजही आपल्याला दिसुन येतात. एक धर्म अनुयायी म्हणुन अशा चुकीच्या प्रचारांना दुर करणे आपले एक कर्तव्य समजुन "भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन" या विषयावर एक लेख लिहित आहे. या लेखा द्वारे मिळणाऱ्या महत्वपुर्ण उपदेशाला ग्रहण करा....


भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन याबाबतीत प्रामुख्याने असे सांगीतले जाते की त्यांनी डुकरांचे मांस खाऊन आपली जीवनयात्रा संपविली. अलीकडेच काही बामसेफी विचारजंत असा प्रचार करताना आपल्याला दिसतात कि चुंद नावाच्या लोहाराने ब्राह्मणांच्या कडुन बुद्धांची हत्या करण्याची सुपारी घेतली होती. त्या अनुशंगाने त्याने अन्नामध्ये विष मिसळवुन ते अन्न भगवान बुद्धांना खायला दिले आणि अशा प्रकारे त्यांची हत्या केली गेली. माझ्यामते ही दोन्ही मते खोडसाळ आणि धर्म विरोधी आहेत...


त्यासाठी आपण पुढील गोष्टींचा विचार करु :

१. ज्या उपासकाने भगवान बुद्धांना शेवटचे अन्न दान दिले त्याचे 'चुंद' हे नाव डुकरांची कत्तल करणाऱ्या व्यक्तीच्या नावासोबत गोंधळात पडले. इथे लोक हे विसरतात की - तो डुकरांची कत्तल करुन त्यांचे मांस विकणारा 'चुंद' नावाचा व्यक्ती हा भगवान बुद्धांच्या महापरीनिर्वाणाच्या आधीच मरण पावलेला आहे.

२. ज्या उपासकाने भगवान बुद्धांना शेवटचे अन्न दान दिले त्यांचे नाव 'चुंद करमारपुत्र' होते, जो व्यवसायाने सोनार होता, दागीन्यांचा व्यापारी होता. कुशीनाऱ्याच्या वाटेवर पावा येथील ह्याच उपासकाच्या आरामांत भगवान बुद्धांनी रात्र घालविली.

३. तीन महिन्यांच्यापुर्वी भगवान बुद्धांनी सांगीतले होते कि येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला कुशीनारा येथे त्यांचे महापरिनिर्वाण होणार आहे. कारण सहा महिन्यांपासुन भगवान बुद्धांचे प्रकृती खालाविली होती, पोटाच्या विकाराने ते अशक्त बनले होते. भगवान बुद्धांची बिघडलेल्या तब्येतीला पाहुन 'चुंद करमारपुत्त' ह्यांनी अतुल नावाच्या तत्कालीन प्रसीद्ध डॉक्टरांच्या सल्ल्याने एक औषधीयुक्त पदार्थ बनविला ज्यामध्ये स्वतः भगवान बुद्धांचा सुद्धा समावेश होता.

४. त्या औषधीयुक्त पदार्थाला पाली भाषेमध्ये 'सुकर मद्दव' असे म्हटले गेले. इथुनच सर्व गोची झाली.

५. सामान्यतः 'सुकर' या शब्दाचा अर्थ डुक्कर असा घेतला जातो. या शब्दसाधर्म्यामुळे धर्माच्या विरोधकांनी 'डुकराच्या भाजीची' दंतकथा रचली.


सामान्यतः कोणत्याही व्यक्तीला जो पोटाच्या विकाराने ग्रस्त आहे पचायला जड असल्यामुळे त्याला मांस खायला दिले जात नाही. दुसरीकडे उच्चवर्णीय भारतीय समाज (क्षत्रीय, ब्राह्मण, वैश्य) हे सर्व शाकाहारी होते. याच धर्तीवर निःशंक शाकाहारी असलेला 'चुंद करमारपुत्र' सारखा श्रीमंत व्यापारी मांस वाढणे शक्य नाही ते सुद्धा बुद्धांना जे त्यांच्या समाजात पाप समजले जाते.


नेपाळ आणि भारतातील गोरखपुर (पावा आणि कुशीनारा गोरखपुर जिल्ह्यामध्ये येतात) जिल्ह्यामध्ये राहणारे आत्तासुद्धा अशा अनेक प्रकारचे मश्रूम खातात.

१. सुकर मद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर काही डुकरे चिखल करुन तिथे घाण करतात, अशा जमीनीवर जे मश्रूम उगविले जातात त्याला सुकर मद्दव असे म्हणतात.

त्याचप्रमाणे :

२. अजा मद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर काही बकरे चिखल करुन घाण करतात आणि त्या जमीनीवर जे मद्रव उगवतात त्यांना अजा मद्दव असे म्हणतात.


३. गोमद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर चिखल करुन गायी तिथे घाण करतात अशा जमीनीवर जे मद्रव उगवतात त्यांना गोमद्दव असे म्हणतात.

४. बेलुवमद्दव : काही विशीष्ट मद्रव वेळु च्या झाडाखाली उगवतात त्यांना बेलुवमद्दव असे म्हणतात.


कुशीनाऱ्याचे आदरणीय महापंडीत अच्छुतानंद थेरो, बुद्धमित्त थेरो, काठमांडु चे अमृतानंद थेरो, लुंबीनी चे मैत्री थेरो आणि अनेकांच्या मते सुकर मद्दव हा अत्यंत पचनशील पदार्थ आहे जो पोटाच्या विकारग्रस्तांना दिला जातो. नेपाळ आणि परीसरात रुग्णांसाठी आजही औषधी म्हणुन ह्या पदार्थाचा वापर केला जातो.


सुकर मद्दव प्रमाणेच पोटाच्या विकारावर औषधीयुक्त असा पदार्थ अस्तित्वात आहे ज्याला सुकर बन असे म्हणतात. पाश्चात्य देशांमध्ये त्याला ‘Hog Mushrooms’ असे म्हणतात.


अशा प्रकारचे मद्रव अत्यंत दुर्मीळ आहेत. जे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, कमकुवत दृष्टी इत्यादी आजारांवर सहजपणे मात करु शकते.


वरील सर्व पुरावे आपल्याला सांगतात की भगवान बुद्धांनी आपल्या अंतीम जेवनामध्ये औषधीयुक्त सुकर मद्रवाचे सेवन केले होते., डुकराच्या मांसाचे नाही. त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्या शेवटच्या जेवनामध्ये डुक्कराच्या मांसाचे सेवन केले नव्हते हा प्रश्न निकालात येतो.
तर जे कोणी बामसेफी विचारांचे लोकं हा प्रचार करतांना दिसतात की - चुंदाने ब्राह्मणांच्या सांगण्यावरुन बुद्धांची हत्या केली होती. त्यांचा हा अपप्रचार मला वरील प्रचारापेक्षा घातक वाटतो., माझ्यामते तर हा धर्मद्रोह आहे. अशा अपप्रचारकांनी सुद्धा लक्षात ठेवावे कि, स्वतः भगवान बुद्धांनी म्हटले आहे - ना कोणी मार किंवा ब्रह्मा, ना कोणी श्रमण किंवा ब्राह्मण, देवांच्या सहित मनुष्य सुद्धा बुद्धांची हत्या करु शकत नाही....

एवढेच नाही तर संबोधी प्राप्तीच्या वेळेस सुजाताने दिलेली खिर आणि चुंद कारमार पुत्र यांच्याद्वारे दिलेले सुकरमद्दव हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आहेत...

अशा अपप्रचारांना बळी पडलेले तसेच अपप्रचार करणारे या सर्व गोष्टींचा विचार करतील अशी आशा आहे....

शनिवार, २६ जुलै, २०१४

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग - ७)


आषाढ पौर्णिमेचे महत्वभगवान बुद्धांच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे एक वेगळेच महत्व आहे. परंतु आषाढ पौर्णिमेचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये एक अतिमहत्वाचा दिवस आहे- कारण याच दिवशी१. महामायेस गर्भधारणा
२. बोधीसत्वाचे महाभिनिष्क्रम
३. धर्मचक्र प्रवर्तन

१. महामायेस गर्भधारणा :


भगवानांच्या जीवनातील हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. शुद्धोधन राजाची पत्नी महामाया हिला गर्भधारणा झाली. एका अर्थाने भविष्यातील बुद्धांचा जन्म महामायेच्या गर्भात झाला होता.

शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अमरावती नावाच्या संपन्न शहरामध्ये एका पिढीजात सदाचारी आणि श्रीमंत दाम्पत्याला सुमेध नावाचा मुलगा झाला. सुमेध शिक्षण घेत असतानाच त्याच्या पालकांचे निधन झाले. वयात आल्यावर तो परिव्राजक बनला. पुढे त्याची भेट भगवान दीपंकर बुद्ध यांच्यासोबत झाली. त्यावेळी भगवानांनी सांगितले कि, भविष्यात हा सुमेध सुद्धा बुद्धत्वाची प्राप्ती करून घेणार आहे. त्यानंतर सुमेधाने अनेक जन्म घेऊन पारमिता पूर्ण करून अनेक जन्म इंद्रपद, बोधीसत्व, ब्रह्मपद, इत्यादी पदे भुषवीत बुद्धपदाकडे वाटचाल केली आणि शाक्यांचे राजे शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या घरी आपला शेवटचा जन्म घेण्याचे ठरविले. एकदा निद्रावस्थेत असताना महामायेला स्वप्न पडले. स्वप्नात सुमेध नावाचा बोधीसत्व तिच्यापुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला – मी माझा शेवटचा पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होशील काय ....? महामायेने होकारार्थी उत्तर दिल्याबरोबर , स्वप्न तुटले आणि तिला जाग आली, अशा प्रकारे महामायेला गर्भधारणा झाली.
२. बोधीसात्वाचा गृहत्याग :
बोधीसत्व सिद्धार्थाच्या गृहत्यागासंबंधी अनेक मते-मतांतरे आहेत. पारंपरिक पद्धतीने असे सांगितले जाते की, बोधीसात्वाने गृहत्याग मध्यरात्री कोणालाही न सांगता केला. पण त्यांनी गृहत्याग सर्वांच्या सोबत केला . या गोष्टीला त्रिपिटकातही आधार आहे. असो,, आपण यां मुद्याला बाजूला ठेवूया......
बोधीसत्वाने गृहत्याग केला याला बरेच लोक त्याचा बेजबाबदार पणा समजतात. खरच तसे होते काय....?


