गुरुवार, २५ जून, २०१५

स्त्रीयांच्या बाबतीत बुद्धांची वचने

 बुध्द, धर्म आणि संघ ह्या त्रिरत्नांच्या प्रती अनेक लोकांमध्ये बरेच समज - गैरसमज आहेत. त्यांच्यापैकीच एक म्हणजे अनेक स्त्री - वादी लोक भगवान बुध्दांना भारतीय स्त्रियांच्या अवनतीचे कारण मानतात. त्यांच्यामते भगवान बुद्धांनी आपल्या संघातील भिक्खुणी साठी जे काही नियम केले होते, त्याने भारतीय स्त्रीया ह्या गुलामगिरी मध्ये तर ढकलल्या गेल्याच, पण त्यातून बुद्धांची स्त्री विषयक मान्यता समजते ति म्हणजे, भगवान बुद्धांना स्त्री - पुरुष समानतेचा गंध मुळीच नव्हता, यावर स्त्री जन्म वाईट असतो, स्त्रीया पुरुषांच्या गुलाम असतात. वास्तवात धर्म कसल्याही प्रकारची विषमता शिकवीत नाही, मग ति जाति - आधारित असो किंवा लिंग - आधारित.  स्त्रीचा जन्म वाईट असतो किंवा स्त्रीया पुरुषांची गुलाम असतात असे त्रिपिटकात बुध्दांचे एकही वचन नाही, याउलट स्त्री जन्माची बुध्द स्तुती करतात, स्त्रीया ह्या श्रेष्ठ असतात, असे सांगणारी अनेक बुध्दवचने आहेत.

विरोधक ज्या आठ गुरुधर्मांच्या बद्दल बोलतात, त्याबद्दल काहीही बोलण्यापूर्वी त्यांनी त्या आठ गुरुधार्मांची चिकित्सा करावी. कारण बुध्द चिकित्सा नाकारत नाहीत, जेव्हा त्यांनी स्वतःची सुध्दा चिकित्सा करण्याचा उपदेश केलेला आहे. तथागतांची (शास्त्याची) चिकित्सा करा... (ते सुध्दा सर्व अंगांनी, स्वतः धर्मसुत्तांचा आणि धर्मविनयांचा अभ्यास करून, कारण धर्म इतका व्यापक आहे कि, केवळ इतरांची पुस्तके वाचून तो समजणार नाही, त्यासाठी स्वतः अध्ययन करावे लागेल.) आठ गुरुधर्मांची चिकित्सा करीत असतांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कि, जेव्हा भगवान बुध्द कोणताही विनय (भिक्खू - भिक्खुणीचे पातिमोक्ख नियम) बनवीत असतांना, ते केव्हा आणि कशाप्रकारे बनवावे, याचाही त्यांचा स्वतःच एक नियम आहे. तो नियम भगवान बुद्धांनी भद्दाली नावाच्या भिक्षुला सांगितला तो याप्रमाणे :

          भद्दाली, जोपर्यंत संघामध्ये धम्म दोष निर्माण होत नाहीत, तोपर्यंत शास्ता श्रावकांसाठी शिक्षापदे (नियम) घालुन देत नाही. भद्दाली, जेव्हा अशा प्रकारचे काही दोष निर्माण होतात, तेव्हा त्या दोषांना दुर करण्यासाठी शास्ता श्रावकांसाठी नियम घालुन देतो..

भगवान बुध्दांनी भिक्षुंसाठी २२७ तर भिक्षुणीसाठी ३३१ विनय सांगितलेले आहेत, आणि ते सर्व विनय पूर्वी बनविलेले नव्हते तर त्यांच्यामध्ये काही दोष निर्माण झाला होता म्हणुन बनविले. कोणता विनय कोणत्या कारणासाठी बनविला गेला, याच्या अर्थकथा अस्तित्वात आहेत. ह्या आठ गुरुधर्मांपैकी पहिल्या गुरुधर्माची जन्मकथा अस्तित्वात नाही किंवा भिक्षुणी पातिमोक्खामध्ये सुध्दा त्याला स्थान नाही. त्यामुळे हे गुरुधर्म भगवान बुद्धांच्या नंतर निर्माण झाले असावेत असे डॉ. धर्मानंद कोसंबी तसेच स्थाविरवादी देशातल्या अनेक विद्वानांचे मत आहे. असो...

१. उपसंपदा होऊन  १०० वर्षे झालेल्या भिक्खुणीने उपसंपदा होऊन १ दिवस झालेल्या भिक्खुला वंदन करावे.  हा प्रथम गुरुधर्म आहे. याबाबीत धम्माच्या विश्वकोशा मध्ये लिहिले आहे, Many Buddhists, especially from the modern Theravada views have found evidence that the 8 Gurudharmas are not really from the teaching of Buddha. The Vinaya recounts the story of six monks who lifted up their robes to show their thighs to the nuns. When the Buddha learned about this, he made an exception to that rule and told the nuns not to pay respect to these monks. A nun then, does not have to bow to every monk but only to a monk who is worthy of respect.

बुध्दांच्या काळात आणि नंतरही भिक्षुणी ह्या आठ गुरुधर्मांचे पालन करीत होते याचे संदर्भ सापडत  नाही. याउलट अनेक विद्वान भिक्षुणींनी भिक्षुंच्या पुढे धम्मपरिषदे मध्ये उपदेश केल्याचे उल्लेख मात्र जागोजागी सापडतात. जर बुद्धांच्या काळात तो गुरुधर्म अस्तित्वात असता तर असे संदर्भ आपल्याला सापडणे अशक्य असते. बुध्दकाळापासून ते अगदी आजच्या आधुनिक युगामध्ये सुध्दा भिक्षुणी आठ गुरु धर्मांचे पालन करतांना दिसत नाहीत. (जगातील एकमेव बौध्द राष्ट्र असलेल्या थायलंड चे भिक्षु - भिक्षुणी जेव्हा धम्मदीक्षा दिनी दीक्षाभुमी, नागपुर येथे आले होते, तेव्हा एक भिक्षुणी थायलंड आणि भारताच्या भिक्षु संघाला धम्माचा उपदेश करीत होत्या, आणि सर्व भिक्षु तिच्या पाया पडत होते, हे मी स्वतः बघितले आहे. )


स्त्रीयांच्या बाबतीत काही बुध्दवचन :

१. मुलीच्या जन्माने उदास होऊ नका, एखादी स्त्री देखील पुरुषा पेक्षा श्रेष्ठ असते. (संदर्भ : संयुक्त निकाय, सगाथ वग्ग, कोसल संयुत्त - मल्लिका सुत्त)

२. धम्म महत्त्वाचा, स्त्रीत्व अथवा पुरुषत्व नव्हे. स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्या व्यक्तीकडे धम्माच्या स्वरुपातील यान असते, ती व्यक्ती या यानाद्वारे निर्वानाजवळ पोहोचते. (यस्स एतादिसं यानं, इत्थिया पुरिसस्स वा ! स वे यानेन, निब्बानस्सेव संतिके'ति !!) (संदर्भ : संयुक्त निकाय, देवता संयुक्त, आदित्तवग्ग, अच्छरासुत्त)

३. पत्नी हि सखी आहे, दासी नाही. (संदर्भ : संयुक्त निकाय, देवता संयुक्त, जरावग्ग, वत्थुसुत्त)

 ४. गुणसंपन्न, बहुश्रुत, धम्मधर भिक्खुनी व उपासिका म्हणजे संघाची शोभा.. (संदर्भ : अंगुत्तर निकाय, चतुक्कनिपात, भंडगाम वग्ग, सोभन सुत्त)

५. निर्वाण मार्गावर चालत असतांना माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय ... ? माराचा नाश करण्यासाठी माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय..? (संदर्भ : संयुक्त निकाय, सगाथवग्ग, भिक्षुनी संयुक्त / थेरीगाथा..)