या गोष्टीच्या मुळापर्यंत जाताना आपल्याला समजून घ्यायला हवे कि, बोधीसात्वाला त्याच्या परिवाराला सोडून जाणे काही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. त्याने त्याच्या गृह्त्यागाच्या पूर्वी भरपूर विचार केला. आन त्याने त्याच्या परिवार आणि समाज यांच्यापैकी समाजाला निवडले. गृहत्याग करून त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली, दुःख मुक्तीचा मार्ग शोधला, त्यांनी जगाला करूणा शिकविली. त्यांनी त्यावेळी केलेली त्यागामुळे आपल्याला त्यांच्या शिकवणीचा आधार मिळाला, आपल्याला निर्वाणाचा मार्ग जाणता आला. कित्येक लोकांनी निर्वानाचे सुख प्राप्त केले, हे सर्व शक्य झाले ते बोधीसत्वाने त्यां वेळेस केलेल्या गृहत्यागामुळे . म्हणून बोधीसत्वाचे हे कृत्य बेजबाबदार पनाचे नव्हते तर अखिल विश्वाच्या कल्याणाकरीता केलेल्या त्यागाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.३. पहिले धर्मचक्र प्रवर्तन :
बोधीसत्वाने अनेक जन्म पारमिता पूर्ण करून बुद्धपदाकडे वाटचाल केली, त्यांनी मानवाच्या संपूर्ण दुःखमुक्तीच्या मध्यम मार्गाचा, निर्वाण प्राप्तीचा शोध लावला. ज्याचे सार चार आर्यसत्य यांच्यावर आधारलेले आहे, अशा धर्माचा त्यांनी शोध लावला. बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी काही दिवस उरुवेलाच्या वनात निर्वाण सुखाचा आनंद घेत घालविले. भगवान उपदेश करीत नाहीत हे पाहून, चिंताग्रस्त ब्रह्म सहम्पती ब्रह्म लोक सोडून भगवानांच्या समोर प्रगट झाला अंड हात जोडून भगवानांना म्हणाला – हे वीर, उठा, आपण संग्राम जिंकले आहात... आपला भार उतरला गेला आहे, ज्याप्रमाणे पर्वताच्या माथ्यावरून एखादा मनुष्य खालील लोकांकडे पाहतो. त्याचप्रमाणे आपण प्रज्ञेच्या शिखरावरून दुःखाच्या सागरात बुडालेल्या यां जगाकडे पहा.. ऋणमुक्त जगात विहार करा.. भगवान धर्माचा उपदेश करा.. हे सुगत, धर्मोपदेश करा, समजणारे सुद्धा मिळतील


भगवानांनी ब्रह्म सहम्पतीची विनंती ऐकून धर्माचा उपदेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा धर्म गंभीर स्वरूपाचा होता. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी या धर्माचा उपदेश कोणाला करावा हा प्रश्न त्यांचं समोर पडला. त्यावेळी बोधिसत्व अवस्थेत असताना त्यांचे गुरु आलार कालाम आणि उद्दक रामापुत्र यांना शिकविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परंतु त्या दोघांचे निधन झाले असे त्यांना समजले. अशा वेलीग त्यांना सोडून गेलेली पाच परीव्राजकांची आठवण झाली आणि त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना असे समजले कि ते पाच परिव्राजक सारनाथ मध्ये आहेत. तेव्हा भगवान त्या परीव्राजाकांना उपदेश करण्याच्या उद्देशाने वाराणसीकडे गेले आणि त्यांना सारनाथ मधील ऋषीपतन च्या मृगदाय वनात त्या परीव्राजाकांना धर्माचा उपदेश केला, चार आर्यसत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला... अशा प्रकारे त्यांनी पहिले धर्मचक्र प्रवर्तन केले......


या महत्वाच्या घटना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घडल्या, त्यामुळे या पौर्णिमेला बरेच महत्व प्राप्त झाले आहे, आषाढ पौर्णिमा हि पावसाळ्यात येते. त्यामुळे या पौर्णिमेपासून तीन महिने वर्षावास सुरु होतो. आपल्या सर्वांना आषाढी पौर्णिमा आणि वर्षावासाच्या हार्दिक मंगल कामना

सोमवार, ७ जुलै, २०१४

बुद्ध वंदना (हिंदी)
अर्हंत सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध को मैं अभिवादन करता हूँ ॥

उन बुद्ध भगवान द्वारा उपदेश किए हुये धर्म को मैं नमस्कार करता हूँ ॥

सन्मार्ग पे आरुढ ऐसे भगवान बुद्ध श्रावक संघ को मैं नमस्कार करता हूँ ॥

उन भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध को मेरा नमस्कार हैं ॥
उन भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध को मेरा नमस्कार हैं ॥
उन भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध को मेरा नमस्कार हैं ॥
त्रिशरण


मैं बुद्ध को शरण जाता हूँ ।
मै धर्म को शरण जाता हूँ ।
मैं संघ को शरण जाता हूँ ।

दुसरी बार मैं बुद्ध को शरण जाता हूँ ।
दुसरी बार मै धर्म को शरण जाता हूँ ।
दुसरी बार मैं संघ को शरण जाता हूँ ।

तिसरी बार मैं बुद्ध को शरण जाता हूँ ।
तिसरी बार मै धर्म को शरण जाता हूँ ।
तिसरी बार मैं संघ को शरण जाता हूँ ।

पंचशील


मैं प्राणीहिंसा से दुर रहने कि शिक्षा ग्रहण करता हूँ ॥
मैं चोरी करने से दुर रहने कि शिक्षा ग्रहण करता हूँ ॥
मैं काम वासना के दुराचार से दुर रहने कि शिक्षा ग्रहण करता हूँ ॥
मैं झुट बोलने से दुर रहने कि शिक्षा ग्रहण करता हूँ ॥
मैं मद्य तथा मादक पदार्थ के सेवन करने से दुर रहने कि शिक्षा ग्रहण करता हूँ ॥


बुद्ध पुजा


वर्ण और गंध जैसे गुणों से युक्त पुष्पमाला से मैं मुनींद्र के श्रीपाद कमलों कि पुजा करता हूँ ॥

इन कुसुमों से (फुलों से) मैं बुद्ध कि पुजा करता हुं । इस पुण्य से मुझे निर्वाण कि प्राप्ती होगी, जैसे यह फुल सुक जाता हैं वैसे हीं मेरा शरीर नश्वर हैं ॥

अंधकार का नाश करने वाले, सर्वव्यापक प्रकाश मान ऐसे (सुरज जैसे) इस विश्व का अज्ञानरुपी अंधकार का नाश करने वाले त्रिलोकदीप सम्यक संबुद्ध कि मैं पुजा करता हूँ ॥

सुगंध युक्त शरीर वाले तथा अनंत गुण धारी सुगंध से परीपुर्ण ऐसे तथागत कि मैं सुगंध से पुजा करता हूँ ॥

बुद्ध, धर्म, संघ, लंका, जंबुदीप तथा नागलोक और त्रिदशपुर के स्तुपों मे स्थापित बुद्ध शरीर के अवशेष, केश, लोम और धातुओं के जितने रुप हैं वे सभीं बुद्ध के ही रुप हैं, उन सभीं को, सर्व बुद्ध, दशबलतनुज और बोधीचैत्य उन सभीं को मैं नमन करता हूँ ॥

सभी जगहों पर स्थापित बुद्ध शरीर के अवशेषों को महाबोधीवृक्ष तथा चैत्य को मैं वंदन करता हूँ, क्युं कि यह सदैव बुद्ध के ही रुप हैं ॥वंदना पाठबुद्ध वंदना

अर्हंत (जीवनमुक्त), सम्यक संबुद्ध (संपुर्ण जागृत) विद्या और आचरण से युक्त सुगती जिन्होंने प्राप्त की हैं ऐसे लोकविधु, सर्वश्रेष्ठ तथा दमनशील पुरुषों के सारथी तथा आधार देणे वाले देव और मनुष्यों के शास्ता ऐसे यह भगवान बुद्ध हैं ॥

ऐसे बुद्ध भगवान का जीवनभर अनुसरण करणे का मैं निर्धार करता हूँ ॥

भुतकाल में जो बुद्ध हो गएं हैं, भविष्य में जो बुद्ध होंगे तथा (अनंत लोगों के दुःख के नाशक) वर्तमान में जो बुद्ध हैं, उन सभी को मैं वंदन करता हूँ ॥

मुझे और किसी का आधार नहीं, केवल बुद्ध ही मेरा सर्वश्रेष्ठ आधार हैं, इस सत्य वचन से मेरा मंगल हो ॥

बुद्ध भगवान के पवित्र चरणों के धुल को मैं वंदन करता हुं । बुद्ध के संबंध में मेरी और से कोई अपराध हो गया हो तो वे भगवान बुद्ध मुझे क्षमा करे ॥

इस लोक मे जो अनेक प्रकार के अनमोल रत्न हैं उन मे से किसी से बुद्ध की बराबरी नहीं हो सकती , इस सत्य वचन से मंगल हो ॥

जिन्होंने पुज्य बोधीवृक्ष के नीचे बैठकर, मार सेना का पराभव किया, अनंत ज्ञान कि प्राप्ती कर जिन्होंने बुद्धत्व की प्राप्ती की, जो सारे विश्व में श्रेष्ठ हैं ऐसे भगवान बुद्ध मैं नमस्कार करता हूँ ॥धम्म वंदना

भगवान (बुद्ध) ने जिस सुंदर धर्म का उपदेश किया सच्चाई यहीं आखों के द्वारा देख सकते हैं, जो धर्म अपना फल जल्द ही देता हैं, कोई भी जिसका अनुभव करें, यह सिद्धांत विज्ञान के द्वारा खुद अनुभव करके देख सकतें हैं ॥

ऐसे धर्म का मैं जीवनभर अनुसरण करने का निर्धार करता हूँ ॥

जो भुतकाल के बुद्धों के द्वारा उपदेश किया हुआ धर्म हैं, जो भविष्यकाल के बुद्धों के द्वारा उपदेश किया हुआ धर्म होगा तथा (अनंत लोगों के दुःख के नाशक) वर्तमान के बुद्ध के द्वारा उपदेश किया हुआ जो धर्म हैं, उन सभी धर्मों को मैं वंदन करता हूँ ॥

मुझें किसी और का आधार नहीं, केवल बुद्ध का धर्म हिं मेरा एकमेव आधार हैं, इस सत्य वचन से मेरा मंगल हो ॥

सभी प्रकार से श्रेष्ठ ऐसे बुद्ध के धर्म को मैं वंदन करता हूँ , यदी धर्म के संबंध मेरे से कोई अपराध हुआ हो तो वह धर्म मुझे क्षमा करें ॥

इस लोक मे जितने अनेक प्रकार के अनमोल रत्न हैं उन में से किसी से भी उन मे से किसी से भी बुद्ध के धर्म कि बराबरी नहीं हो सकती, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥

यह जो आर्य अष्टांगीक मार्ग हैं वह निर्वाण प्राप्ती का सीधा मार्ग हैं, जो सर्वश्रेष्ठ तथा शांतीदायक सद्धर्म हैं मैं उस धर्म को वंदन करता हूँ ॥संघ वंदना

भगवान का श्रावक संघ सन्मार्ग पर चल रहा हैं, भगवान का श्रावक संघ सीधे मार्ग पर चल रहा हैं, भगवान का श्रावक संघ ज्ञान के मार्ग पर चल रहा हैं, भगवान का श्रावक संघ उत्तम मार्ग पर चल रहा हैं ॥

भगवान का श्रावक संघ ऐसे नर रत्नों का हैं जिसने चार जोडीया और आठ सप्तपदों कि प्राप्ती की हैं, यह संघ निमंत्रण देणे योग्य, स्वागत करने योग्य, दक्षिणा देणे योग्य तथा विश्व का सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र हैं ॥

ऐसा यह संघ नमस्कार करणे योग्य हैं, मै जीवनभर इस संघ को शरण जाता हूँ ॥

भुतकाल के बुद्धों के द्वारा स्थापित श्रावक संघ, भविष्यकाल के बुद्धों के द्वारा स्थापित श्रावक संघ होंगे, तथा वर्तमान के बुद्ध के द्वारा स्थापित श्रावक संघ हैं उन सभी उन सभी को मै वंदन करता हूँ ॥

मुझे किसी और का आधार नहीं, केवल बुद्ध का श्रावक संघ ही मेरा एकमेव आधार हैं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥

तीनों प्रकार से श्रेष्ठ, ऐसे भगवान के श्रावक संघ को मैं प्रणाम करता हूँ, संघ के संबंध मे मुझ से कोई अपराध हुआ हो तो संघ मुझें क्षमा करें ॥

इस लोक में जो अनेक प्रकार के रत्न हैं, उन मे से किसी से भी बुद्ध के श्रावक संघ की बराबरी नहीं हो सकती, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥

संघ विशुद्ध, दक्षिणा देणे योग्य, अनेक प्रकार से गुणों से युक्त संघ को मैं प्रणाम करता हूँ ॥त्रिरत्न वंदना...अनंत गुणों के सागर भगवान बुद्ध को मैं नमस्कार करता हूँ, मित्रत्व कि भावना से सभी प्राणी सुखी हो, यह शरीर तो दुर्गंधी का घर हैं, सभी प्राणी विनाश कि ओर प्रस्थान कर रहें हैं, मैं भी मृत्युधर्मी हूँ ॥

भगवान ने उपदेश किये हुए धर्म को मैं नमस्कार करता हूँ, मित्रत्व कि भावना से सभी प्राणी सुखी हो, मित्रत्व कि भावना से सभी प्राणी सुखी हो, यह शरीर तो दुर्गंधी का घर हैं, सभी प्राणी विनाश कि ओर प्रस्थान कर रहें हैं, मैं भी मृत्युधर्मी हूँ ॥

मुनीराज भगवान बुद्ध के श्रावक संघ को मैं नमस्कार करता हूँ, मित्रत्व कि भावना से सभी प्राणी सुखी हो, यह शरीर तो दुर्गंधी का घर हैं, सभी प्राणी विनाश कि ओर प्रस्थान कर रहें हैं, मैं भी मृत्युधर्मी हूँ ॥संकल्प


इस धर्माचरण से मैं बुद्ध, धर्म, संघ कि पुजा करता हूँ ॥

इस धर्माचरण से मुझें जन्म, जरा तथा मृत्यु से मुक्ती मिलेगी ॥

इस पुण्याचरण से निर्वाण कि प्राप्ती तक मुर्ख से संगत ना हो, ज्ञानीयों की संगति हो..॥

फसल की बढत के लिए समय पर वर्षा हो, संसार के सभी जीवों कि वृद्धी हो, राजा (=सरकार) धार्मिक हो ॥
सुत्तपाठ
आव्हान सुत्त

हे चक्रवाल मी वास करणे वाले देवों आप यहा आयें और सम्यक संबुद्ध अर्हंत भगवान के आर्य शिक्षा को ग्रहण करें, जो संपूर्ण दुःख से मुक्ती और निर्वाण कि और लेकर जाने वाली हैं

हे आर्य श्रावक....! सद्धर्म का श्रवण करणे का समय हो गया हैं
दुसरी बार, हे आर्य श्रावक....! सद्धर्म का श्रवण करणे का समय हो गया हैं
तिसरी बार, हे आर्य श्रावक....! सद्धर्म का श्रवण करणे का समय हो गया हैं

उन अर्हंत सम्यक संबुद्ध भगवान को नमस्कार हैं
दुसरी बार, उन अर्हंत सम्यक संबुद्ध भगवान को नमस्कार हैं
तिसरी बार, उन अर्हंत सम्यक संबुद्ध भगवान को नमस्कार हैं

इह लोक तथा परलोक में, आकाश में तथा भूमिपर रहनें वाले, प्रकृती में रहने वाले देवता, सदाचार से युक्त देवगण, श्रेष्ठ सुमेरू पर्वत पर जो कुछ सुवर्ण से निर्माण किये गये हुए देवलोक हैं वे सभी भगवान बुद्ध के सद्धर्म का श्रवण करणे के लिये पधारे, जो (सद्धर्म) शांती और सुख का स्त्रोत है

चक्रमंडल मे रहने वाले सभी देवता, यक्ष तथा ब्रह्मा गण इस पुण्य का अनुमोदन करके बुद्ध के शासन मे लाग जायें, और सभी प्रकार के विकारों से मुक्ती पाकर रक्षण के कार्य हेतू सज्ज हो, विश्व कि और धर्म कि वृद्धी हो,सभी देवता विश्व और धर्म का रक्षण करे

सभी अपने अपने परिवार के साथ शारीरिक और मानसिक सुख का लाभ लिये दुःख से मुक्त हो, राजभय, चोरभय, मनुष्यभय, अमनुष्यभ, अग्नी, जल, पाप, बंदर, हाथी, घोडा, बैल, कुत्ता, साप, बिच्छू, आदी से सभी प्रकार के भय, रोग और उपद्रओं से सभी देवता मेरा रक्षण करे
महामंगल सुत्त


एक समय भगवान श्रावस्ती नगर के जेतवन उद्यान मी अनाथापिंडीक के द्वारा बनवाये संघाराम मे विहार कर राहे थे उस समय एक देवता अपने तेज से सारा जेतवन प्रकाशीत करते हुए भगवान के पास आ कर भगवान को वंदन किया और भगवान के सामने एक गाथा कहीं :

कल्याण कि कामना करते हुए कितने हि देव और मनुष्य मंगल धर्मो के संबंध में चिंता कर रहे है ! हे तथागत ! आप हि कृपा कर बतैये कि वास्तविक श्रेष्ठ मंगल क्या है ..?
भगवान ने कहा -

अज्ञानियों से दूर रहना, ज्ञानियोंकी सांगति करना और जो पूजनीय है उनकी पूजा करना यह श्रेष्ठ मंगल है ॥

उपयुक्त देश मी निवास करना, पूर्व कार्मो का संचित पुण्य होना और स्वयं को सम्यक रूपेण समाहित रखना यह श्रेष्ठ मंगल है ॥

अनेक विद्याओं और शिल्प कलाओं मी निपुण होना, विनय स्वभाव मी सुशिक्षित होना और वार्तालाप मी सुभाषी होना यह श्रेष्ठ मंगल है ॥

माता पिता कि सेवा करना, परिवार का पालन पोषण करना और निष्पाप व्यवसाय करना यह श्रेष्ठ मंगल है ॥

दान देणा, धर्माचरण करना, सजातीय संबंधियों कि सहायता कर संग्रह करना और वर्जित दुष्कर्म न करना यह श्रेष्ठ मंगल है ॥

तन मन धन से पापों का त्याग करना, मदिरा सेवन से दूर रहना और कुशल धर्मो के पालन मी सदा सचेत रहना यह श्रेष्ठ मंगल है ॥

पूजनीय व्याक्तियो को गौरव देना, सदा विनीत रहना, संतुष्ट राहना, कृतज्ञ रहना और उचित समय पर धर्म श्रवण करना यह श्रेष्ठ मंगल है ॥

सहनशील होना, अज्ञाकारी होना, श्रमणो का दर्शन करना और उचित समय पार धर्म चर्चा कारना यह श्रेष्ठ मंगल है ॥

तप साधना करना, ब्रह्मचर्य पालन करना, चार आर्य सत्यो का दर्शन कारण और निर्वाण का सक्षात्कार करना यह श्रेष्ठ मंगल है ॥