६. धम्मामुळे आत्मविश्वास वाढला, समाजामध्ये इतरांकडुन घाबरविल्या जाणाऱ्या स्त्रीयांनी, समाजाला घाबरविणाऱ्या मारालाच घाबरविले. (संदर्भ : उपरोक्त)

७. शुक्रा नावाची भिक्षुनी मोठ्या धम्मपरिषदेमध्ये (हजारो भिक्षु - भिक्षुनीं समोर) धम्माचा उपदेश करीत होती, तो उपदेश अमृतासारखा आहे. (संदर्भ : यक्षसंयुत्त, पठमसुक्का सुत्त)

८. खेमा भिक्षुणी बद्दल, 'ती अत्यंत विद्वान, सुस्पष्ट भुमीका असलेली, बहुश्रुत, उत्तम वक्तृत्व असलेली आणि समंजस आहे, अशी तिची कीर्ती आहे. महाराजांनी तिच्या सेवेत उपस्थित रहावे.' (संदर्भ : संयुक्त निकाय, अव्याकृत संयुत्त, खेमा सुत्त)

९. "कंजगलिका भिक्षुणी उपासकांना उपदेश करते..." तथागत म्हणाले, साधु, साधु, गृहपतींनो, भिक्षुणी कंजगलिका अत्यंत विद्वान आहे, महाप्रज्ञावान आहे. तुम्ही माझ्याकडे येऊन मला विचारले असते तरी मी सुध्दा हेच सांगीतले असते, (संदर्भ : अंगुत्तर निकाय, दस्सक निपात, महावग्ग, दुतिय महापञ्हा सुत्त)

१०. प्रतिष्ठित लिच्छवींसाठी आम्रपालीचे भोजन नाकारले नाही. त्यांनी आम्रपाली गणिकेच्या जीवनाला स्वर्ग बनविले. भगवानांनी तिच्यासाठी किती अमुल्य कार्य केले हे तिच्या थेरीगाथां शिवाय कसे समजणार ... ? (संदर्भ : दिघनिकाय, महापरिनिब्बाण सुत्त/ थेरीगाथा)

११. भगवानांनी गणिकेला परिव्राजिका बनविले, तर विरोधकांनी परिव्राजिकांना गणिका बनविले. तथागतांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी कारस्थाने केली गेली. (उदा. - चिंचा आणि सुंदरी परिव्राजीका, धम्मपद अट्ठकथा, १३- लोकवग्ग, गाथा क्रं. १७६ ) (उदानपाळी, मेघिय वग्ग, सुंदरी सुत्त...)

१२. पापी मार : जे स्थान ऋषींना सुध्दा प्राप्त करता आले नाही, जे इतरांच्याद्वारे प्राप्त करण्यास अत्यंत कठीण आहे, ते तुझ्यासाखी दोन बोटांएवढे प्रज्ञा असणारी स्त्री कसे प्राप्त करेल..?
सोमा भिक्षुणी : चित्त सुस्थीतीत असतांना, ज्ञान उपस्थित झाले असतांना, धर्माची सम्यक विपश्यना घडली असतांना, माझे स्त्रीत्व काय करेल..? भगवान बुध्दांनी भिक्षुणींमध्ये निर्माण केलेल्या आत्मविश्वासामुळे सोमा भिक्षुणी पापी माराला असे बोलु शकली. (संदर्भ : संयुक्त निकाय, सगाथवग्ग, सोमासुत्त)

१३. भगवान बुध्द धम्मदिनेची स्तुती करतात. (मज्झीम निकाय ४४)

          वरील वचनांवरून ठरवा भगवान बुध्दांचा धम्म हा स्त्रीयांच्या विकासासाठी कारणीभुत ठरला कि, त्यांच्या खच्चीकरणासाठी..? बुध्दांच्या धर्मामुळे तत्कालीन भारतीय समाजामध्ये स्त्रीया ह्या गुलामगिरीत ढकलल्या गेल्या असे तुम्हाला वाटते का..? ज्या काळात पुरुष प्रधान व्यवस्थेने स्त्रीयांचे जीवन अत्यंत किळसवाणे केले होते, त्या काळात भगवान बुध्दांनी स्त्रीयांना आपली प्रतिभा प्रकट करण्यासाठी वाटा उपलब्ध करुन दिल्या. ज्या समाजामध्ये आपल्या गर्भात जन्मलेली मुलगी सुध्दा शाप मानले जायचे, त्याच काळात मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. पती हि दासी नव्हे, तर तुमची मैत्रीण आहे, तिला सखीप्रमाणेच वागवा, तिच्यावर अन्याय अत्याचार करु नका, हे भगवान बुध्दांनी त्या काळात सांगीतले. ज्या समाजात भात शिजला कि नाही, याद्वारे स्त्रीयांच्या प्रज्ञेचे दोन बोटांमध्ये वर्गीकरण केले जायचे. तिच स्त्री भगवान बुध्दांच्या पासुन मिळालेल्या आत्मविश्वासा मुळे संपुर्ण समाजाला घाबरविणाऱ्या मारालाच घाबरविणारी ठरली.

          वास्तवात, स्त्री पुरुष समतेचा आधुनिकतेला तरी गंध आहे का ...? आजच्या आधुमिक युगापेक्षा बुध्दकाळ हा भारतभुमीचा स्वर्गकाळ होता. तो काळ आजच्या पेक्षा किती तरी पुरोगामी आणि श्रेष्ठ होता. त्यांच्या काळात बुध्दांनी एका वेश्येला आपल्या संघात मानाचे स्थान दिले, या काळात तो मिळतो का..? भगवान बुध्दांनी एका विधवेला आपल्या संघात मानाचे स्थान दिले., पण आमच्या (आधुनिक.?) काळात त्या मानाच्या स्थानाची गोष्टच सोडा, इथे हजारो वर्षांच्या नंतर सुध्दा विधवेला सती जावे लागत असे., केसं कापावी लागत होती. इथे ह्या आधुनिक काळात नवरा त्याच्या बायकोला दारु पिऊन मारहाण करतो, तिची तिला दासीप्रमाणे वागवितो, पत्नी सुध्दा काही कमी नाही. ती तिच्या पतीवर खोट्या केसेस लावते., पण बुध्दांनी मात्र पती पत्नीला मित्र - मैत्रीणींसारखा राहण्याचा उपदेश केला होता. मग कोणता काळ पुढारलेला, आणि कोण खरे पुरोगामी..

          निश्चितच आजच्या समाजापेक्षा त्याकाळचे लोक अधिक सुसंस्कृत होते. मनुष्य फार आळशी प्राणी आहे, त्याला प्रगतीचा तिटकारा आहे, ह्यामुळेच तो प्रगती कडुन अधोगतीकडे जातो...
.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



हे सुध्दा वाचा : 





केवळ "पुनर्जन्म" ह्या मान्यतेमुळे धम्म विज्ञाननिष्ठ नाही..?