जिसका चित्त लोक धर्मो से विचलित नही होता, निःशोक, निर्मल और निर्भय रहना यह श्रेष्ठ मंगल है ॥

जो उपर्युक्त (३८) मंगल धर्मो का पालन करते हुए सर्वत्र जय लाभी होते है, सर्वत्र कल्याणलाभी होते है, उन मंगल मार्गियों के ये हि श्रेष्ठ मंगल है ॥
करणीय मेत्त सुत्त

शांति पद के प्राप्ति कि कामना करने वाले, कल्याण साधना प्रवीण प्राप्त मनुष्य को इमानदार बनना चाहिए ॥

वह संतोष प्राप्त सरल जीवन चलाने वाला सज्जन और अनासक्त होना चाहिए ॥

विद्वान लोक निंदा ना कर पाये, ऐसे छोटा से छोटा कार्य न करें, सभी प्राणी सुखी हो, सबका कल्याण हो, सभी को सिद्धी प्राप्त हो (ऐसी मैत्रीभावना करें ) ॥

सभी प्रकार के उत्पन्न हुये हूए तथा उत्पन्न न हुये हूए प्राणी सुखी हो... ॥

कोई किसी कि वंचना न करें, कोई किसी का अपमान ना करें, कोई किसी को दुःख देने कि कामना ना करें ॥

जीस तरह माता अपने पुत्र के रक्षण हेतु, स्वयं प्राण को न्योछावर करती हैं, उसी तरह सभी जीवों के प्रती अपने चित्त मे निस्सीम प्रेम कि भावना जागृत करें ॥

मन कि बाधा, वैरभाव तथा शतृत्व को त्याग कर सारे विश्व के प्रती मन मे निस्सीम प्रेम कि भावना करें ॥

खडे रहते, बैठे रहते तथा सोये रहते (जिस समय तक) जागृत होगे, तब तक ऐसी ही स्मृती रखें, इसी को ब्रह्मविहार कहते हैं ॥

ऐसा मनुष्य कभी मिथ्या दृष्टी मे न पडते हूए, शीलवान होकर, विशुद्ध दर्शन से युक्त होकर, काम - तृष्णा का नाश कर के गर्भाशय से मुक्त होते हैं ॥मंङल गाथामहामंङल गाथा


महाकारुणीक भगवान बुद्ध ने समस्त विश्व के कल्याण हेतु दस पारमिता पुर्ण कर श्रेष्ठ संबोधी कि प्राप्ती कि हैं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥

शाक्य वंश को हर्षीत करने वाले भगवान बुद्ध ने बोधीवृक्ष के नीचे बैठकर मार और उसकी सेना का पराभव किया, उसी तरह से मेरा कल्याण हो ॥

राग, द्वेष, मोह, आदी विकारों पर देव तथा मनुष्य के कल्याण के हेतु बुद्धरत्न औषध का सत्कारपुर्वक ग्रहण करें, इस तेजोमय बुद्धरत्न के प्रभाव से मेरा कल्याण हो, सभी प्रकार के दुःख तथा उपद्रव का नाश हो ॥
चिंता का नाश करने वाले श्रेष्ठ धर्मरत्न यह औषध हैं, इसके सत्कारपुर्वक सेवन से सभी भय शांत हो ॥
निमंत्रण देणे के पात्र ऐसे संघरत्न श्रेष्ठ औषध हैं, ऐसे तेजोमय संघरत्न के सत्कारपुर्वक सेवन से सभी उपद्रव तथा दुःख का नाश हो ॥


विश्व मे जो कुछ मुल्यवान रत्नों मे जिनकी पहचान हैं, उन सब मे बुद्ध कि बराबरी करणे वाला एक भी रत्न नहीं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥
विश्व मे जो कुछ मुल्यवान रत्नों मे जिनकी पहचान हैं, उन सब मे धर्म कि बराबरी करणे वाला एक भी रत्न नहीं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥
विश्व मे जो कुछ मुल्यवान रत्नों मे जिनकी पहचान हैं, उन सब मे संघ कि बराबरी करणे वाला एक भी रत्न नहीं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥


बुद्ध के सीवा मेरे लिए कोई और दुसरा शरण नहीं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥
धर्म के सीवा मेरे लिए कोई और दुसरा शरण नहीं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥
संघ के सीवा मेरे लिए कोई और दुसरा शरण नहीं, इस सत्य वचन से मेरा कल्याण हो ॥


मेरे सभी प्रकार भय, शत्रुता, रोग का नाश हो, मुझें सुखी तथा दिर्घ आयु प्राप्त हो ॥


बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो, सभी देवता रक्षण करें और मेरा कल्याण हो ॥
धर्म के प्रभाव से मेरा मंगल हो, सभी देवता रक्षण करें और मेरा कल्याण हो ॥
संघ के प्रभाव से मेरा मंगल हो, सभी देवता रक्षण करें और मेरा कल्याण हो ॥


अप्रिय शब्द, पापग्रह, बुरे सपने उन सभी का बुद्ध, धर्म और संघ के प्रभाव से नाश हो ॥जयमंङगल अठ्ठगाथा


जिन मुनींद्र ने सुदृढ हत्यार धरण करके, सहस्रबाहु, गिरीमेखल नामक हाथी पे सवार होकर अपनी भयानक सेना के साथ आये हुए मार को अपने दान आदी धर्म बल से विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥

जिन मुनींद्र ने मार के अलावा समस्त रात्री भर संग्राम करने वाले घोर दुर्धर तथा निष्ठुर ह्रदय वाले आलवन नाम के यक्ष पर अपने क्षांती और संयम के बल पर विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥

जिन मुनींद्र ने दावाग्नीचक्र और बिजली के समान अत्यंत भयानक नालागीर हाथी पर अपने मैत्री के अभिषेक से विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥

जिन मुनींद्र ने हाथ मे तलवार लेकर एक योजन तक दौडने वाले अत्यंत भयानक अंगुलीमाल पर अपने ऋद्धीबल से विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥

जिन मुनींद्र ने गर्भवती कि नकल कर के (बुद्ध पर कलंक लगाने के लिए) जनता के समक्ष दुष्ट वचन करने वाली चिंचा नाम के स्त्री पर अपने शांति और सौम्यता आदी गुणों से विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥

जिन मुनींद्र ने सत्य का साथ छोडे हूए असत्यवादी, अभिमान, वाद विवाद में उत्तम अहंकार से अंधे हूये हूए सच्चक नाम के परिव्राजक पर अपने प्रज्ञा के प्रदीप द्वारा विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥

जिन मुनींद्र ने महाऋद्धीसंपन्न, नंदोपनंद नाम के भुजंग पर अपने महामोग्गलायन शिष्य के द्वारा ऋद्धी और उपदेश के बल से विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥

जिन मुनींद्र ने भयंकर मिथ्या दृष्टी वाले, विशुद्धज्योती, महारिद्धीसंपन्न बक नाम के ब्रह्मा पर विजय प्राप्त की उन भगवान बुद्ध के प्रभाव से मेरा मंगल हो ॥धम्मपालन गाथा


कोई पाप न करना, सद्धर्म का पालन करना, अपने मन को सद्धर्म के मार्ग पर लगाना यहीं बुद्ध का शासन हैं ॥
सुचरीत धर्म का आचरण करें, दुराचरण का त्याग करें, धर्माचरण करने वालों को सभी लोक में सुख से नींद आती हैं ॥

सोमवार, २ जून, २०१४

बोधीसत्वाचा धर्म कोणता......?
बोधीसत्व हे सामान्य मानव नसतात. सामान्यांना विचलीत करणाऱ्या, दुःखी करणाऱ्या किंवा आनंदी करणाऱ्या अनेक सामान्य गोष्टी ह्या बोधीसत्वाला विचलीत करु शकत नाही. त्यांचा आनंद सामान्यांसारखा कारणावर आधारीत नसतो, कारण कारणावर अवलंबुन असणारा आनंद हा अर्थातच अशाश्वत असतो. ते त्यांच्या मनाच्या सामर्थ्यावर सुखाची प्राप्ती करतात. बोधीसत्व सामान्य मानवाच्या मनावर असणारी बंधने तोडून निर्वाणाकडे वाटचाल करतात.

सामान्य मानवासारखे त्यांचे विचार संकुचीत नसतात. सामान्य मानवांमध्ये असणारी 'सांप्रदाया' सारखी संकुचीत बंधने सुद्धा त्यांच्यावर नसतात त्यामुळे ते हिंदु, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन यांच्यापैकी ते कोणत्याही सांप्रदायाचे नसतात. याठिकाणी 'बौद्ध' हा शब्द अनेकांना खटकला असेल, पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी आपल्य शिकवणीला कधीच 'बौद्ध धर्म' किंवा अनुयायांना 'बौद्ध' असे म्हटले नाही. मग काय म्हटले....? भगवानांनी आपल्या शिकवणीला धर्म (धम्म) म्हटले आणि अनुयायांना धार्मिक (धम्मिक).. जो विश्वव्यापी आहे, तो 'सांप्रदाया' सारख्या संकुचीत संकल्पनेच्या कक्षेत बसत नाही.

याअर्थी जगात केवळ दोनच धर्म आहेत. कोणते दोन....? १. सद्धर्म आणि २..अधर्म.

आणि हे दोन धर्म सुद्धा कोणत्याही सांप्रदायाच्या कक्षेत येत नाही. हिंदु, बौद्ध, जैन, शीख, इस्लाम, ख्रिश्चन या सांप्रदायातील लोक सुद्धा काही अधर्मी तर काही सद्धर्मी असतात.

धर्म आणि सांप्रदायातील मुळ फरक म्हणजे सांप्रदाय हा जन्माधारीत व्यवस्थेवर चालतो तर धर्म हा कर्माधारीत असतो. एखादा व्यक्ती कोणत्या सांप्रदायात जन्मला हे त्याच्या जन्मावरुन ठरते. कोणी हिंदु दांपत्याच्या घरी शीख होतो, इत्यादी ही जन्माधारीत व्यवस्था आहे. तो कोणत्या सांप्रदायाचा आहे हे त्याच्या जन्मावरुन ठरते. परंतु धर्माच्या बाबतीत तसे नाही. ती कर्माधारीत संकल्पना कोणी सद्धार्मिक किंवा अधार्मिक आहे हे त्याच्या चांगल्या
परमपुज्य दलाई लामांच्या विरुद्ध केला जाणारा प्रचार...या मुद्याची सुरुवात करण्या पुर्वी मी तुम्हाला काही सुचवु इच्छीतो - तुमचा जर कर्म सिद्धांतावर विश्वास असेल तर कृपया दलाई लामांची किंवा अन्य कोणत्याही विद्वानांची निंदा करु नका.

दलाई लामा हे ब्राह्मण आहेत. आता ब्राह्मण कोणाला म्हणावे, हे मला नव्याने सांगावे लागु नये. ब्राह्मण विद्वानाला म्हटले जाते, कृपया याला एखाद्या विशीष्ट समाजातील लोकांबद्दल वापरुन सांप्रदायीक रुप देऊ नका.. आणि ब्राह्मणांचा अपमान करणे, त्यांची निंदा हे फार मोठे पाप आहे. याबाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते.

एक कोकालिक नावाचा भिक्खु होता त्याची भगवान गौतम बुद्धांवर नितांत श्रद्धा होती परंतु तेवढाच तो सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांची निंदा करीत असे. तेव्हा भगवानांनी त्याला जवळ बोलावुन समजावुन सांगीतले कि, सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांची निंदा करु नकोस, तो म्हणाला., भगवानांच्या प्रति माझ्या मनात खुप श्रद्धा आहे ; परंतु सारीपुत्र आणि महामोग्गलायन हे पापकर्माच्या आहारी गेले.

भगवानांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही समजावल्यावर कोकालिक भिक्खुने ते समजुन घेतले नाही, आणि तो निघुन गेल्यावर त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यु झाला.


तेव्हा भगवानांनी इतर भिक्खुंना सांगीतले कि सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांच्याप्रती मनात वैरभाव ठेवल्यामुळे त्याचा जन्म पद्म नावाच्या नरकात झाला. त्यावेळी भगवान म्हणाले –

मानवाच्या जन्मासोबतच त्याच्या तोंडात एक कुऱ्हाड उत्पन्न होत असते. मुर्खपणाच्या, वाईटपणाच्या गोष्टी बोलत असता तो तिने स्वतःलाच तोडत असतो. जो निंदनीय आहे, त्याची प्रशंसा करीत असतो आणि जो प्रशंसेस पात्र आहे त्याची निंदा करीत असतो. तो तोंडाने पापकर्म करीत असतो, त्या पापामुळे त्याला कधीही सुख मिळत नसते.
ते दुर्भाग्य तर फार लहान आहे, जो जुगारात आपले सर्व धन गमावतो., सर्वात मोठे दुर्भाग्य तर हे आहे, की जो बुद्धाच्या प्रति काही अपराध करतो. काया, वाचा आणि मनाला पापात लावुन शेकडो, हजार, निर्बुद्ध, आर्य पुरुषांची निंदा करणारा, नरकात कुजत असतो..


- (संयुक्त निकाय ६:१:१०)

या कथेचा संदर्भ घेऊन यानंतर आपण आर्य पुरुषांची निंदा करणार नाही अशी आशा आहे.


दलाई लामा मे, २०१४ च्या अखेरीस सोमैय्या महाविद्यालय परीसर, विद्याविहार, मुंबई येथे गेले असताना त्यांनी हिंदु देवांना नमस्कार केला याचा संदर्भ घेऊन अनेक बऱ्या - वाईट प्रतिक्रीया आल्या.
महाराष्ट्रातील काही कट्टर सांप्रदायीक लोक जे दलाई लामांची जे निंदा करतात, त्यांना टिका करण्याची संधीच मिळाली असेल. तर काही मित्र म्हणाले - कि दलाई लामा हे भारताच्या आश्रयाला आहेत, त्यांना तिबेट मुक्त करायचा आहे म्हणुन इथल्या लोकांना विश्वासात घेण्यासाठी ते असे करीत आहेत. त्यांना मी असे सांगु इच्छितो की, दलाई लामांचे विचार सामान्यांसारखे संकुचीत नाही. ते बोधीसत्व आहेत, निर्वाणगामी आहेत, निर्वाणाकडे वाटचाल करीत, स्वार्था सारख्या विचारांचा त्यांनी केव्हाच पराभव केला आहे.

दलाई लामांनी जे काही केले हा त्यांचा धर्माचाच भाग आहे. कोणता आहे त्यांचा धर्म.....?


असीम करुणा, मंगल मैत्री आणि शांतीचा प्रसार हा त्यांचा धर्म आहे.

बोधीसत्वाचा मुख्य धर्म हा दहा भांगामध्ये विभागला आहे. कोणते दहा ... ?

• दान

• शील

• नैष्कर्म

• विर्य

• क्षांती

• सत्य

• अधिष्ठान

• मैत्री

• उपेक्षा...

या सर्वांचे पालन करणे हाच त्यांचा खरा धर्म आहे ...

भगवान गौतम बुद्ध जेव्हा बोधीसत्वच होते, त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली नव्हती. त्यावेळी त्यांनी सुद्धा याच धर्माचे पालन केले होते. या बद्दल चरिया पिटकात बोधीसत्वाच्या कथा सांगीतल्या आहेत...You might like to read :

चरिया पिटक मराठी..... [Download Ebook]

मंगल मैत्री आणि करूणेचा शास्ता

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध..

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा ... .


मंगळवार, १३ मे, २०१४

मंगल मैत्री आणि करूणेचा शास्तासर्व देव आणि मनुष्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक मंगल कामना...
वैशाखी पौर्णिमेचे महत्व अनन्य साधारण आहे. याच दिवशी :

१. बोधीसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला,
२. यशोधरेचा जन्म,
३. सिद्धार्थ - यशोधरेचा मंगल परिणय,
४. बोधीसत्व सिद्धार्थाला संबोधी प्राप्ती आणि

५. भगवान गौतम बुद्धांचे महपरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले म्हणुन या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात.बोधीसत्वाने गृहत्याग केला याबद्दल काही टिकाकार अन्याय्य टिका करत असतात. आपल्या बायको, मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता काय?सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.


आपण या लेखामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या असीम करुणा, मंगल मैत्री आणि सहिष्णुता या गुणांबद्दल माहीती घेऊया.....


सेलो यथा एकघना वातेन समीरती, एवं निंदापसंसासु न समिञ्ज पण्डिता 

- (धम्मपद : ८१)

अर्थ : ज्याप्रमाणे शैल पर्वत वाऱ्याने हलत नाही, त्याचप्रमाणे विद्वान निंदा किंवा प्रशंसेने विचलीत होत नाही. या सुभाषिता प्रमाणेच भगवान बुद्धांचे व्यक्तीत्व होते. त्यांची मंगल मैत्री महासागराप्रमाणे अथांग तर सहिष्णुता हिमालयच्या सर्वोच्च शिखराप्रमाणे स्थीर होती. ज्याप्रमाणे हिमालयाला कितीही वादळांचा सामना करावा लागला तरी तो स्थीर राहतो आणि महासागरातुन कितीही पाणी काढले आणि त्यात टाकले तरी त्याला काहीच फरक पडत नाही, अगदी त्याचप्रमाणे भगवान बुद्धांची कोणी कितीही निंदा किंवा प्रशंसा केली तरी त्याने काहीच फरक पडत नव्हता., कोणी भगवानांची निंदा केली तेवढ्याने त्यांच्या मनात असलेली निंदकबद्दलची करूणा आणि मंगल मैत्री कमी होत नव्हती. याचे प्रमाण त्रिपिटकात बरेच आहे

सुत्तपिटकाची सुरुवात अशाच एका दृष्टांताने होते. ब्रह्मजाल सुत्तामध्ये सुप्रिय आणि भारद्वाज हे दोघे गुरु शिष्य भगवानांबद्दल चर्चा करीत असताना ब्रह्मदत्त हा भगवान बुद्धांची प्रशंसा करीत असतो तर सुप्रिय निंदा. यावर भगवान म्हणतात - भिक्खुंनो, कोणीही बुद्धाची, धर्माची किंवा संघाची निंदा केली तर त्याच्यावर कोपु नका, त्याच्याशी वैरभावाने वागु नका, असे केल्याने स्वतःचीच हानी होते. याउलट जर तुमच्यावर अथवा बुद्ध, धर्म आणि संघावर जे आरोप केले आहेत त्याच्यामध्ये किती सत्यता आहे याची शहानिशा करा.


अंबठ्ट सुत्तामध्ये अंबठ्ट नावाचा माणवक म्हणतो - श्रमण गौतम हा मुंडक, नीच, चांडाळ, ब्रह्माच्या पायातुन उत्पन्न झालेला आहे. एवढेच नव्हे तर त्याने शाक्यांवर सुद्धा अनेक आक्षेप घेतले. त्याच्या आरोपावर सम्यक संबुद्धांनी संयमाने अंबठ्टाच्या 'कण्हायण' गोत्राचा त्याला सांगताना सिद्ध केले की तो शाक्यांचे पुर्वीचे राजे अक्कोसक आणि दासी पुत्र 'कण्ह' चा वंशज आहे आणि त्याला गोत्रवाद, जातीवादाचा गर्व सोडण्याचा उपदेश केला.जातित्थद्धो, धनत्थद्धो, गोत्तत्थद्धो च यो नरो, संञ्ञ्ति अतिञ्येति पराभवो मुखं

- पराभव सुत्त १४


अर्थ : जी व्यक्ती आपल्या जन्मजातीचा, धनसंपत्तीचा, गोत्राचा गर्व करते आणि त्याच अहंकाराने आपल्या इतर समाज बांधवांचा अनादर करते हेच तिच्या पराभवाचे कारण आहे.वसल सुत्तामध्ये अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मण म्हणतो - हे मुंडक श्रमणा, तिथेच थांब, हे वृषला, हे चांडाळा तिथेच थांब पुढे येउ नकोस. अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मणाने केलेल्या निंदेने जराही विचलीत न होता, जराही क्रोध न करता भगवानांनी त्याला वृषल व्यक्तीचे लक्षण सांगीतले. जन्माने कोणीही विद्वान किंवा चांडाळ होत नाही, तो त्याच्या कर्मानेच होतो.