                आजकाल दूरचित्रवाणी वरील मालिकांमधून, अनेक सिनेम्यांमधून पुनर्जन्म हा विषय विविध प्रकारे रंगवून दाखविला जातो.  मुळातच पुनर्जन्म हा प्राचीन सिद्धांत त्यातही तो धर्मग्रंथाद्वारे समजल्यामुळे धर्मग्रंथातील इतर सिद्धांताप्रमाणे तो सुद्धा विज्ञान विरोधी असेल अशी आपली मान्यता बनून जाते.  पुनर्जन्म ह्या विषयाला आपण पुरोगामी - प्रतिगामीच्या वर्गवारी मध्ये सुद्धा जोडून पाहतो, जेव्हा आपण असे म्हणतो, "आजकालच्या जमान्यातही पुनर्जन्मावर विश्वास ठेवतोस..?"  वास्तवात जर पुनर्जन्म हा खरच निसर्गाचा सिद्धांत असेल तर तो जुना आहे, आणि केवळ टीव्ही मालिकांद्वारे, धर्मग्रंथांद्वारे विकृत केल्या गेल्यामुळे त्याला नाकारणे सपशेल चुकीचे आहे.  आपण आज एकविसाव्या शतकात जगत आहोत, केवळ ह्या अहंकाराने स्वतःला पुरोगामी समजून २००० वर्षांपूर्वीचे सिद्धांत नाकारणे सुद्धा बरोबर नाही.

            पुनर्जन्माचा सिद्धांत नाकारणाऱ्या लोकांमध्ये स्वतःला पुरोगामी तसेच स्वतःला विज्ञानवादी समजणाऱ्या लोकांचा अधिक भरणा असतो. जे काही जुने आहे, जे काही धर्मग्रंथात लिहिले आहे ते सर्व चुकीचे आहे, आणि जे काही धर्मग्रंथात लिहिले नाही ते सर्व विज्ञान आहे, असा ह्या लोकांचा समज असतो.  अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी केवळ धर्मग्रंथात लिहिलेले आहे, आणि स्वतःच्या बुद्धीला पटत नाही म्हणून पुनर्जन्माचा सिद्धांत नाकारणे स्वतःच विज्ञानवादाच्या विरोधी आहे. तर्कवाद हा विज्ञानाचा प्रांत नव्हे, अनुभूती विज्ञानाचा प्रांत आहे, तेव्हा कोणत्याही प्रकारे संशोधन करून पुनर्जन्म हा विज्ञान विरोधी सिद्धांत आहे हे सिद्ध करावे किंवा संशोधन झालेल्या विज्ञानाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पुनर्जन्म शक्य नाही हे तरी सांगावे.


पुनर्जन्म ह्या मान्यतेमुळे बौध्द धर्म विज्ञान विरोधी आहे, असे मानणेच विज्ञानवाद विरोधी

            काही लोकांच्या मते बौध्द धर्म पुनर्जन्म मानतो म्हणून तो विज्ञानवादी ठरत नाही. वास्तवात आज कित्येक वैद्न्यानिक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, याचा अर्थ ते सुध्दा विज्ञानवादी नाहीत का...? बौध्द धर्मात आत्म्याला मान्यता नाही पण पुनर्जन्माला मात्र आहे. आपल्या शरीरातील अनित्य आणि अनात्म असलेल्या उर्जेचे पुनर्जन्म होते असे बुद्धांचे म्हणणे आहे.  हा काही कोरा दार्शनिक सिद्धांत नव्हे, ति प्रत्यक्ष सम्यक संबुध्दांची अनुभूती आहे, कोणीही स्वतः त्याचा अनुभव करावा.  सम्यक संबोधीच्या प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी स्वतः एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, वीस, चाळीस, ............. अशाप्रकारे आपल्या सर्वच पुर्वजन्मांचे स्मरण केले. त्यांनी जे काही अनुभव केले तेच जगाला सांगितले, आणि त्या मार्गावर चालून तुम्ही सुद्धा आपल्या पुर्वजन्मांचे स्मरण करू शकता असा बुद्धांचा दावा आहे. तेव्हा निर्वाणाची प्राप्ती झालेल्या अनेक श्रावक - श्राविकांनी सुध्दा आपल्या पूर्वजन्मांचे स्मरण केले आहे. हे एक संशोधन होते, तर्क नव्हे, मग कोणी केवळ जुनी संकल्पना आहे म्हणून विज्ञान विरोधी का म्हणावे...?

            दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, बौध्द धर्मात पुनर्जन्म हा केवळ सिद्धांत आहे, धर्म नाही.  तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवल्याने स्वर्गाची प्राप्ती कराल किंवा तुमचा विश्वास नसेल तर नरकाची प्राप्ती होईल असेही काही नाही. याउलट चौदावे दलाई लामा काय म्हणतात, ते पहा...

 “Whether you believe in God or not does not matter so much, whether you believe in Buddha or not does not matter so much; as a Buddhist, whether you believe in reincarnation or not does not matter so much. You must lead a good life. And a good life does not mean just good food, good clothes, good shelter. These are not sufficient. A good motivation is what is needed: compassion, without dogmatism, without complicated philosophy; just understanding that others are human brothers and sisters and respecting their rights and human dignity.”

            तुमचा देवावर, बुध्दांवर किंवा पुनर्जन्मावर विश्वास आहे किंवा नाही, त्याने जास्त काही फरक पडत नाही. परंतु तुमचा सदाचारावर विश्वास असायला हवा, सदाचारी जीवन जगण्यावर विश्वास असायला हवा, त्याने फारक पडतो. कारण इतर धर्मांप्रमाणे बौध्द धर्म ग्रंथप्रामाण्यवादी नाही, किंवा नास्तिकांच्या प्रमाणे तर्कवादी सुद्धा नाही, तर विज्ञानाप्रमाणे तो अनुभूतीवादी आहे.  जरी कोणत्याही प्रकारे विज्ञानाद्वारे बौध्द धर्माचे सिद्धांत चुकीचे जरी ठरविले गेले तरी सुध्दा बौध्द धर्म बदलण्यास तयार आहे, तो परिवर्तनवादी आहे. यावर दलाई लामा म्हणतात...



सदर फोटो हा झाकीर नाईक यांच्याद्वारे ट्विटर केल्या गेलेल्या ट्विट नंतर फेसबुक वर ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या गेल्या त्यांच्यामधून घेण्यात आलेला आहेजर कोणाला आक्षेप असतील तर तसे कळवावे...


If science proves some belief of Buddhism wrong, then Buddhism will have to change.


            अनेक वैद्न्यानिक जे काही सिद्धांत मांडतात, त्यांच्यापैकी अनेकांमध्ये विविध लिमीटेशन्स असतात, त्यानंतर दुसरा एक वैद्न्यानिक येतो आणि पूर्वीच्या वैद्न्यानिकाने मांडलेल्या सिद्धांतामध्ये असलेल्या लिमीटेशन्स दूर करण्यासाठी दुसरा सिद्धांत मांडतो.  यानुसार प्रथम वैद्न्यानिक मूर्ख ठरत नाही, जर तो प्रथम वैद्न्यानिक दुसऱ्या वैद्न्यानिकाने मांडलेल्या सिद्धांताला स्वीकार करत असेल (जर तो सिध्दांत खरा असेल तरच..!). तरी तो विज्ञानवादीच ठरतो. केवळ पूर्वी चुकीचा किंवा अपूर्ण सिद्धांत मांडल्यामुळे तो विज्ञानविरोधी ठरत नाही. बौध्द धर्माचेही तसेच आहे, जर त्याने मांडलेले सिद्धांत चुकीचे असतील, विज्ञानविरोधी वाटत असतील तर तो बदलवायला तयार आहे. बौध्द धर्मात केवळ पुनर्जन्माची मान्यता असल्याने, आणि ती मान्यता काही स्वतःला विज्ञानवादी समजणाऱ्या पण वास्तवात तर्कप्रामाण्यवादी असलेल्या लोकांच्या तर्काला न पटल्याने ते बौध्द धर्माला विज्ञानविरोधी ठरवीत असतात.  परंतु त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी, तर्कप्रामाण्यवाद म्हणजे विज्ञानवाद नव्हे, वास्तवात हे दोघेही परस्पर विरोधी आहेत.