मागण्डिय सुत्तामध्ये, मागण्डिय परिव्राजक भगवानांची निंदा करताना म्हणाला - हा श्रमण गौतम मानवतेचा विनाशक आहे, तो हत्यारा आहे. मागण्डियाने केलेल्या निंदेने भगवानांनी जराही विचलीत न होता त्याला सदाचाराचा उपदेश केला, त्या उपदेशाने मागण्डिय परिव्राजक इतका प्रभावीत झाला की त्याने संघप्रवेशाची मागणी केली, तेथेच त्याची उपसंपदा झाली आणि खुप कमी काळात त्याने अर्हंतपद प्राप्त केले...

धम्मपदाच्या अट्ठकथेमध्ये, कोसंबीचा राजा उदयनच्या महाराणीने, भगवान बुद्धांनी तिच्या लग्न प्रस्तावाचा अस्वीकार केला होता हा अपमान ध्यानी ठेऊन तिने भगवानांना शिव्या द्यायला आपल्या दासांना पाठविले. ते त्यांच्याजवळ येउन म्हणु लागले - श्रमण गौतम तु चोर आहेस, तु मुर्ख, तु गाढव आहेस. यावर आनंद भगवानांना म्हणाले - भगवान.. हे लोक अभद्र बोलत आहेत. आपण दुसऱ्या नगरात चारीका करायला जाऊया. यावर सम्यक संबुद्धांनी प्रत्युत्तर दिले. - जर त्या नगरातही असेच लोक मिळतील तर मग आपण कुठे जावे...? मी युद्धामध्ये उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे, ज्याप्रमाणे युद्धामध्ये हत्ती बाणांना सहन करतो, त्याचप्रमाणे मी अपशब्द सहन करेन.

यक्ष संयुत्तामध्ये सुचीलोम आणि आळवक यक्षांनी सुरुवातीला भगवानांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण आपली डाळ शिजत नाही आहे हे पाहुन त्यांनी भगवान बुद्धांना काही प्रश्न विचारले आणि योग्य उत्तरे न दिल्यास - छाती फोडुन, दोन्ही पाय पकडुन गंगेच्या पलीकडे नेउन फेकण्याची धमकीच दिली. परंतु, भगवान बुद्धांनी या धमकीने जराही विचलीत न होता स्मित केले आणि म्हणाले - ना कोणी देव, गंधर्व, मार, असुर किंवा ब्रह्मा माझा पराभव करु शकेल. असे म्हणत त्या महाकारुणीक प्रज्ञासुर्याने यक्षांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देउन त्यांना इतके प्रभावीत केले की त्यांनी भगवानांची माफी मागुन उपासक संघप्रवेशाची याचना केली.


सुर्योदयानंतर काजवे जसे लुप्त होतात तशी विरोधकांची अवस्था झाली होती, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होते. धम्मपदाच्या अट्ठकथेत विरोधकांनी सुंदरी नावाच्या परिव्राजीकेच्या प्राणघाताचा आरोप भगवान बुद्धांवर आणि त्यांच्या श्रावक संघावर लावला परंतु भगवान बुद्ध त्याने अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी आपल्या श्रावकांना संयम बाळगण्याचा आणि शेवटी सत्य जगासमोर आलेच.

जयमंगल अष्टगाथेच्या ५ व्या गाथेच्या कथेत चिंचा नावाची माणविका गर्भवतीचे सोंग घेउन भगवान बुद्धांवर आरोप करते - की मी श्रमण गौतमांपासुन गरोदर आहे पण भगवानांवर तिच्या निंदेचा काहीच परिणाम होत नाही आहे हे पाहुन ती घाबरली आणि तिच्या पोटाला बांधलेला लाकडाचा तुकडा ढिला झाला आणि खाली पडला ते पाहुन तिथे जमलेल्या लोकांनी तिची निंदा करीत तिला लाथाबुक्क्यांनी तुडविण्याचा प्रयत्न केला परंतु महाकारुणीक अर्हंत सम्यक संबुद्ध भगवानांनी त्यांना अडविले आणि तिला मुक्त करायला सांगीतले.


ब्राह्मण संयुत्तात भारद्वाज आणि असुरिंदक ब्राह्मण भगवान बुद्धांना शिवीगाळ करु लागले परंतु बदल्यात श्रमण गौतम क्रोध करीत नाही आहेत हे पाहून ते घाबरले. तेव्हा भगवान म्हणाले - ज्याचे चित्त्त अगदी शांत झालेले आहे अशा क्रोध रहिताला क्रोध कसला...? जो रागावणाऱ्यावर परत रागावत असतो त्याच्यामुळे त्याचीच हानी होते. क्रुद्धाच्या प्रती क्रोध न करणारा अजिंक्य, संग्राम जिंकत असतो. हे ऐकल्यावर त्यांनी संघप्रवेश केला आणि ते अर्हंतांपैकी एक झाले.


भगवान बुद्धांच्या संघामध्ये जातीभेद नव्हता, ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे पाणी ओळखणे शक्य नाही, त्याचप्रमाणे संघामध्ये प्रवेश केल्यावर त्यांची जात लोप पावत होती. सुंदरीक सुत्तामध्ये सुंदरीक ब्राह्मणाने भगवानांचे मुंडन पाहुन तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची निंदा करत त्यांना त्यांची जात विचारली, तेव्हा भगवान शांतचित्ताने म्हणाले - जात विचारु नकोस कर्म विचार, लाकडाने सुद्धा अग्नी उत्पन्न होत असतो, नीच समजल्या जाणाऱ्या कुळातुन सुद्धा धीर मुनी होत असतात.


भगवानांच्या जीवनातुन आपल्याला प्रेरणा मिळते की जरी कोणी आपली कितीही निंदा केली तरी जराही विचलीत न होता प्रसंगाला सामोरे जावे. जर निंदकाच्या निंदेत सत्य असेल तर तात्काळ आपल्याला सुधारावे परंतु निंदकावर कोपु नये, त्याने स्वतःचीच हानी होते. निंदकाच्या प्रती नेहमीच मंगल मैत्रीची भावना ठेवावी.
यावर कल्याण मित्रांनी सांगीतलेले एक सुभाषित आठवले - हिरवळ नावाला सुद्धा दिसु नये, जो भेटतो तो कठोर व्यवहार करणारा नसावा, उगाच अपमान करणारा निघावा, सगळ्या घटना मनाविरुद्ध घडल्या तरी आपल्या मनात जरासुद्धा द्वेष बाळगत नाही तोच बुद्धाचा खरा श्रावक आहे. आपल्याला अशा अवस्थेत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे. भगवान बुद्धांची अनेकांनी निंदा केली परंतु निंदकाच्या प्रती त्यांच्या मनात नेहमीच करूणा आणि मंगल मैत्रीचीच भावना होती.
ज्याच्या विजयाचा क्रोधरुपी मार पराभव करु शकला नाही, त्या सम्यक संबुद्ध अर्हंत भगवानांना आपण आपल्या जीवनात कोणत्या मार्गाने न्याल.....?

सर्व जीव सुखी होवोत,
सर्वांना हिताचा मार्ग सापडो...


See Also :
भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध...

चरिया पिटक मराठी..... [Download Ebook]
शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय...? (भाग १ : प्रतित्य समुत्पादाची व्याख्या)


प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय....? स्वतःला बौद्ध म्हणुन मिरविणाऱ्या अनेकांकडे या प्रश्नाचे उत्तर राहत नाही. तर ज्यांनी प्रतित्य समुत्पाद हे नाव यापुर्वी ऐकले असेल तर ते सांगतील कि प्रतित्य समुत्पाद हा बौद्ध धर्माचा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे जो आत्मा आणि ईश्वर यांचे अस्तित्व नाकारतो. याच्यापुढे कशाचीही माहीती राहत नाही.


प्रतित्य समुत्पाद हा सखोल ब्रह्मांडाच्या उत्पतीचे उत्तर देणारा एकमेव सुत्र आहे, तो कोरा दार्शनिक सिद्धांत नाही तर ती प्रत्यक्ष अर्हंत सम्यक संबुद्ध भगवानांची अनुभूती होती.


प्रतित्य समुत्पाद हा पुनर्जन्माच्या चक्राचे वैज्ञानीक विश्लेशन करणारा सम्यक संबुद्धांनी स्वतः अनुभव केलेला सिद्धांत आहे जो त्यांनी सांगीतलेल्या मार्गावर चालुन आपल्याला सुद्धा अनुभवता येतो.

सामान्यांना वाटते कि भगवान बुद्ध आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म, इ. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या गोष्टींना मानीत नव्हते. अशी अनेकांची समजुत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी या लेखाच्या सुरुवातीलाच सांगु इच्छितो कि महान पाली टीकाकार आचार्य बुद्धघोष यांनी पट्ठानप्पकरणकथा ग्रंथामध्ये लिहिले आहे की,,


हीच ती महत्वपूर्ण बुद्ध तत्वज्ञानाची कसोटी आहे ज्यामुळे नित्यावाद, नित्य, ध्रुव पदार्थाचे गवेषक ह्या नित्यावादाची साथ सोडतात, कारण भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धर्मात ईश्वरासाठी आणि आत्म्यासाठी कुठलेच स्थान ठेवले नाही. तरी तो पुनर्जन्म आणि कुशल, अकुशल कर्माच्या विपाकाला मानतो.भगवान बुद्धांच्या धर्माचा वापर इतरांच्या श्रद्धास्थानांना (देवांना?) शिव्या देण्यासाठी वापर करणाऱ्या लोकांनी हे आचार्य बुद्धघोषांचे हे वचन नेहमीच लक्षात ठेवावे.
भगवान बुद्ध ईश्वर मानीत नाहीत, आत्मा मानीत नाहीत परंतु पुनर्जन्म मानतात, त्याचा कर्मसिद्धांत मानतात. अनेकांना असे वाटेल कि पुनर्जन्म म्हणजे कसलाही वैज्ञानीक आधार नसलेली एक अंधश्रद्धा आहे. किंवा काहींना असे वाटेल कि भगवान गौतम बुद्धांच्या (विज्ञानवादी?) चरित्र्यात त्यांची निंदा करणाऱ्यांनी (भटांनी?) केलेली भेसळ आहे. परंतु तसे काही नाही. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे या लेखमालिके मधुन मिळतीलच परंतु हा लेख संपुर्ण श्रद्धेने वाचा कारण यात काहीच अंधश्रद्धा नसुन भगवान गौतम बुद्धांनी आपले अनुभव आपल्याला सांगीतले आहेत. त्या सिद्धांतांचा आपण सुद्धा त्या मार्गावर चालुन अनुभव करु शकतो.