            विज्ञान म्हणजे असे ज्ञानज्याद्वारे सत्यालानिसर्गाच्या नियमांना अनुभुतीद्वारे जाणले जाते. (तर्कबुध्दीने नाही..!) निश्चितच तर्कप्रामाण्यवाद हा विज्ञानाचा प्रांत नव्हे, अनुभुती हा विज्ञानाचा प्रांत आहे.. मंगळावर जीवसृष्टी आहे किंवा नाहीहे इथे बसुन विशिष्ट ग्रंथ वाचुन किंवा तर्कबुध्दीने जाणले जाऊ शकत नाहीत्यासाठी तिथे जाऊन स्वतः अनुभवच करावा लागेल. साखरेची चव गोड आहे कि कडु हेसुध्दा तर्काने कळणार नाही, त्यासाठी स्वतः तिला खाऊन अनुभवच करावा लागेल. धम्माचे (निसर्ग नियमांचे) सुध्दा अगदी तसेच आहे. ते कोणत्याही प्रकारे तर्कबुध्दीने जाणले जाऊ शकत नाही. त्यांना जाणण्यासाठी स्वतः अनुभवच करावा लागेल. बुध्द तर हेच सांगतात. इतरांप्रमाणे बुध्दांनी चिकित्सा सुध्दा नाकारली नाही. याउलट ते स्वतःची चिकित्सा करायला सांगत असत... हा विज्ञान वाद नव्हे तर मग काय आहे..ग्रंथप्रामाण्यवाद कि तर्कप्रामाण्यवाद.?


बुध्दांचा हा असा धर्म आहे, जो परलोक मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या अशा दोघांनाही सारखाच जवळचा वाटू लागतो...

           परलोकाला मानणे किंवा नाकारणे हा बुद्धांचा धर्म नव्हे.  तर त्याला नाकारून अथवा स्वीकारून आपले चित्त शुध्द करावे, सदाचारी, सुध्द जीवन जगावे हा धर्म आहे. त्यामुळे परलोक स्वीकारणाऱ्या आणि नाकारणाऱ्या अशा दोघांनाही बुद्धांचा धर्म सारखाच जवळचा वाटू लागतो.  वास्तवात जे लोक स्वतःला विज्ञानवादी किंवा विज्ञान निष्ठ समजतात, त्यांनी तर परलोकाचे अस्तित्व नाकारणेच चुकीचे आहे, कारण ह्या अखील विश्वामध्ये कितीतरी ग्रह आहेत, आणि त्यापैकी बऱ्याच ग्रहांवर जीवसृष्टी असणे सहज शक्य आहे, पण जेव्हा तुम्ही ह्या सिद्धांताला स्वीकारू शकत नाही, तेव्हा नाकारू पण नये. असे असले तरी एखादा व्यक्ती परलोकाचे अस्तित्व नाकारतो किंवा परलोकाचे अस्तित्व स्वीकारतो यावरून तो बौध्द किंवा अ-बौध्द ठरत नाही. ह्या जगाच्या प्रती असलेल्या त्याच्या मान्यता त्याच्या बौद्धत्वाच्या आड येत नाहीत. कारण केवळ त्याच्या ह्या जगाच्या प्रती असलेल्या मान्यतेमुळे कोणी बुध्दाचा श्रावक ठरत नाही. कोणी देवांच्या अस्तित्वाचे स्वीकार करो अथवा न करो, कोणी पुनर्जन्म, परलोक, इत्यादींचा स्वीकार करो किंवा न करो त्याने जास्त काही फरक पडत नाही, कारण श्रेष्ठ व सदाचारी जीवन जगणारा प्रत्येक प्रज्ञावान, शीलवान आणि करुणावान जीव हा बुध्दांचा श्रावक आहे.


सर्वोच्च प्रज्ञेच्या प्राप्तीने पुर्वजन्मांचे स्मरण करता येते...

            बौध्द मताप्रमाणे भगवान बुद्धांनी सम्यक संबोधीच्या प्राप्तीसोबातच आपल्या सर्व पुनर्जन्मांचे स्मरण केले.  तसेच प्रत्येक निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीकडे त्यांचे स्मरण करण्याचे बळ येते. त्यांना तेवढी प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा हि केवळ भरपूर पुस्तके वाचल्याने किंवा भरपूर चिंतन केल्याने प्राप्त होत नाही, तर ति तीन प्रकारे प्राप्त केली जाते.

१. श्रुतमय प्रज्ञा : प्राचीन काळी लेखनकला अवगत नसल्याने ज्ञान हे मुखाने सांगीतले जायचे तर ते कानांनी ग्रहण केले जात असे त्यामुळे याद्वारे भरपूर ज्ञान प्राप्त झालेल्यांना "बहुश्रुत" असे म्हटले जायचे. ह्या काळात आपण जे ज्ञान किंवा शहानपण पुस्तकांतून, शिक्षकाकडून किंवा वडिलधाऱ्या लोकांकडून प्राप्त करतो, त्यांना आपण श्रुतमय प्रज्ञा म्हणू शकतो. परंतु हे ज्ञान सर्वोच्च नसते.

२. चिंतामय प्रज्ञा : जे ज्ञान किंवा शहाणपण आपल्याला चिंतनाने किंवा तर्काने प्राप्त होतेत्यांना चिंतामय प्रज्ञा असे म्हणतात. हे ज्ञान सुध्दा सोर्वोच्च नसतेते सुध्दा मर्यादित असते. कारण काननाकडोळेत्वचाजीभ आणि मन ह्या मानवाच्या सहाही ज्ञानेंद्रियांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. ते जगात अस्तित्वात असलेल्या सर्वच गोष्टींना अनुभव करु शकत नाही. मानवाच्या इंद्रियांचे कार्यक्षेत्र वाढावे यासाठी संशोधकांनी अनेक उपकरणांचे संशोधन केले. जसे - मानवी त्वचेवर कित्येक सुक्ष्मजीव बसुन आहेतहे तो त्याच्या डोळ्यांनी पाहु शकत नाहीतेव्हा त्याच्या ह्या इंद्रियांचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी त्यांनी मायक्रोस्कोप बनविलाज्याच्या सहाय्याने तो त्यांचा अनुभव करु शकतो. शेकडो वर्षांपुर्वी कोणी असा विचार केला असता, (कि मानवी शरीरावर असंख्य सुक्ष्मजीव विराजमान आहेत.) तेव्हा त्या काळच्या तर्कवाद्यांनी त्याला नक्कीच मुर्खात काढले असते.

३. भावनामय प्रज्ञा : भावनामय प्रज्ञा हि भावना आणि ध्यान साधनेद्वारे प्राप्त केली जाणारी प्रज्ञा आहे. हि प्रज्ञा दुसऱ्या व्यक्तीकडुन प्राप्त झालेली नसतेकोणत्या पुस्तकातुन प्राप्त झालेली नसते किंवा कोणत्या चिंतनाने किंवा तर्काद्वारे सुध्दा प्राप्त होत नसते. तर ती स्वतःच्या अनुभुतीने प्राप्त होते. जसे वर सांगीतल्या प्रमाणे मानवाच्या सर्व इंद्रियांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहेपरंतु संशोधकांनी तयार केलेल्या उपकरणांद्वारे आपण त्याचे कार्यक्षेत्र वाढवु शकतोतद्वतच आपण विविध प्रकारची अनुभुती सुध्दा करु शकतो. परंतु ते मानवाच्या मनाचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी कोणतेही उपकरण शोधु शकत नाही, (कारण मन किंवा विज्ञान (Conciousness) हे बाह्य जड जगापेक्षा वेगळे असल्यामुळे त्याची रासायनिक परीक्षा करता येत नाही. मनाला रंगरुपआकार किंवा घनता नाही. ते अदृश्य आणि अस्पर्श्य आहे. आणि म्हणुनच ते पंचेंद्रियांना जाणता येत नाही. ते पंचेंद्रियांच्या आदेशाने चालत नाहीतर उलट त्यांच्यावरच ते अधिराज्य गाजविते. इथे हे स्पष्टपणे समजले पाहिजे की मन किंवा विज्ञान (जाणीव) म्हणजे शाश्वत आत्मा किंवा भुत पिशाच्च नव्हे तर एक उर्जा आहे. आणि ती मानवाच्या मृत्युसोबत नष्ट होणे अशक्य आहे.). ते भगवान बुध्दांनी शोधुन काढले आहे. भगवान बुध्दांनी मानवाच्या मनाचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी एका मार्गाचा उपदेश केलात्या मार्गावर चालुन मानवाच्या मनाला होणारे सर्व विकार तर नष्ट होतातच परंतु तो वेगवेगळे विशेष अनुभव सुध्दा करु लागतो. ते अनुभव असे असतात कि मानवाच्या मनाची तर्कबुध्दी तिथपर्यंत पोहोचु शकत नाही.

पुनर्जन्म हा विज्ञान विरोधी सिद्धांत आहे का...?

            अनेक तर्कप्रामाण्यवादी विचारवंताचा असा दावा आहे कि, पुनर्जन्म हि विज्ञान विरोधी संकल्पना आहे, वास्तवात यांचा विरोध अनेक धर्मग्रंथांद्वारे पुनर्जन्मांच्या संकल्पनेला विकृत केल्यामुळे असावा, कारण त्यांनी कोणते संशोधन केले असावे असे मुळीच वाटत नाही. तुमची जी काही जाणीव (consciousness) आहे, ज्यातून तुमचे विचार आणि स्वभावाची निर्मिती होते, ती कोणत्या स्वरूपात असते, यावर विचार केला आहे का..? मनामध्ये ज्या काही भावना निर्माण होतात, आनंद, राग, लोभ, द्वेष, शांती त्यांची जाणीव कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असेल..? (काय ते मानवाचे अवयव आहेत कि इतर अवयवांप्रमाणे मानवाच्या मृत्युसोबत ते सुध्दा नष्ट पावतील..?)   
       
            मनुष्याचा मृत्यू झाल्यावर सुध्दा काही काळ इतर अवयव जिवंत असतात, परंतु मानवी हृदय मात्र तत्काळ बंद पडतो. मनुष्य मरण पावतो म्हणून इतर अवयव मरण पावत नाहीत. तर मानवाचे हृदय त्यांना रक्तपुरवठा बंद करतो म्हणून ते निकामी होतात. पण ते अवयव मनुष्य मेल्यानंतर इतरांना दान केले जाऊ शकतात, मनुष्य मेल्यानंतर सुध्दा ते अवयव इतर व्यक्तींसाठी उपयोगात येऊ शकतात. पण विज्ञान (consciousness)  हि एक उर्जा आहे, मानवी मेंदूची उर्जा. त्या उर्जेचे जगणे किंवा नष्ट होते कोणत्याही प्रकारे हृदयाद्वारे होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर अवलंबून नाही. त्यामुळे  ती उर्जा मानवाच्या मृत्युसोबत नष्ट होणे अशक्य आहे.


ह्या (परलोक आणि पुनर्जन्म) विषयांवर काही वैद्न्यानिकांचे दावे आणि मते आपण पाहूया...

            कोणत्याही धर्मग्रंथांद्वारे प्रभावित होऊन किंवा त्यांच्याद्वारे केल्या गेलेल्या विकृतीकारणामुळे त्या सिद्धांताला नाकारून नव्हे तर अनेक वर्षांच्या सखोल संशोधनानंतर, जवळपास १५०० लोकांवर केलेल्या प्रयोगानंतर युनायटेड स्टेट्सच्या न्युरोवैद्न्यानिकांनी निष्कर्ष काढला कि, मानवाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या बंद पडलेल्या हृदयानंतर आणि बंद पडलेल्या मेंदूनंतर सुध्दा मानवी विज्ञान (consciousness) अस्तित्वात असते.  (वास्तवात ती एक उर्जा आहे, तर तसे व्हायलाच हवे..) मानवाच्या वैद्यकीय मृत्यूनंतर त्याच्या मेंदूची (विज्ञान / consciousness) जी उर्जा असते, ती तिच्या स्वरूपानुसार दुसऱ्या गर्भात जन्म घेणाऱ्या बाळासोबत पुन्हा जगामध्ये येते, ज्या प्रक्रियेला आपण पुनर्जन्म असे म्हणतो, कारण बाळाचे उर्जेच्या स्वरूपात असणारे विज्ञान गर्भात त्याच्यासोबत निर्माण होत नाही, तर ते त्याला लाभते.  हि (consciousness)  उर्जा तरंगांच्या स्वरूपामध्ये प्रवास करते. आणि केवळ ह्याच पृथ्वीवर नाही तर अनेक (जीवसृष्टी) अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या ग्रहांमध्ये सुध्दा जाऊ शकते, जिथे कोणत्याही यानाद्वारे पोहोचू शकत नाही, असा ह्या वैद्न्यानिकान्चा दावा आहे.    

            विज्ञान (Science) हा असा मार्ग आहे जो माणसाला त्याच्याप्रती अथवा जगाच्या प्रती असलेल्या सत्यालानिसर्गाच्या नियमांना अनुभुतीद्वारे जाणायला शिकवितो, (तर्कबुध्दीने किंवा धर्मग्रंथप्रामाण्य वादाने नाही..!). आज विज्ञानाद्वारे जे काही संशोधन झाले आहेत्याद्वारे आपण जगातील सर्वच निसर्गाच्या नियमांना जाणू शकलो नाहीत. आणखीही बरेच संशोधन होणे बाकी आहेसध्या संशोधन झालेल्या विज्ञानाला अनेक मर्यादा आहेत. Classical Biology च्या आधारे आपण विज्ञान (Consciousness) हि मानवी मेंदूपासून भिन्न आहे किंवा नाही हे सिद्ध करू शकत नाही (विद्यार्थ्याला ह्या दोन्ही गोष्टी एकच वाटतात.)त्यासाठी Modern Biology किंवा Quantum Biology ची गरज आहेयावर न्यूयॉर्क शहरातील Weill Cornell Medical centre चे Dr. Sam Parmia  जे  "मृत्युचा वैद्न्यानिक दृष्टीकोनातून अभ्यास"  ह्या विषयावरील जगातील अग्रणी अभ्यासक आहेतते म्हणतात,,


       
            “We're pushing through the boundaries of science here, working against assumptions and perceptions that have been fixed. The lot of people fixed this idea that when you die, you die; that's it. Death is a moment - you know, you either dead or alive. All these things are not scientifically valid, but they’re social perceptions. 