भगवान गौतम बुद्धांच्या काळातील श्रमण आणि ब्राह्मणांध्ये मुख्यतः २ प्रकाराची मते होती. १. शाश्वतवादी आणि २. उच्छेदवादी.

शाश्वतवादी : शाश्वतवादी मताचे लोक मानीत असत कि, आत्मा हा शाश्वत, नित्य, ध्रुव, अमर आहे. शरीर मेल्यानंतर तो दुसऱ्या देहात प्रवेश करतो. आणि अशा प्रकारे आत्म्याच्या संसरणाद्वारे पुनर्जन्म होत असतो..

उच्छेदवादी : तर दुसरी कडे उच्छेदवादी समजत असत कि आत्मा हा चार महाभूतांपासुन बनलेला आहे, १. पृथ्वी, २. आप, ३. तेज, ४. वायू. शरीरनाशानंतर ते सर्व घटक आपापल्या घटकामध्ये जाउन मिळतात आणि मग काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे पुनर्जन्म नाही असा त्यांचा समज होता.


परंतु भगवान बुद्धांचा सिद्धांत हा दोघांच्याही मध्यम आहे. ना त्यांचा आत्म्यावर विश्वास आहे ना पुनर्जन्माला विरोध. भगवान गौतम बुद्ध आत्मा मानीत नाहीत, परंतु पुनर्जन्म मानतात तो कशाचा....? याचे उत्तर आपल्याला प्रतित्य समुत्पाद देते. वर सांगीतलेली शाश्वतवादी आणि उच्छेदवादी मते केवळ पुर्वकथन ऐकिवावर आणि काल्पनिक अनुमानांवर आधारीत होती. त्यांना कसलाही आधार नव्हता. ना ती अनुभवता येत होती. परंतु भगवानांचा प्रतित्य समुत्पाद मात्र अनुभवता येतो.


प्रतित्य समुत्पाद आपल्याला चार आर्यसत्याचे दर्शन करवितो. पहिले आर्यसत्य म्हणजे जगात दुःख आहे, हे आता सर्वमान्य आहे. परंतु दुसरे आर्यसत्य म्हणजे दुःखाची कारणे कोणती ..? हा प्रश्न विचारल्यावर अनेक लोक सांगतात कि, परिक्षेत कमी मार्क पडणे, मासीक पगार महिनाभर न पुरणे, प्रेयसी - प्रियकर सोडुन जाणे, इत्यादी... परंतु हे मुख्य कारण नव्हे. सर्व जगात आजारपण, मरण, शोक, रडणे, दुःख, उदासीनता यांचे अखंड साम्राज्य आहे. परंतु या सर्वांचे मुळ कारण काय आहे..? तर याचे सरळ आणि सोपे उत्तर जन्म. जन्म आहे म्हणुनच या सर्व गोष्टी घडत असतात.
जन्म कशामुळे घडतो.? जन्म अविद्येमुळे होतो... जन्माचे मुळ कारण अविद्या आहे.


अविद्या असल्याने संस्कार होत असतात. संस्कार असल्याने विज्ञान होते. विज्ञान असल्याने नामरुप होत असतात. नामरुप असल्याने षडयातन होत असते. षडयातन असल्याने स्पर्श होत असतो. स्पर्श असल्याने वेदना होत असते. वेदना असल्याने तृष्णा होत असते. तृष्णा असल्याने उपादान होत असते. उपादान असल्याने भव होत असते. भव असल्याने जन्म होत असतो. जाति असल्याने जरा, मरण, शोक, रडणे, चिंतीत होणे होत असते. अशा प्रकारे सर्व दुःख समूहाचा उदय होत असतो, यालाच प्रतित्य समुत्पाद म्हणतात.
त्या अविद्येला संपूर्णपणे हटविल्याने आणि नष्ट केल्याने संस्कार होत नसतात. संस्काराचा निरोध केल्याने विज्ञान होत नसते. विज्ञानाचा निरोध केल्याने नामरुप होत नसते. नामरुपाचा निरोध केल्याने षडायतन होत नसते. षडायतनाचा निरोध केल्याने स्पर्श होत नाही. स्पर्शाचा निरोध केल्याने वेदना होत नाही. वेदनेचा निरोध केल्याने तृष्णा होत नाही. तृष्णेचा निरोध केल्याने उपादान होत नसते. उपादानाचा निरोध केल्याने भव होत नाही. भवाचा निरोध केल्याने जन्म होत नाही. जन्माचा निरोध झाल्याने ना म्हातारपण, ना आजारपण, ना मरण, ना शोक, ना रडणे, ना ओरडणे, ना दुःख करणे. अशा तऱ्हेने या अविद्येला हटविल्याने संपुर्ण दुःखातुन मुक्ती मिळते..आर्य श्रावक प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत चांगल्या प्रकारे समजतात..

तो पुर्वांत सामान्यांच्या लक्षात राहत नसतो., कि जी भुतकाळात होतो, मी भुतकाळात नव्हतो, मी भुतकाळात काय होतो, मी भुतकाळात कसा होतो, मी भुतकाळात काय होऊन काय झालो...?


त्याला अपरांत सुद्धा समजत नाही., कि मी भविष्यात होणार कि होणार नाही, भविष्यात काय होईन, भविष्यात कसा होईन, भविष्यात काय होऊन काय होणार आहे..

तो प्रत्युत्पन्न म्हणजे वर्तमानाला घेउन सुद्धा संशय करीत नाही. मी आहे, मी नाही, मी काय आहे, मी कसा आहे, माझा जीव कोठुन आला आहे, आणि कोठे जाणार आहे...?अविद्येत खितपत पडलेला दुष्ट मनुष्य पाप धर्मात पडुन दुःखपुर्ण जीवन जगत असतो. महान परमार्थापासुन हात दुर जातो परंतु आर्य श्रावक विद्येला जाणित पाप धर्मापासुन स्वतःला वाचवित आनंदाने विहार करतो.


प्रतित्य समुत्पादाचा विषय हा खुप मोठा असल्याने तो अनेक लेखांमध्ये विभागुन एका लेखमालिके द्वारे आपल्या पुढे मांडण्यात येईल. या लेखामध्ये प्रतित्य समुत्पादाची व्याख्या समजावुन सांगीतली पुढील लेखात या जन्माला (दुःखाला) कारणीभुत घटकांबद्दल थोडक्यात माहीती पाहुया....


सर्व जीव सुखी होवोत
सर्वांना हिताचा मार्ग सापडो...
See Also :
चरिया पिटक मराठी [EBook Download]

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा..

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे.. (धम्मगुण - नक्की वाचा)

सोमवार, १४ एप्रिल, २०१४

चरिया पिटक मराठी.....चरिया पिटक हे नाव तसे सामान्य वाचकांसाठी अपरीचीतच, परंतु पिटक हे नाव वाचताच धर्माच्या संबंधी आहे याची जाणीव होते. या पुस्तकाच्या नावाचा अर्थ होतो अर्थ होतो बोधीसत्वाच्या जीवनचर्या. भगवान गौतम बुद्धांनी त्यावेळी बुद्धत्वाची प्राप्ती केली नव्हती ते बोधीसत्वच होते. तो बराच मोठा कालावधी आहे, परंतु भगवान सारीपुत्राला आपल्या पुर्वजन्माच्या चर्यांबद्दल या पुस्तका मध्ये सांगतात कि त्यांनी कशा प्रकारे दहा पारमिता पूर्ण केल्या.

चरिया पिटकाचे तिपिटकातील स्थान शोधा...


हे पुस्तक वाचकांच्या स्वाधीन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या काळात धम्म साहित्य लिहिने, छापणे, विकणे याला लोकांनी आपला धंदाच बनविला आहे. मराठी इंटरनेट विश्वात धम्म साहित्याची कमतरता लक्षात घेता आमच्या संघाने मोफत धम्म सहित्य उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याच कार्यक्रमाचे एक पाउल म्हणजे चरिया पिटक मराठी नावाचे पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत. हे पुस्तक प्रकाशीत करताना बऱ्याच लोकांचे कळत - नकळत सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार....

साधू साधू साधू .....

सर्व जीव सुखी होवोत
सर्वांना हिताचा मार्ग सापडो..

सोमवार, १० मार्च, २०१४

बौद्ध साहित्य परिचय (ग्रंथ नव्हे : संपूर्ण ग्रंथालय)प्रत्येक धर्माला त्याच्या शिकवणी नुसार एक पवित्र समजले जाणारे पुस्तक असते. ख्रिश्चनांचे बायबल, मुस्लीमांचे कुराण, त्याचप्रमाणे बौद्धांचे त्रिपिटक..! परंतु त्रिपिटक म्हणजे कुराण - बायबल सारखे एखाद्या ग्रंथाचे नाव नसुन ग्रंथालयाचे नाव आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण बौद्धांच्या धर्मग्रंथाबद्दल नव्हे तर बौद्धांच्या धर्मग्रंथालया बद्दल माहिती घेऊया...