       “If you look back at the end of the 19th century, physicists at that time had been working with Newtonian laws of motion, and they really felt they had all the answers to everything that was out there in the universe. When we look at the world around us, Newtonian physics is perfectly sufficient. It explains most things that we deal with. But then it was discovered that actually when you look at motion at really small levels – beyond the level of the atoms – Newton’s laws no longer apply. A new physics was needed, hence, we eventually ended up with quantum physics. It caused a lot of controversy – even Einstein himself didn’t believe in it. 

            “Now, if you look at the mind, consciousness, and the brain, the assumption that the mind and brain are the same thing is fine for most circumstances, because in 99% of circumstances we can’t separate the mind and brain; they work at the exactly the same time. But then there are certain extreme examples, like when the brain shuts down, that we see that this assumption may no longer seem to hold true. So a new science is needed in the same way that we had to have a new quantum physics." 

            विज्ञान (Consciousness) आणि मेंदू यांचा संबंध काय..? ते एकच आहे कि एकमेकांच्या पासून भिन्न आहेत.? याचे संशोधन करण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांनी भौतिकशास्त्राच्या नव्या स्वरूपाचा आधार घेत केला.

 "Quantum Consciousness & Science of Consciousness" ह्या विषयावर संपूर्ण आयुष्य संशोधन करणारे अमेरिकेतील वैद्न्यानिक Staurt Hameroff, (ज्यांचा दावा आहे कि, "विज्ञान /  Consciousness"  हे मानवी शरीराच्या मृत्यूनंतर सुध्दा अस्तित्वात असतेआणि ते प्रवास करू शकतेयाच ग्रहावर नाहीतर अगदी परग्रहावर सुध्दा..) म्हणतात, , The human brain is a perfect Quantum Computer, and Consciousness is simply information stored at the quantum level. It can be transfer after the death of body; Quantum information can be carried by merges with our universe and exists infinitely.

२.  "Quantum Consciousness & Science of Consciousness" ह्या विषयावर संपूर्ण आयुष्य संशोधन करणारे अमेरिकेतील वैद्न्यानिक Staurt Hameroff, (ज्यांचा दावा आहे कि, "विज्ञान /  Consciousness"  हे मानवी शरीराच्या मृत्यूनंतर सुध्दा अस्तित्वात असतेआणि ते प्रवास करू शकतेयाच ग्रहावर नाहीतर अगदी परग्रहावर सुध्दा..) म्हणतात, , The human brain is a perfect Quantum Computer, and Consciousness is simply information stored at the quantum level. It can be transfer after the death of body; Quantum information can be carried by merges with our universe and exists infinitely.


३. Anderei Linde हे Lebedev Physics institute, Russia  चे वैद्न्यानिक होते, जे सध्या अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील Standford विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. ते दुसऱ्या ग्रहांवरील जीवसृष्टी बद्दल म्हणतात"Space consisting of many inflating spheres, which gives rise to similar spheres, and those in turn, produce sphere in even greater numbers, and so on to infinity. In the universe they are spread apart. They are not aware of each other's existence. But they represent the part of same physical universe."

निष्कर्ष :

१. पुनर्जन्माचे अस्तित्व स्वीकारणे किंवा नाकारणे हे एक बौध्द बनण्याचे प्रमाण नाही, कोणताही जीव त्याच्या हृदयात सर्वांच्या प्रती असलेल्या मंगल मैत्री आणि करुणेच्या भावनेनेच तसेच, सर्व प्रकारच्या दुराचाराचा त्याग करून सदाचारी जीवन जगण्याच्या प्रतिज्ञेनेच बुध्दांचा श्रावक बनतो. (केवळ देवांचे, पुनर्जन्माचे, इत्यादींचे अस्तित्व स्वीकारून किंवा नाकारून नव्हे.)

२. बौध्द धर्मात पुनर्जन्म हा सिद्धांत आहे, धर्म नाही, त्यामुळे त्याचा स्वीकार करण्याची सक्ती नाही. मात्र पुनर्जन्म हा सिद्धांत बुद्धांच्या धर्माचे अविभाज्य अंग आहे, हे सुध्दा कोणी नाकारू शकणार नाही. भगवान बुध्दांचा असा दावा आहे, कि सम्यक संबोधी प्राप्ती झाल्यावर त्यांनी त्यांच्या पुर्वजन्मांचे स्मरण केले होते, तर प्रत्येक निर्वाण प्राप्त झालेल्या जीवाला हे सामर्थ्य प्राप्त होते.

३. केवळ पुनर्जन्म मानतो म्हणून बौध्द धर्म विज्ञान विरोधी ठरत नाही. वर सांगितलेले दलाई लामांचे वाचन आठवावे, धर्म हा परिवर्तनशील आहे, धर्म म्हणजे निसर्गाच्या नियमां शिवाय दुसरे काहीही नव्हे. वास्तवात पुनर्जन्म हि विज्ञान विरोधी संकल्पना आहे किंवा नाही, हे वैद्न्यानिक दृष्टीकोनातून केल्या गेलेल्या प्रयोगाद्वारे निघणाऱ्या निष्कर्षाद्वारे ठरवावे, केवळ प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे आणि स्वतःच्या बुद्धीला पटत नाही म्हणून, नाकारू नये.

४. पुनर्जन्म आहे किंवा नाही..? या विषयावर त्यांचे स्मरण करता येऊ न शकणाऱ्या लोकांसाठी चर्चा करणे व्यर्थ आहे. पण ह्या विषयावर संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांचे मत सुध्दा लक्षात ठेवावे.

५. विज्ञानाद्वारे होणाऱ्या पुनर्जन्माबद्दल बौध्द धर्म आणखी काय सांगतो.? त्या विज्ञानाद्वारे होणाऱ्या पुनर्जन्माच्या चक्राचे नष्ट होणे शक्य आहे का..? जर आहे तर कशाप्रकारे...? हे सर्व प्रश्न जर तुम्हाला पडलेली असतील तर अवश्य विचारू शकता, त्यावर नवा लेख लिहिता येईल...


References :

1. Quantum Theory proves that Consciousness moves to another Universe after Death. - An article written by Anna Lemid, 7th December 2013

2. Wikipedia.Com



सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेअर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....


हे सुध्दा वाचा :
 



गुरुवार, १४ मे, २०१५

राष्ट्राची एकता आणि एकात्मताच राष्ट्राचे संरक्षण करते....

          आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये विविध जाति, संप्रदाय आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. अशा विविधतेमध्ये सुध्दा आपल्या देशाच्या नागरीकांमध्ये असणारी एकात्मतेची आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या ज्योतीला अखंडपणे तेवत ठेऊन आहे. परंतु असे असतांना देखील, आपल्या देशातील काही समाज कंटक जाति - संप्रदायाच्या नावाखाली, भाषा - प्रदेशाच्या नावाखाली, एका भारतीयाला दुसऱ्या भारतीया पासून वेगळे करीत आहेत, दोन व्यक्तींमध्ये निरर्थक भांडणे लावली जात आहेत. वास्तवात हा एक देशद्रोह आहे. समाज कंटकांच्या ह्या दुष्कृत्यांमुळे देशाच्या सार्वभौमिकतेला धोका पोहोचलेला आहे. अशा घटनांमुळे शेकडो राज्ये उध्वस्त झालेली आहेत, याचे प्रमाण इतिहासात बरेच आहे, भारताच्या गुलामगिरीचा इतिहास तर अशाच गोष्टींमुळे रंगलेला आहे, याबाबतीत एक महत्वाचे उदाहरण म्हणजे वज्जींचे राज्य.

          भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यावेळी वज्जी नावाचे लोक अस्तित्वात होते, वैशाली हे  वज्जींच्या राजाधांचे शहर होते. वज्जीना लिच्छवी असे म्हणत. लिच्छवी हे भगवान बुद्धांचे अनुयायी होते, त्यामुळे त्यांचा युध्दामध्ये पराभव होऊ नये यासाठी भगवान बुद्धांनी त्यांना सात वृध्दिकारक धर्मांचा उपदेश केला, याचा संदर्भ अंगुत्तर निकायातील सारन्दद सुत्तामध्ये मिळतो. ते सात वृध्दिकारक धर्म खालीलप्रमाणे :

१. जेव्हापर्यंत वज्जी अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.

२. जेव्हापर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही..

३. जेव्हापर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्या प्रमाणे वागतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

४. जेव्हापर्यंत वडिलधाऱ्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

५. जेव्हापर्यंत महिलांना आणि तरुणींना जबरदस्तीने आणून आपल्या घरामध्ये ठेवणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

६. जेव्हापर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्व धर्म कर्तव्ये पार पाडतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

७. जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

        वरील वृध्दिकारक धर्मांचे पालन जेव्हापर्यंत वाज्जिंकडून केले जाईल तेव्हापर्यंत त्यांचा ऱ्हास होणार नाही, याउलट भरभराटच होईल. परंतु जर वज्जी या नियमांच्या पासून भरकटले, दुसऱ्या मार्गावर गेले तर त्यांचा नाश होईल, असे भगवान बुध्दांनी त्यांना सांगितले.

          यातील पहिला धर्म आपल्याला एकात्मतेची शिकवण देतो, वज्जी लोक जेव्हापर्यंत राष्ट्राच्या संबंधित कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्यासाठी एकत्र जमतील, आणि आपल्यामध्ये ऐक्य राखतील तर त्यांची भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही. कारण एकतेची शक्ती भव्य आहे, जरी शत्रू कितीही शक्तिमान असला तरी एकात्मतेची भावना असलेल्या समाजा विरुध्द युध्द करणे आहे त्याला जिंकणे कठीण असते. परंतु याउलट जर समाजामध्ये ऐक्याची भावना नसेल, दोन व्यक्तींमध्ये जाती - संप्रदाया वरून, भाषा - प्रदेशावरून किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही कारणावरून तेढ असेल तर त्या समाजाला, त्यां राष्ट्राला बाहेरच्या शत्रूंची गरजच काय..? राष्ट्रातील नागरिकांचे ऐक्य राष्ट्राच्या रक्षणासाठी महत्वाचे आहे. म्हणून राष्ट्राच्या हिताची कामना करणाऱ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राच्या हितासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींबाबत चर्चा करावी असे भगवान बुध्द आपल्याला सुचवितात. आणि केवळ चर्चा करण्यासाठी एकत्र येणे महत्वाचे नाही तर चर्चा करतांना जरी मतभेद निर्माण झाले तरी त्याचा राष्ट्राच्या एकात्मतेवर आणि प्रजेच्या हितावर विपरीत परिणाम होता कामा नये, तर प्रजेच्या प्रती असलेली सर्व कर्तव्ये त्यांनी पार पाडावी, त्यासाठी आपापसांमध्ये नेहमी ऐक्य राखावे आणि त्या ऐक्यामध्ये मतभेदांना आणू नये असे भगवान बुध्द दुसऱ्या धर्माद्वारे सूचित करतात.

          तिसरा धर्म कायद्या प्रमाणे वागायला शिकवितो, कायद्याचे पालन करायला शिकवितो. कायदे हे प्रजेचे कल्याण लक्षात ठेऊन देशाच्या हितासाठीच निर्माण केले असतात, जेव्हापर्यंत ह्या कायद्यांचे प्रजेद्वारे पालन होत राहील, यात कोणावरही अन्याय  होता कामा नये. प्रजा आणि राजा दोघेही वडिलधाऱ्या लोकांचा मान राखतील, पूर्व परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टींबाबत कृतज्ञ राहतील. त्यांच्या अनुभवांचा योग्य तो वापर करतील तर त्यांची नेहमी भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही, असे भगवान बुध्द तिसऱ्या आणि चौथ्या धर्माद्वारे सांगतात.

          पाचवा धर्म स्त्रियांच्या बाबतीत असणाऱ्या पुरुषी मानसिकतेचा आहे, ज्या समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान नाही, स्त्रिया उपभोगाची वस्तूच समजली जाते, त्या समाजाचा नेहमी ऱ्हासच होत असतो. स्त्रीया मग त्या कोणत्याही पक्षातल्या का असेनात, जो समाज स्त्रियांचे चारीत्र्य जपतो, त्या समाजाची सदैव भरभराटच होत असते. तर सहावा धर्म प्रजेच्या चारित्र्याबाबतचा आहे, प्रजेने नेहमी धार्मिकच असावे अधर्मी असता कामा नये, तो जाती - संप्रदायाच्या, भाषा - प्रदेशाच्या, वर्ण - वंशाच्या निरर्थक वादा मध्ये पडून एका माणसाला दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ समजून त्याचा अपमान करता कामा नये. त्याने सर्वांना समान समजले पाहिजे, सर्वांशी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायानेच वागले पाहिजे अर्थात धार्मिक कर्तव्ये पूर्ण केली पाहिजेत, प्रत्येकाच्या मनामध्ये धर्म वसला पाहिजे, अधर्म वसता कामा नये, असे भगवान म्हणतात. अर्हन्तांचे रक्षण करावे, अरहन्त निर्माण होतील, अर्हन्तांना विहार करण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण करावे असे सातवा धर्म सांगतो. कारण अर्हंत अशाच प्रदेशां मध्ये विहार करतात, ज्या प्रदेशातील नागरिकांच्या मनामध्ये धर्म वसतो, त्या प्रदेशामध्ये धर्म वसतो, जो प्रदेश धर्म राज्य असतो. अशा धर्म राज्यातील नागरिक नैतिक आचार विचारांचेच असतील, त्यांच्या मनामध्ये अधर्म येणार नाही. ते लोक स्वार्थासाठी एक दुसऱ्यांचा द्वेष करणार नाहीत, राष्ट्राबद्दल फितुरी करणार नाहीत.  त्यामुळे हे सर्व घटक राष्ट्राच्या समृध्दीसाठी कारणीभूत ठरणारे आहेत.  ह्या सर्व वृध्दिकारक धर्मांचे पालन केल्याने राष्ट्राचे अखंडत्व अबाधित राहित, शत्रू आपल्याला पराजित करू शकणार नाहीत आणि आपल्या देशाची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही. याउलट जर कोणी ह्या नियमांचे पालन करणार नाहीत तर राष्ट्राचा ऱ्हास निश्चितच होईल.

          वज्जींचे राष्ट्र ह्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे त्यामुळे त्यांचे सार्वभौमत्व टिकून होते, बलाढ्य राज्ये त्यांचा पराभव करू शकत नव्हती. हि गोष्ट जेव्हा मगधचा राजा अजातशत्रूला समजली तेव्हा त्याच्या मनामध्ये वज्जींचे वैभवशाली राष्ट्र जिंकण्याच्या महत्वकांक्षेने जन्म घेतला. वैशालीवर आक्रमण करण्याची हि योग्य वेळ आहे का..? याबाबतीत विचारणा करण्यासाठी अजातशत्रूने आपला अमात्य वस्सकार नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्धांकडे पाठवितो. भगवान बुध्दांना भेटल्यावर वस्सकार ब्राह्मण त्यांना याबाबतीत विचारतो तेव्हा भगवान वस्सकाराला म्हणतात, "एकदा मी वैशाली शहरातील सारदद चैत्यामध्ये विहार करीत असतांना वज्जीना सात वृद्धीकारक धर्मांचा उपदेश केला होता. जेव्हापर्यंत ब्राह्मणा, हे वृध्दिकारक धर्मांचे ते पालन करतील तेव्हापर्यंत त्यांची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही." भगवानांनी असे सांगितल्यावर वस्सकार ब्राह्मण म्हणाला, "वज्जींच्या ठिकाणी यातील एकेकच धर्म जरी असला तरी त्यांची भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही. तर मग सातही धर्म असल्यावर कसली शंका..? लाच दिल्याशिवाय किंवा त्यांच्यामध्ये फुट पाडल्याशिवाय अजातशत्रू राजाला त्यांचा पराभव करणे शक्य नाही..."  याबाबतीतील संदर्भ अंगुत्तर निकायातील वस्सकार सुत्तामध्ये सापडतो, हाच उतारा दिघ निकायाच्या महापरीनिब्बान सुत्ताच्या पहिल्या भागामध्ये आलेला आहे.

          भगवान बुध्दांशी चर्चा केल्यानंतर सध्या वज्जींवर आक्रमण करण्यात काहीही फायदा नाही, वज्जी जोपर्यंत सात वृध्दिकारक धर्मांचे पालन करत राहतील तेव्हापर्यंत त्यांचे राज्य जिंकणे अशक्य आहे, तेव्हा त्यांना सरळ मार्गाने जिंकता येणार नाही, एकतर लाच देऊन किंवा त्यांच्यामध्ये फुट पाडून, त्यांच्यामध्ये असणारी एकात्मता नष्ट करूनच वज्जींना जिंकता येईल, हे वस्सकार आणि अजातशत्रू ने जाणले होते. तेव्हा त्यांनी यावर चर्चा करून वज्जींना लाच देण्यापेक्षा त्यांच्या मध्ये फुट पाडण्याचा मार्ग निवडला.

          राजाने सभेमध्ये वैशालीवर आक्रमण करण्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्या ठरलेल्या प्रमाणे, वस्सकार त्यांना म्हणाला वज्जी लोकांना शांततेने शेती, व्यापार करू द्या. तुम्ही त्यांना त्रास कशाला देता..? तेव्हा हा ब्राह्मण वज्जींची बाजू घेत आहे असे म्हणून त्याच्यावर आरोप केला. त्यानंतर ब्राह्मणाने वज्जीना काहीतरी नजराणा पाठविला. आणी तो राजाने पकडला. हा ब्राह्मण देशद्रोही आहे असा आरोप ठेऊन राजाने ठरल्या प्रमाणे ब्राह्मणाला कैद किंवा मारहाण न करता राज्यातून हाकलून दिले. यावर ब्राह्मण म्हणाला, "मी तुझी सर्व बलस्थाने आणि दुर्बलस्थाने जाणतो, लवकरच मी याचा प्रतिशोध घेईन..." असे म्हणत तो निघून गेला.

          हि गोष्ट जेव्हा वैशालीच्या लिच्छविंना माहित झाली तेव्हा ते म्हणाले, "ह्या लबाड ब्राह्मणाला गंगा पार करू देऊ नका." परंतु त्यांच्यातील काही म्हणाले, "अरे आपल्या बाजूने बोलल्यामुळेच ह्या ब्राह्मणावर आज हि पाळी आलेली आहे. तेव्हा त्याला येऊ द्या.." ब्राह्मण जवळ आल्यावर लिच्छविंनी त्याची विचारपूस केली. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "अजातशत्रूच्या राज सभेमध्ये तुमची बाजू घेतली म्हणून राजाने मला त्याच्या राज्यातून हाकलून लावले आहे." ब्राह्मणाच्या गोष्टींमध्ये फसून भोळ्या लिच्छविंनी त्याला आपल्या राज्यातील अमात्य पद देऊ केले.

          त्यानंतर त्याने लिच्छवीमध्ये फुट पाडण्याचे कार्य सुरु केले. त्याने हे कार्य कशाप्रकारे केले ह्याबाबतीत अठ्ठकथांमध्ये विस्तृत वर्णन केले आहे, ते आपण वाचून घ्यावे. तीन वर्षांच्या कालावधी मध्ये ब्राह्मणाने फुट पाडण्याचे कार्य पूर्ण केले आणि अजातशत्रूला निरोप पाठविला कि, वज्जींवर आक्रमण करण्याची हीच योग्य वेळ आहे. वैशालीच्या लिच्छविंना जेव्हा समजले कि अजातशत्रू आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे, तेव्हा त्याला अडविण्यासाठी नगारा वाजविण्यात आला. परंतु एकतेमध्ये झालेल्या भंगामुळे वैशालीचे राजे एकत्र जमले नाही. राजाला शहरामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही, त्यासाठी त्याचा एकत्रितपणे प्रतिकार करू असे म्हणून सुध्दा नगारा वाजविण्यात आला, परंतु तसेही घडले नाही. त्यामुळे अजातशत्रूने नगरामध्ये प्रवेश केला आणि वज्जींचे राज्य जिंकून घेतले. अशाप्रकारे वरील सात वृध्दि कारक धर्मांचे पालन न केल्यामुळे वज्जींच्या राज्याचा ऱ्हास झाला.

          अशा प्रकारच्या पराभवाचा हा केवळ वज्जींचा इतिहास नव्हता, संपूर्ण भारत वर्षाच्या गुलामगिरीचा इतिहास सुध्दा अशाच प्रकारे रंगलेला आहे. वस्सकार ब्राह्मणाने ज्याप्रमाणे वज्जींचा मित्र म्हणवून घात केला, त्यांच्या एकात्मतेमध्ये फुट पाडली, त्यांच्या मध्ये विविध कारणांनी भांडणे लावून दिली. त्याचप्रमाणे आज आपल्या देशा मध्ये सुध्दा विविध कारणांनी भांडणे लावून आपल्या राष्ट्राची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्नच काही समाज कंटाकांच्या द्वारे केला जात आहे, त्यामुळे सर्व राष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनींना माझे असे निवेदन आहे कि, अशा समाज कंटाकांच्या पासून नेहमी सावध राहावे. कोणी जात, संप्रदाय, प्रांत, वंश, भाषा, इत्यादींच्या नावावर कितीही भेद निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्यातील एकात्मतेची भावना लोप पावता कामा नये, आपण एक राष्ट्र आहोत आणि एक राष्ट्र म्हणूनच जगले पाहिजे....

आपण सर्वप्रथम भारतीय आहोत

आणि अंतिमतः भारतीयाच आहोत


          भगवान बुध्दांचा हा उपदेश त्यांच्या श्रावकांच्या साठी सुद्धा आहे.  जेव्हापर्यंत त्यांनी सांगितलेल्या धर्माचे त्यांच्याद्वारे आचारण केल्या जाईल, तेव्हापर्यंत त्यांची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही. पण जर त्यांचे चित्त धर्मापासून ढळले आणि अधर्माच्या मार्गावर लागले तर त्यांचा सुध्दा वज्जींसारखा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेयर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....


हे सुध्दा वाचा :