भाषेचे पावित्र्य नाही..!प्रामुख्याने बौद्ध साहित्य आपल्याला पाली आणि बौद्ध मिश्र संस्कृत या भाषेमध्ये सापडते. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि धम्माची स्वतःची अशी एक कोणतीही पवित्र समजली जाणारी भाषा नाही. भगवान बुद्धांचा धर्म प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये शिकण्याची परवानगी स्वतः भगवान गौतम बुद्धांनी दिली आहे, बौद्ध विश्वात हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.


एकदा (उपसंपदेपुर्वी ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले) दोन तरुण भिक्खु एकदा भगवानांजवळ आले, आणि त्यांना म्हणाले, कि आम्हाला भगवानांची शिकवण संस्कृतमध्ये भाषांतर करण्याची परवानगी द्यावी. परंतु भगवान गौतम बुद्धांनी याला सरळ नकार दिला. याच्यामागचे मुख्य कारण म्हणजे संस्कृत हि जनभाषा नव्हती तर देवांची भाषा समजल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेला समजण्याचा आणि शिकण्याचा अधिकार तेवढा तो एखाद्या विशिष्ट वर्गालाच होता. भगवान म्हणाले माझ्या शिकवणीचे संस्कृत मध्ये भाषांतर झाले तर ती केवळ एखाद्या विशिष्ट वर्गा पुरताच मर्यादीत होईल. माझी शिकवण प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेत शिकवण्याचा अधिकार आहे. जेव्हा तुम्हाला संस्कृत येते तेव्हा तुम्ही संस्कृत मध्ये शिका. हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.


आमच्याकडे एक ग्रंथ नाही, संपुर्ण ग्रंथालय आहे.आज जगात धर्म या नावाने वाढणारे विविध सांप्रदाय आहेत. आणि धर्मग्रंथ म्हणुन ओळखले जाणारे त्यांचे स्वतःचे एक पुस्तकही आहे. यहुदींचे बायबल (जुना करार), इस्लामचे कुरआन, ख्रिस्त्यांचे बायबल (नवा करार), हिंदुंची गीता, वेदिकांचे वेद, शिखांचे गुरु ग्रंथ साहीब, इत्यादी, इत्यादी. या सर्वांचा विचार करता बुद्धाचा धर्म कोणत्या धर्मग्रंथाद्वारे सांगण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.. तेव्हा याचे सरळ आणि सोपे उत्तर म्हणजे बुद्धाच्या धर्माचे धर्मग्रंथ म्हणण्यासारखे एकही पुस्तक नाही तर संपुर्ण ग्रंथालय आहे.


जे त्रिपिटक या नावाने ओळखले जाते ते काही एकच पुस्तक नाही आहे, तर विविध ग्रंथांचा संग्रह आहे. या लेखामध्ये आपण बौद्ध साहित्याची व्याप्ती आणि थोडक्यात परिचय याबद्दल जाणुन घेऊया...


धम्माचे मुळ ग्रंथ त्रिपिटक ती भागात विभागले आहे.

१. विनयपिटक,
२. सुत्तपिटक,
३. अभिधम्मपिटक१. विनयपिटक :
सामान्यतः विनयपिटकामध्ये
(अ) महावग्ग
(ब) चुलवग्ग
(क) पाराजिक
(ड) पाचित्तिय
(इ) परिवार. या पाच ग्रंथांचा समावेश आहे.


२. सुत्तपिटक :
सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :

१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक


३. अभिधम्मपिटक :
अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.
१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठानपाली त्रिपिटकाशिवाय पाली वाङ्मयामध्ये पाली अनुपिटकांचाही समावेश होतो. अनुपिटक म्हणजे त्रिपिटकाच्या रचनेनंतर रचण्यात आलेले साहित्य.

पाली अनुपिटक :
१. नेत्तिपकरण
२. पेटकोपदेश
३. मिलिंद प्रश्न
४. विसुद्धीमग्ग
५. अट्ठकथा
६. टिका

दीपवंस, महावंस, चुळवंस, बुद्धघोसुप्पति, सद्धम्मसंगह, महाबोधिवंस, थूपवंस, गंधवंस, सासनवंस, अनागतवंस, बुद्धालंकार, जिनालंकार, तेलकटाहगाथा, जिनचरित, सद्धम्मोपाय, पञगतिदीपन, सहस्सवत्थुपकरण, इत्यादी ग्रंथांचा समावेश पाली अनुपिटका मध्ये होतो.


पाली त्रिपिटकाची व्याप्ती खुप मोठी आहे, जर आपण त्यांचा संग्रह केला तर ५०० पेक्षा जास्त पानांचे एक खंड अशाप्रकारे ४५ पेक्षा जास्त खंड बनतील. शिवाय त्रिपिटकाच्या अट्ठकथा, टिका यांची व्याप्ती मुळ त्रिपिटकापेक्षाही जास्त आहे.


शिवाय तिबेटियन साहित्याचे ३३७ खंड, चिनी साहित्याचे प्रत्येकी १००० पानांचे १०० खंड. याखेरीज मंगोलीय आणि जपानी साहित्यांचा विचार केल्यावर आपल्याला बौद्ध साहित्याची व्याप्ती किती मोठी आहे याचे अनुमान लावणे कठीणच आहे...


मराठी धम्मपद

आम्हाला फेसबुकवर Follow करा

भगवान बुद्धांचा भिक्खु संघ

मंगळवार, ४ मार्च, २०१४

भगवान बुद्धांचा संघ ( भाग २ : भिक्खुणी आणि उपासिका संघ)


मागील भागत आपण भगवान गौतम बुद्धांच्या श्रावक भिक्खु संघाबद्दल थोडक्यात माहीती पाहिली. या भागामध्ये आपण भगवान गौतम बुद्धांच्या शासनात असलेल्या श्राविकांच्या भिक्खुणी आणि उपासिका संघाबद्दल माहिती घेऊ या....


भिक्खुणी संघ१. महाप्रजापती गौतमी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघामध्ये सर्वात जास्त काळ विहार करण्याचा मान महाप्रजापती गौतमी यांना जातो. त्या क्षत्रीय शाक्यांचे महाराज शुद्धोधन यांच्या पत्नी होत्या.


२. खेमा : भगवान बुद्धांच्या भिक्खु संघामध्ये ज्याप्रमाणे धम्मसेनापती सारीपुत्र महाप्रज्ञावानांमध्ये अग्र आहेत, त्याचप्रमाणे भिक्खुणी संघामध्ये खेमा महाप्रज्ञावती श्राविकांमध्ये अग्र आहेत. त्यांचा जन्म मद्रदेशाच्या सिगाल नगरामध्ये झाला. त्या मगधराज बिंबीसार यांच्या पत्नी होत्या.


३. उप्पलवण्णा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघामध्ये सर्वात ॠद्धीमती श्राविकांमध्ये उप्पलवण्णा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील उच्च कुळामध्ये झाला.


४. पटाचारा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील विनयांचे पालन करणाऱ्या श्राविकांमध्ये पटाचारा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील उच्च कुळामध्ये झाला.


५. धम्मदिना : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील धर्म कथन करणाऱ्या श्राविकांमध्ये धम्मदिना अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृहामध्ये झाला.


६. नंदा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील ध्यानी श्राविकांमध्ये नंदा अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय कुळात झाला. नंदा ही महाप्रजापती गौतमी यांची मुलगी होती.


७. सोणा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात प्रयत्नशील असलेल्या श्राविकांमध्ये सोणा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


८. बकुला : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील दिव्य दृष्टी असलेल्या श्राविकांमध्ये बकुला अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


९. भद्दा कुण्डलकेसा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील भगवानांनी उपदेश केलेल्या धर्माचा सर्वात लवकर अनुभव करणाऱ्या श्राविकांमध्ये भद्दा कुण्डलकेसा अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृहामध्ये झाला.


१०. भद्दा कापिलानि : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील पुर्वजन्मांचे स्मरण करणाऱ्या श्राविकांमध्ये भद्दा कापिलानि अग्र आहेत. त्यांचा जन्म मद्रदेशाच्या सालनगरात झाला.


११. भद्दा कचाना : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील श्रेष्ठ प्रज्ञावती श्राविकांमध्ये भद्दा कचाना अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशातील कपिलवस्तू शहरामध्ये झाला.


१२. किसा गोतमी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात रूक्ष चिवर धारण करणाऱ्या श्राविकांमध्ये किसा गोतमी अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


उपासिका संघ१. सुजाता : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वप्रथम शरण येणाऱ्या उपासिकांमध्ये सुजाता अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील उरुवेला (बुद्धगया) मध्ये झाला.


२. विशाखा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात श्रद्धावती उपासिकांमध्ये विशाखा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


३. खुज्जुत्तरा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात जास्त धम्माचे ज्ञान असणाऱ्या उपासिकांमध्ये खुज्जुत्तरा अग्र आहेत, त्यांचा जन्म वैत्स्य देशाच्या कौशाम्बी शहरात झाला. त्या एका दासीच्या पुत्री होत्या.


४. सामावती : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील मैत्री भावनेत विहार करणाऱ्या उपासिकांमध्ये सामावती अग्र आहेत. त्यांचा जन्म भद्रवती राष्ट्राच्या भद्रिका शहरात झाला.


५. नंदमाता : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील ध्यान करणाऱ्या उपासिकांमध्ये नंदमाता अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशाची राजाधानी राजगृह शहरामध्ये झाला.


६. सुप्रवासा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात आनंददायी श्रद्धावती उपासिकांमध्ये सुप्रवासा अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कुंडीया गावात झाला..


७. सुप्रिया : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील रोगी श्रद्धावती उपासिकांमध्ये सुप्रिया अग्र आहेत. त्यांचा जन्म काशी देशाच्या वाराणसी शहरात झाला.


८. कात्यायनी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील अति प्रसन्न उपासिकांमध्ये कात्यायनी अग्र आहेत त्यांचा जन्म अवंति देशाच्या कुरुरघर शहरात झाला.
आम्हाला फेसबुकवर Follow करा

भगवान बुद्धांचा भिक्खु संघ

भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे...