मराठी धम्मपद


१. यमकवग्ग



१.स्वभावाच्या पुढे मन असते, मन सर्वश्रेष्ठ आहे, विकृत मनाने बोलतो, किंवा कृती करतो तेव्हा, त्याच्यामागे दुक्ख असे येते जसे बैलांच्या पावलामागे बैलगाडीचे चाक जाते (१)


२.स्वभावाच्या पुढे मन असते, मन सर्वश्रेष्ठ आहे, प्रसन्न मनाने बोलतो वा कृती करतो तेव्हा, त्याच्या मागे सुख येते जशी सावली.(२)


३.मला अपमानिले, माझा शेवट केला, मला जिंकले, जे असे वैर धरतात, त्याचे वैर शमत नाही.(३)


४.मला अपमानिले, मला जिंकले, माझाशेवट केला, असे वैर जे धरत नाहीत, त्यांचेच वैर शमते.(४)


५.वैराने वैर शमत नाही, ते अवैरानेच शमते हाच सनातन धर्म (पुर्वापार सिद्धांत) आहे.(५)


६.त्यांचे नव्हे, आपण मरणारच आहोत, हे जे जाणित नाहीत.. त्यांचेच वैर शमते, आपण मरणारच आहोत हे जाणतात.(६)


७.फक्त चांगलेच पहात फिरणारा, इंद्रियांवर ताबा नसलेला, भोजनाची योग्य मात्रा न जाणणारा, निरुद्योगी, हिंमत हारलेला, त्याला, भुलैया असे जिंकतो जसे वारा झाडाला वाकवितो.(७)


८. फक्त चांगलेच न पहात फिरणारा, इंद्रियांवर योग्य ताबा असलेला, भोजनाची योग्य मात्रा जाणणारा, प्रयत्नशील, हिंमतवान, त्याला भुलैया जिंकु शकत नाही, जसा वारा शैल पर्वताला हलवु शकत नाही.(८)


९.मलयुक्त चित्ताने जो भगवी वस्त्रे परिधान करतो तो, सत्य व संयमापासुन दुर गेलेला, भगवी वस्त्र धारण करण्यास लायक नाही.(९)


१०.जो दोषविरहीत आहे, चांगला एकाग्रचित्त आहे, सत्य व संयमाजवळ असणारा तो भगवी वस्त्रे धारण करण्यास लायक आहे.(१०)


११.सत्वहीनात सत्व पहाणारा, सात्विकात सत्वहीनता पहाणारा, खोटे पहाणारा (करणारा) सात्विकता प्राप्त करीत नाही.(११)


१२.सात्विकतेच सत्व पहाणारा, सत्वहीनात असत्व पहाणारा, सम्यक संकल्प पहाणारा (करणारा) सात्विकता प्राप्त करतो.(१२)


१३.जसे छतविरहित घरात पाऊस आरपार जातो, तसे अननुभवी मानवाच्या मनात रोगाचा प्रवेश होतो.(१३)


१४.जसे चांगल्या छताच्या घरात पाऊस प्रवेश करीत नाही, तसे अनुभवी मानवाच्या मनात रोगाचा प्रवेश होत नाही. (१४)


१५.इकडेही चिंतीत, तिकडेही चिंतीत, दुष्कर्मी सगळीकडे चिंतीत असतात. ते केलेल्या कुकर्मांना पाहुन चिंतीत होतात, पिडीत होतात.(१५)


१६.इकडेही आनंदीत, तिकडेही आनंदीत, सत्कर्मी दोन्हीकडे आनंदीत असतात, ते केलेल्या सत्कर्मांना पाहुन आनंदीत होतात, अधिक आनंदीत होतात.(१६)


१७.इकडेही तप्त, तिकडेही तप्त दुष्कर्मी दोन्हीकडे तप्त असतात, ते केलेल्या कुकर्मांना पाहुन तप्त होतात. दुर्गतीकडे जातात.(१७)


१८.इकडेही प्रसन्न, तिकडेही प्रसन्न, सत्कर्मी दोन्हीकडे प्रसन्न असतात., मी सत्कर्म केले या विचारांनी प्रसन्न होतात, अधिक प्रसन्न होतात. (१८)


१९.पुष्कळ ग्रंथ वाचुन तक्सर व प्रमादी मानव भाग्यवान श्रमण होत नाही. दुसऱ्याच्या गाई मोजुन गो-पालक भाग्यवान श्रमण होत नाही.(१९)


२०.थोडेसेच ग्रंथ वाचुन सैद्धांतिक आचरणाने सदाचारी होतो, राग, दोष, मोह त्यागुन, सम्यक जाणीवेने, मुक्त चित्ताने अनासक्त, असा मानव भाग्यवान श्रमण होतो.(२०)





सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...






२. अप्पमादवग्ग







२१.अप्रमाद अमृत स्थान आहे, प्रमाद (बेपर्वा) मृत्युचे स्थान आहे. अप्रमादी मृत होत नाही, प्रमादी मृतवत असतात.(१)


२२.अप्रमादाची ही विशेषतः ज्ञानी जन म्हणतात कि अप्रमादात आर्याचरणी (सदाचरणी) प्रसन्न-मग्न असतात.(२)


२३ध्यानमग्न, जागृत, दृढ पराक्रमी, धीर मानव यत्न सिद्ध, कल्याण निर्वाण प्राप्त करतो.(३)


२४.उद्योगी, जागृत, सुकर्मी, विचारवंत, संयमाने व सदाचाराने (धम्माप्रमाणे) जगणार्या, अप्रमादी मानवाची यशवृद्धी होते.(४)


२५.अप्रमादी मानव, उद्योगाने, संयमाने, शक्तीने, प्रज्ञावान असे बेट उभारतो ज्यास पुर बुडवु शकत नाही.(५)


२६.अज्ञानी दुर्बुद्ध मानव प्रमाद करतात, प्रज्ञावान श्रेष्ठ धनवत अप्रमादाचे रक्षण करतात.(६)


२७.प्रमाद कार्यरत असु नका, काम-रति च्या संसर्गात राहु नका, अप्रमादी ध्यानमग्न राहुन विपुल सुख मिळवितो.(७)


२८.जेव्हा ज्ञानी मानव प्रमादाला अप्रमादाने दुर घालवितो, तेव्हा तो प्रज्ञामहालावर आरुढ शोकरहित मानव शोकग्रस्ताला असे पहातो जसे पर्वतावर उभा धीर माणुस जमीनीवरच्या अज्ञानी माणसाला पहातो.(८)


२९.अप्रमादी, प्रमादाच्या सदाजागृत झोपलेल्याच्या असापुढे जातो, जसा वेगवान घोड अशक्ताच्या पुढे जातो.(९)


३०.अप्रमादाने इंद्र देवतांमध्ये श्रेष्ठ झाला, म्हणुनच अप्रमाद्याची प्रशंसा होते, प्रमाद्याची निंदा होते.(१०)


३१.प्रमादास घाबरणारा, अप्रमादी भिक्षु, लहानमोठ्या बंधनांना अग्नीसारखे जाळतो. (११)


३२.प्रमादास घाबरणार्या अप्रमादी भिक्षुची हानी होणे अशक्य. तो निर्वाणाच्या जवळ आहे.(१२)








३. चित्तवग्ग







३३.चित्त चंचल आहे, चपळ आहे, त्याला रक्षण करणे कठीण आहे. निवारण करण्यास दुष्कर आहे अशा चित्ताला बुद्धिमान माणुस सरळ करतो. जसा बाण बनविणारा बाणाला.(१)


३४.जलाशयातुन बाहेर काढुन जमिनीवर फेकलेल्या माशाप्रमाणे हे चित्त माराच्या बंधनातुन सुटण्यासाठी तडफडत असते.(२)


३५.निग्रह करण्यास कठीण, चपळ, जिकडे इच्छा असेल तिकडे जाणार्या चित्ताचे दमण करणे चांगले सुखकारक असते.(३)


३६. येथे कामइच्छा नष्ट करणार्या चित्ताला सदुदर्शन आहे, सुनिपुण करणे कठीण आहे. पण बुद्धीमान माणसे अशा चित्ताचे रक्षण करतात. रक्षण केल्या गेलेले चित्त सुखावह होते.(४)


३७.दुर जाणारे, एकटे फिरणारे निराकार ह्रदयात दडलेले असे हे चित्त या चित्ताला जे संयमीत करतील ते माराच्या बंधनातुन मुक्त होतील.(५)


३८.ज्याचे चित्त अस्थिर आहे, जो सद्धम्म जाणत नाही, जो प्रसन्नही आहे, त्याची प्रज्ञा परीपुर्ण होत नाही.(६)


३९.ज्याचे चित्त मलरहीत आहे, ज्याचे चित्त द्वेषरहीत आहे. जो पाप आणी पुण्यविरहित आहे, त्या जागृतास भय नाही.(७)


४०.हे शरीर मातीच्या घड्याप्रमाणे जाणुन, चित्ताला नगराप्रमाणे ठेऊन प्रज्ञारुपी शस्त्राने माराशी युद्ध करावे, आणी जिंकलेले रक्षण करावे व अनासक्त असावे.(८)


४१.अहो खरोखरच लवकरचे हे शुद्र शरीर चेतनारहित होऊन निरुपयोगी लाकडाच्या तुकड्याप्रमाणे जमिनीवर पडेल(९)


४२.शत्रु शत्रुचे किंवा वैरी वैर्याचे जितके अकल्याण करतो, त्यापेक्षा अधिक अकल्याण असत्य मार्गाला लागलेले चित्त करते.(१०)


४३.आईवडील किंवा इतर नातेवाईक जे करणार नाहीत त्यापेक्षा अधिक हित सत्य मार्गाला लागलेले चित्त त्याचे कल्याण करते.(११)








४. पुप्फवग्ग







४४.यमलोक (मृत्युला) आणी पृथ्वीला देवलोकांसह कोण जिंकेल? कोण या चतुर सिद्धांतांना फुलांसारखे (धम्मपदांना) सुंदर तयार करील?(१)


४५.प्रज्ञेचा शिष्य यमलोक आणी पृथ्वीला देवलोकांसह जिंकेल, प्रज्ञेचा चतुर शिष्य या सिद्धांतांना फुलांसारखे सुंदर तयार करील?(२)


४६.शरीर हे फेसासारखे, मृगजळासारखे समजुन पुर्ण ज्ञानी व्हावे, भुलैयाला फुलांसारखे तोडुन, मृत्युस अदृष्य व्हावे.(३)


४७.फुले वेचण्यात मनस्वी मग्न मानवास झोपलेल्या गावास नदी-पुराने वाहुन न्यावे तसे नेतो.(४)


४८फुले वेचण्यात मनस्वी मग्न असतात, वासनांच्या अतृप्तीतच अंत वश करतो.(५)


४९.जसे भ्रमर फुलांच्या रंग गंधाला त्रास न देता रंग घेऊन जातो, तसे सुजनाने गावात वावरावे.(६)


५०.दुसऱ्याच्या विरोधात, दुसऱ्याचे कृत्य, अकृत्य न पाहता, फक्त स्वतःचेच कृत्य अकृत्य पाहवे..(७)


५१.जसे सुंदर रंगीत फुल सुगंधाविना व्यर्थ असते, तसे कृतीविना गोड बोलणे व्यर्थ होते.(८)


५२.जसे सुंदर रंगीत फुल सुगंधामुळे सार्थ होते, तसे सत्कृत्यामुळे गोड बोलणे सार्थ होते.(९)


५३.जसे फुलांच्या राशीमधुन अनेक माळा करतात, तसेच जन्मलेल्या मानवाने अनेक सत्कृत्य करावी.(१०)


५४.फुलांचा वारा विरोधी दिशेने वहात नसतो, सुजनांचा गंध वारा विरोधी दिशेने वहातो, सर्व दिशांना पसरतो.(११)


५५.चंदन अथवा कमळाच्या गंधाहुन, सुशीलाचा (चांगल्या शीलांचा) गंध श्रेष्ठ आहे.(१२)


५६.तगर चंदनाचा हा गंध अत्यल्प आहे, परंतु शीलवान मानवाचा गंध महाजनांपर्यंत (देवापर्यंत) जातो..(१३)


५७.त्या शील संपन्न अप्रमादात रहाणाऱ्या, योग्य ज्ञानामुळे मुक्त मानवाचा मार्ग भुलैया अडवित नाही.(१४)


५८.जसे महामार्गावर टाकलेल्या कचर्यातुन मनोहर सुगंधि कमळ उगवते, (१५)


५९.तसेच कचर्यासमान अज्ञानाने, आंधळ्यासमान सामान्यजनांत सम्यक संबुद्धाचे शिष्य प्रज्ञेने खुप चमकतात.(१६)








५.बालवग्ग







६०. जागरण करणाऱ्याची रात्र लांबत जाते. थकणाऱ्याचा रस्ता लांबत जातो. सदाचार न जाणनाऱ्या अज्ञानीचा संसार (जीवन प्रवाह) लांबत जातो. (१)


६१ चालताना स्वतःपेक्षा श्रेष्ठ किंवा स्वतःसारखा सोबती न लाभल्यास खंबीरपणे एकाकी चालावे पण मुर्खाची संगत करु नये. (२)


६२. माझा पुत्र, माझी संपत्ती म्हणत अज्ञानी दुःखी होतात. आपण स्वतःच स्वतःचे नसतो तर कसला पुत्र?, कसली संपत्ती. (३)


६३. अज्ञानी स्वतःला अज्ञानी समजत असेल तरतो तितका ज्ञानी. अज्ञानी असुनही स्वतःला बुद्धीमान सांगतो तो खरा अज्ञानी. (४)


६४.अज्ञानी मानव जीवनभर बुद्धीमतांच्या सोबत राहिला तरी, त्याला सुसिद्धांत (धम्म) समजत नाही, जसे पळीला वरणाचा स्वाद (५)


६५.सुजाण मानव क्षणभरही बुद्धीमतांच्या सोबत राहिला तरी त्याला सुसिद्धांत (धम्म) समजतो, जसे जिभेला वरणाचा स्वाद. (६)


६६.अज्ञानी दुर्बुद्ध स्वतःच स्वतःचा शत्रु होतो, दुष्कृत्य करुन ज्याची फळे कडु असतात. (७)


६७.ते कृत्य चांगले नाही ज्याने पश्चाताप करावा लागतो. आणी ज्याचे परिणाम अश्रुपुर्ण चेहऱ्याने भोगावे लागतात. (८)


६८.ते कृत्य करणे चांगले आहे, जे केल्याने पश्चाताप करावा लागत नाही, ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने आणी चांगल्या मनाने भोगता येतात. (९)


६९.जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तोवर अज्ञानी त्याला गोड समजतात, जेव्हा दुष्कृत्य परिपक्व (परिणामकारक) होते, तेव्हा ते दुक्खी होतात. (१०)


७०.अज्ञानी मानवाने महिनो महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले, तरी तो सुसिद्धांत जाणणाऱ्याच्या सोळाव्या भागाच्या सममुल्य होत नाही. (११)


७१.वाईट केलेली कृत्ये ताज्या दुधासारखी त्वरीत नासत (परिणामीत होत) नाही, ति राखेन अच्छादित निखाऱ्यासारखी, अज्ञानी मानवाचा पाठलाग करतात. (१२)


७२.अज्ञानीचा जाणिवांचा आभाळापर्यन अनर्थ होतो, अज्ञानींच्या शुभकृत्यांचा नाश होतो, शिरांचा (बुद्धीचा) नाश होतो. (१३)


७३.भिक्खुंमध्ये आदर प्राप्ती हि इच्छा, हे दुष्टतेचे, चुकीचे आहे. मठ-मंदीराचा उपभोग, परक्या कुळाच्या लोकांकडुन पुजीले जाणे,, (१४)


७४.गृहस्थ व प्रज्वलीत या दोहोतुन माझ्यासारखा कोण? योग्य अयोग्य मार्गांवर माझेच स्वामित्व असते, अशी संकल्पना करणाऱ्या अज्ञानीच्या, आकांक्षा, गर्व वाढतो. (१५)

७५.लाभाचा मार्ग वेगळा, निर्वाणाचा मार्ग वेगळा, हे असे जाणुन बुद्धाच्या शिष्य भिक्खुने सत्काराने आनंदु नये, विवेकाची वृद्धी करावी. (१६)









६.पंडितवग्ग




७६.जो दोषाची बाजु दाखविणाऱ्याला संपत्तीच्या अस्तित्त्वासम समजतो, निग्रही, प्रज्ञावान, बुद्धीवाना सारख्यान्शी संगत करतो. तशा चित्ताच्या संगतीने भले होते, वाईट होत नाही. (१)


७७.जो उपदेश करतो, अनुशासन करतो, अनुचिताचे निवारण करतो. ते सुजनांना प्रिय असतात, दुर्जनांना अप्रिव असतात. (२)


७८.दुराचारी मित्राची संगत नको, अधम माणसाची संगत नको, कल्याणकारी मित्राची संगत करावी, उत्तम माणसाची संगत करावी. (३)


७९.सदाचारावर प्रीती असणारा, सुखाने निश्चिंत मनाने झोपतो. बुद्धीमान लोक, सुजनांनी सांगीतलेल्या सिद्धांतात सममाण करतात. (४)


८०.पाणी नेणारा पाणी नेतो, बाण बनविणारा बाण बनवितो, सुतार लाकुड बनवितो, बुद्धीमान स्वतःला कष्टवितात. (५)


८१.जसा मोठा पर्वत वाऱ्याने हलत नाही. तसेच बुद्धिमंत निंदा वा प्रशंसेने विचलित होत नाही. (६)


८२.जसे अथांग स्थिर तलाव नितळ स्वच्छ असतात, तसे बुद्धीमंत सदाचार सिद्धांत (धम्म) ऐकुन नितळ स्पष्ट होतात. (७)


८३.सत्पुरुष सर्वस्व त्यागतात, सुजन इच्छा भोगा संबंधी बोलतही नाही, सुखाने वा दुख्खाने विचारले तरी, बुद्धीमंत उच्च-नीचता पहात विकृत होत नाही. (८)


८४.न स्वतःसाठी, न दुसऱ्यासाठी, न पुत्राच्या इच्छेने, न राज्यासाठी, स्वतःच्या समृद्धीसाठी दुराचाराची (अधम्माची) इच्छा करतो, तो शिलवान, प्रज्ञावान, सदाचारी असतो. (९)


८५.जे लोक पार जातात ते मानवात कमीच, तेव्हा इतर प्रजा किनाऱ्यावरच धावत असते. (१०)


८६.जे लोक ह्या प्रकारे सम्यक धम्माचे पालन करतात, ते मृत्युपासुन दुर जातात. (११)


८७.काळा, वाईट स्वभाव सोडुन सुजनांनी शुभ सवय करावी, घरातुन बेघर होऊन विचाराने दुर जाऊन एकाकी व्हावे. (१२)


८८.वासनांचा त्याग करुन, तेथेच राहण्याची इच्छा करावी, स्वतःच्या चित्तातले क्लेष स्वच्छ करावे, (१३)


८९.ज्याचे चित्त सर्वांगाने सुबुद्ध, योग्य असते, विचार न करता निश्चयाने ग्रहणाच्या परित्यागात रममाण असतात, वाईट विचार क्षीण, प्रभावंत मानव या लोकांत निर्वाण प्राप्त करतात... (१४)









७.अरहन्तवग्ग







९०.मार्ग समाप्त केलेला (अंताला पोहोचलेला), शोकरहित, सर्वधा मुक्त, रर्व बंधन क्षीण माणवास परिताप होत नाही. (१)


९१.विचारवंत उद्योग करतात, घरात (सामान्य गोष्टीत) रमत नाहीत, जसा हंस तलाव सोडुन जातो, तसेच घरातले 'घर' सोडुन जातात. (२)


९२.जे संचय करत नाहीत, जे भोजनाची योग्य मात्रा जाणतात, शुन्य स्वरुप, निमित्य रहित विमुक्ती, ज्याच्या दृष्टीपथात आहे, त्यांची गती, आकाशात पक्षांची असते तशी अज्ञेय आहे. (३)


९३.ज्याचे वाईट विचार क्षीण आहेत, आहारात आसक्त नाही, शुन्य स्वरुप, निमित्य रहित विमुक्ती ज्याच्या दृष्टीपथात आहे, त्यांचे स्थान, आकाशात पक्षांचे असते, तसे अज्ञेय असते. (४)


९४.ज्याचे इंद्रिय शांत आहेत, जसा सारथ्याने सुशिक्षीत केलेला घोडा, अहंकार त्यागलेले, दुविचारहीन मानव महाजनांनाही (देवांना) प्रिय होतात. (५)


९५.जो सदाचारात पृथ्वीसारखा, नगर द्वार स्थंभा सम निश्चल असतो, त्याच्यात जगरहाटीचे अस्तित्व रहात नाही, जसे शेवाळ दुर केलेला तलाव. (६)


९६.शीणलेले मन, वाचा, कृती, शांत होतात, सुजाणतेमुळे विमुक्त होऊन, तसे चित्त शांत होते. (७)


९७.अश्रद्धा, अकृतज्ञता यांच्याशी संबंध छेदणारा मानव, शुभ-अशुभाच्या मर्यादा त्यागलेला, तो उत्तम मानव. (८)


९८.गाव किंवा रान, दरी किंवा पठार, जेथे अर्हंत रहातात ति भुमी रमणीय. (९)


९९.जेथे सामन्य लोक रमणाम होत नाही, तेथे अरण्यात सुजाण रमतात, तेथे वैरागी रमतात, कारण ते भोगाचा शोध घेत नाही. (१०)








८. सहस्सवग्ग







१००.हजारो निरर्थक पदांची गाथा बोलण्या पेक्षा, एक अर्थपुर्ण पद श्रेष्ठ जे ऐकुन शांती मिळते. (१)


१०१.हजारो गाथा निरर्थक पादांनी बनलेल्या पेक्षा, एक अर्थपुर्ण गाथा श्रेष्ठ जे ऐकुन शांती मिळते. (२)


१०२.शंभर निरर्थक पादांनी बनलेल्या गाथा सांगण्यापेक्षा, एक सदाचार पद श्रेष्ठ, जे ऐकुन शांती मिळते. (३)


१०३.जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या जेत्याहुन), जो एक स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय. (४)


१०४.इतर प्रजाजनांपेक्षा, स्वतःचा निश्चयाने विजय श्रेष्ठ, स्वतःला स्वतःच्या ताब्यात ठेवणे, नित्य संयमीत आचरणांचे पोषण. (५)


१०५.ना देव, ना गंधर्व, ना भुलैयासह आलेला ब्रह्मा, ना अशा प्रकारचा कोणीही जीव, या विजयाच पराजय करील. (६)


१०६.महिनो महिने हजार यज्ञ, शंभर वर्षापर्यंत पुन्हा पुन्हा, आणी एकच विषेश प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे पुजन श्रेष्ठ होते, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा. (७)


१०७.शतवर्ष, वनात विहारणाऱ्या जीवांना यज्ञात आहुती, आणी एकच विशेष प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे सत्कार श्रेष्ठ आहे, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा. (८)


१०८.या लोकात पुण्याच्या अपेक्षेने वर्षभर यज्ञ करणे, काही आहुती देणे, हे सर्व उज्वल-श्रेष्ठाला अभिवादन करण्याच्या चौथ्या भागा इतकेही नाही. (९)


१०९.अभिवादनशील नित्य, ज्येष्ठांची सेवा करणारे यांचे, आयुष्य, सौंदर्य, सुख, बळ हे चारही स्वभाव वाढतात. (१०)


११०.शीलहीन, एकाग्रचित्तहीन मानवाच्या शंभर वर्ष आयुष्याहुन, शीलवान ध्यानी मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. (११)


१११.प्रज्ञाहीन, एकाग्रचित्तहीन मानवाच्या शंभर वर्ष आयुष्याहुन, प्रज्ञावंताचा एक दिवस श्रेष्ठ असतो. (१२)


११२.आळशी, शौर्यहीन मानवाच्या शंभर वर्ष आयुष्याहुन दृढ उद्योगी, शूर मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. (१३)


११३.उत्पत्ती विनाश न पहाणाऱ्या, शंभर वर्ष आयुष्याहुन, उत्पत्ती विनाश पहाणाऱ्या मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. (१४)


११४.अमृतपद (निर्वाण) न पहाणाऱ्या मानवाच्या शंभर वर्ष आयुष्याहुन, अमृतपद पहाणाऱ्या मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. (१५)


११५.उत्तम जीवन सिद्धांत न पहाणाऱ्या मानवाच्या शंभर वर्ष आयुष्याहुन, उत्तम जीवन सिद्धांत पहाणाऱ्या मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. (१६)








९.पापवग्ग





११६.सत्कार्य त्वरेने करावे, चित्त दुष्कृत्यापासुन दुर करावे, सत्कार्य करण्यात शिथीलता आल्यास मन दुष्कृत्यात रमते. (१)

११७.मनुष्याने एकदा दुष्कृत्य केले तर ते पुन्हा पुन्हा करु नये, तशी इच्छा करु नये दुष्कृत्याचा संग्रह केल्याने दुःख वाढते. (२)


११८.मनुष्याने एकदा सत्कृत्य केले तर ते पुन्हा पुन्हा करावे, तशी इच्छा करावी, सत्कृत्याच्या संग्रहाने सुख वाढते. (३)


११९.दुष्कृत्य करणाऱ्याला चांगले वाटते जोवर दुष्कृत्याचे फळ त्याला मिळत नाही. जेव्हा दुष्कृत्यआचे फळ त्याला मिळते तेव्हा वाईट वाटते. (४)


१२०.सत्कृत्य करणाऱ्याला वाईट वाटते जोवर सत्कृत्य फलदायी होत नाही, जेव्हा सत्कृत्य पक्व होते तेव्हा त्याला चांगले वाटते. (५)


१२१.माझ्या जवळ दुष्कृत्य येणार नाही, असा गर्व करु नये, पाण्याच्या थेंबांनीच पाण्याचा घडा भरतो, अज्ञानी थोडे, थोडे दुष्कृत्य करुन पुर्ण साठवतो. (६)


१२२.माझ्या जवळ सत्कृत्य येणार नाही असा गर्व करु नये, पाण्याच्या थोड्या थोड्या थेंबांनीच पाण्याचा घडा भरतो, बुद्धीमान थोडे थोडे सत्कृत्य करुन पुर्ण साठवतो. (७)


१२३.व्यापारी, खुप धनवान, भयावह मार्गाची अप्रशंसा करतात, जगण्याची इच्छा असणारे विषाची, तशी मानवाने दुष्कृत्याची करावी. (८)


१२४.हाताला जखम नसेल तर हातात विष घेता येईल, जखम बाधिताला विष बाधत नाही, तसे न कर्त्याला दुष्कृत्य बाधत नाही. (९)


१२५.जो शुद्ध, दोषरहीत, पोषीत मानवाचा द्वेष करतो, काहि दुष्टता करतो, तो अज्ञानीच वाईट होतो, जसे वाऱ्याच्या विरुद्ध फेकलेली सुक्ष्म धुळ फेकणाऱ्यावरच पडते. (१०)


१२६.काही गर्भात जन्मतात, दुष्कर्मी नरकात जातात, सन्मार्गी स्वर्गात जातात, सत्वित्त निर्वाण प्राप्त होतात. (११)


१२७.न अंतरिक्षात, न समुद्रात, न विवरात शिरुन, जगात असा प्रदेश विद्यमान नाही, जेथे राहुन मानव दुष्कृत्य (परिणाम) मुक्त राहील. (१२)


१२८.न अंतरिक्षात, न समुद्रात, न पर्वतावर, न विवरात शिरुन जगात असा प्रदेश विद्यमान नाही, जेथे राहुन मानव मृत्यु मुक्त राहील. (१३)








१०.दंडवग्ग




१२९.शिक्षेला सर्वच घाबरतात, मृत्युला सारेच भितात, सर्वांना स्वतःसारखेच समजावे, मारु नये, वध करु नये. (१)


१३०.शिक्षेला सर्वच घाबरतात, साऱ्यानाच जीव प्रिय असतो, सर्वांना स्वतःसारखेच समजावे, मारु नये, वध करु नये. (२)


१३१.सुखाच्या इच्छेने जो सुख इच्छिणाऱया प्राण्यांना काठीने मारतो, त्याला सुख लाभत नाही. (३)


१३२.सुखाच्या इच्छेने, जो सुख इच्छिणाऱ्या प्राण्यांना, काठीने मारत नाही, त्याला सुख लाभते. (४)


१३३.कधिही कठोर बोलु नये, त्याचे तसेच प्रत्युत्तर मिळते, कठोर बोलणे दुक्खदायक असते, त्याने तुम्हास दंडाचेच प्रत्युत्तर मिळते. (५)


१३४.तुम्हास इजा झाली तरी काश्यासम अविचल राहिल्यास, तुम्हास निर्वाण प्राप्त झाले आहे, काहिही विवाद राहिलेला नाही. (६)


१३५.जसे गोपाल गाईंना काठीने हाकलीत रानात नेतात, जसे वार्धक्य आणी मृत्यु प्राण्यांचे आयुष्य नेतात. (७)


१३६.दुष्कर्म करणाऱ्या अजाणास काहीच समजत नाही, पण याच कर्माने दुर्बुद्ध अग्नित जाळल्यासारखे तप्त होतो. (८)


१३७.जो निःशत्र प्राण्यास शस्त्राने, दोषरहीतास, दोषाने त्रासतो, त्याच्या ठाई या दहांपैकी एक वेदना त्वरीत निर्माण होते. (९)


१३८.कठोर वेदना, हानी, शरीर भेदन, गंभीर आजार जडणे, मनोविकाराची प्राप्ति!(१०)


१३९.राजाकडुन शिक्षा, तीव्र आरोप, नातेवाईकांचा विनाश, संपत्तीचा विनाश. (११)


१४०.त्याच्या घराला आग जाळुन टाकते, अशा दुर्बुद्धाचा शरीर नाशानंतर नरकात पुनर्जन्म होतो. (१२)


१४१.न नग्न राहुन, न जटा वा चिखल धारण करुन, न निराहार राहुन, ना कडक जमीनीवर झोपुन, ना धुळ माखुन, ना उकिडवे बघुन, मानवाची शुद्धी होते. ज्याचे मन शुद्ध नाही, त्या मानवाची शुद्धी होत नाही. (१३)


१४२.अलंकार लेऊनही ज्याचे आचरण योग्य आहे, जो शांत, संयम, ब्रम्हचारी आहे, ज्याने सर्व प्राण्यांना त्रास देणे त्रासले आहे, तोच ब्राह्मण, तोच श्रमण, तोच भिक्खु. (१४)


१४३.लोकांत काही मानव असे असतात, ज्यांना स्वतःची लाज दुष्कृत्यांपासुन रोखते, त्यांना निंदा असह्य असते, जसे घोड्याला चाबुक. (१५)


१४४.जसा घोडा चाबकामुळे सरळ असतो, तसे वेगवान, तत्पर व्हावे, श्रद्धा, शील, वीर्य, एकाग्रता, सदाचार निश्चय यांनी युक्त व्हावे. विद्या आणी आचरणाने संपन्न विचारवंत व्हावे, आणी मोठ्या दुक्खाचा नाश करावा. (१६)


१४५.पाणी नेणारा पाणी नेतो, बाणकार बाण बनवितो, सुतार लाकुड बनवितो, सुवृत्त मानव स्वतःला कष्टवितात. (१७)








११.जरावग्ग






१४६.कसे हसणे? काय आनंद? जाणीवा नित्य जळत आहेत. अज्ञानाच्या अंधकाराने वेढलेल्या मानवा प्रज्ञेच्या प्रदीपाचा शोध का घेत नाहिस? (१)


१४७.जखमांनी सुजलेल्या, व्रणांनी सजलेल्या या शरीराचे चित्र पहा, रोग आणी नाना संकल्पनांनी युक्त, याचे निश्चित स्थान नाही. (२)


१४८अतिशय जुने झालेले हे शरीर, रोग-स्थान आहे, क्षणभंगुर आहे, सडुन भग्न होणार आहे, सर्व जीव मरणारच. (३)


१४९.शरद काळी अपथ्य असणाऱ्या भोपळ्यासारखे हे शरीर शुभ्र कबुतरासारखी पांढरी हाडे, हे पाहुन काय आसक्ति व्हावी?(४)


१५०.हे शरीर हाडांचे वास्तव्य त्यावर रक्तामासांचे लेपन केले आहे, त्यात वृद्धत्व, मृत्यु, गर्व, द्वेष, लपविलेला आहे. (५)


१५१.सुंदर रंगविलेला राजरथ जुना होतो, असेच शरीर म्हातारे होते, जागृत जीवन सिद्धांत (धम्म) जीर्ण नाही, असे सुजान विज्ञापीत करतात. (६)


१५२.थोडेसेच ऐकलेला अज्ञानी मानव, बैलासारखा मांसाने वाढतो, म्हातारा होतो, त्याचे ज्ञान वाढत नाही. (७)


१५३.अनेक जन्म, विश्रांतीविना, सतत फिरत आहे, या घराच्या (शरीर) निर्मात्याला शोधीत पुन्हा पुन्हा वेदना. (८)


१५४.घराच्या निर्मात्या तु मला दिसलास, तु पुन्हा घर करणार नाहिस, सगळ्या बरगड्या मोडल्या आहेत, छप्पर नष्ट पावले आहे, मन निशंक झाले आहे. लालसांचा क्षय झाला आहे. (९)


१५५.ब्रह्मचर्य आचरले नाही, तारुण्यात धनप्राप्ती केली नाही. ते बिन माशांच्या तलावात म्हाताऱ्या करकोचासारखे ध्यान लावतात. (१०)


१५६.ब्रह्मचर्य आचरले नाही, तारुण्यात धन प्राप्ती केली नाही. ते जुन्या धनुष्यबानासारखे पश्चाताप करतात. (११)








१२. अत्तवग्ग






१५७.जर स्वतःवर प्रेम करत असाल, स्वतःला श्रेष्ठ संरक्षित करा. बुद्धीमंत रात्रीच्या तीन प्रहरातील एक प्रहर जागृत असतात. (१)


१५८.जे योग्य आहे ते प्रथम स्वतः करावे, नंतर इतरांना सांगावे म्हणजे बुद्धीमंतांना डाग लागणार नाही.. (२)


१५९.इतरांना जसे सांगतो, तसेच स्वतः करतो, तो इतरांना संयमीत करतो, वास्तविक स्वतःला संयमीत करणे कठीण आहे.. (३)


१६०.मनुष्य स्वतःच स्वतःचा स्वामी असतो, दुसरा कोण स्वामी असतो? स्वतःला संयमीत करणाऱ्यास दुर्लभ सामीत्वाचा लाभ होतो. (४)


१६१.स्वतः केलेले, स्वतः जन्म दिलेले, स्वतःतुन निर्माण झालेले दुष्कर्म, दुर्बुद्धाला असे तोड-फोडते जसे वज्र दगडात रुतलेल्या मण्याला. (५)


१६२.ज्याचा दुराचार शाल वृक्षावर पसरलेल्या वेलीसारखा पसरला आहे, तो तसेच करतो, जसे शत्रु इच्छितो.(६)


१६३.अमंगल स्वतःला अहितकारी कृत्ये करणे सोपे असते. मंगल स्वतःला हितकारी कृत्ये करणे कठीण असते. (७)


१६४.जी शिकवण योग्य, सुजनांचा जीवन सिद्धांत, यांची निंदा करणाऱ्या दुर्बुद्धाचा असा नाश होतो, जसे बांबुचे फळ स्वनाशासाठीच परिपक्व होते. (८)


१६५.स्वतः केलेले दुष्कर्म स्वतःला कलुषीत करतात, स्वतः न केलेले दुष्कर्म स्वतःला शुद्ध करतात, प्रत्येकाची शुद्धी अशुद्धी वेगवेगळी असते, कुणीही दुसरा दुसऱ्याला शुद्ध करत नाही..(९)


१६६.परोपकारासाठी स्वार्थाची खुप अपेक्षा करु नये, स्वार्थाला नीट समजुन घेवुन आत्मकल्याण पहावे.(१०)








१३.लोकवग्ग






१६७.हीन कृत्ये करु नये, बेपर्वा राहु नये, वाइट दृष्टी ठेवु नये, लोक वृद्धीची अपेक्षा बाळगु नये.(१)


१६८.उठा, अजागृत राहु नका, सैद्धांतिक (धम्मा प्रमाणे) जीवन जगा. सदाचाराने राहणारे सगळीकडे सुखी राहतात.(२)


१६९.सैद्धांतिक (धम्मा प्रमाणे) जीवन जगा, दुर्गुणांनी राहु नका, सदाचाराने राहणारे सगळीकडे सुखी राहतात.(३)


१७०.जसे बुडबुड्याकडे पहावे, जसे मृगजळाकडे पहावे, जसे निरिच्छपणे जो जीवनाकडे पहातो, त्याच्याकडे मृत्युराजा पहात नाही.(४)


१७१.चित्रासारख्या सुंदर राजरथाप्रमाणे ह्या जगाला पहा, जसे अज्ञानी धडपडतात तसे सुजाण आसक्त होत नाही. (५)


१७२.जे आधी बेपर्वा असतात, पण जाणीव झाल्यानंतर बेपर्वा असत नाही, ते वादळातुन मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे ह्या विश्वात प्रकाशमान होतात. (६)


१७३.जे आधी केलेल्या दुष्कृत्यांना आपल्या सत्कृत्यांनी झाकुन टाकतात ते ढग बाजुला झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व जगात प्रकाशमान होतात. (७)


१७४.हे जग अंध आहे, इथे थोडेच पाहतात, जाळ्यातुन सुटलेल्या पक्षासारखे थोडेच स्वर्गात (सुखाकडे) जातात. (८)


१७५.हंस सुर्यपथावर जातात, ॠद्धीप्राप्त. आकाशातुन जातात. सेनेसह आलेल्या भुलैयाला जिंकतात ते, या लोकांतुन निघुन जातात.(९)


१७६.जो एक (सत्य) सदाचाराला पार करतो, जो खोटे बोलणारा जीव आहे, ज्याने परलोक तुच्छिला आहे, तो करणार नाही असे दुष्कृत्य नाही.(१०)


१७७.कंजुष देवलोकांत जात नाही, ते कधी देव बनु शकत नाही, अज्ञानी ज्ञानाची प्रशंसा करत नाही, बुद्धीमान ज्ञानाचे अनुमोदन करतात त्यामुळे सगळीकडे ते सुखी असतात.(११)


१७८.एकट्याने पृथ्वीचा राजा होण्यापेक्षा, स्वर्गात (सुखाच्या साम्राज्यात) जाण्यापेक्षा, सर्व लोकांचा अधिपती होण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, सैद्धांतिक जीवनपथाचे फळ...(१२)








१४ .बुध्दवग्ग






१७९.ज्याच्या जयाच्या अविजय होणार नाही, ज्याच्या जयापर्यंत या लोकांतील कोणीही जाणार नाही, त्या विस्तीर्ण हिरवळ रुपी निष्कलंक बुद्धांना तुम्ही आपल्या आयुष्यात कोणत्या मार्गाने न्याल? (१)


१८०.ज्याला विषाचे जाळे पसरविणारी तृष्णा कोठेही नेऊ शकत नाही, त्या हिरवळ रुपी निष्कलंक बुद्धांना तुम्ही आपल्या जीवनात कोणत्या मार्गाने न्याल? (२)


१८१.जो ध्यानस्थ, धीर, संसार त्यागुनही, संतुष्ट आहे, त्य स्मृतीवान सम्यक संबुद्धावरसर्व मनुष्य आणी देवही प्रीती करतात. (३)


१८२.मनुष्य जीवन मिळणे फार कठीण आहे. मर्त्य माणसाला जीवन जगणे कठीण आहे, सद्धम्माचे श्रवण करणे कठीण आहे. बुद्धाचा जन्म होणे अत्यंत कठीण आहे.(४)


१८३.सर्व पापे न करणे, सत्कृत्याचा अवलंब करणे, चित्त शुद्ध करणे, हेच बुद्धाचे शासन आहे.(५)


१८४.बुद्ध सांगतात, 'शांती, सहनशीलता अत्युच्च साधना आहे. निर्वाण अत्युच्च आहे. पर घात करणारा प्रव्रज्जीत होत नाही, दुसऱ्याना त्रासवणारा श्रमण होत नाही. (६)


१८५.निंदा न करणे, घात न करणे, भिक्खु नियमांचे पालन न करणे, माफक भोजन, एकांतात शयन आसन, एकाग्र चित्ताचा प्रयत्न हेच बुद्धाचे शासन. (७)


१८६.सोन्या नाण्यांच्याही वर्षावाने इच्छांची तृप्ती होत नाही, काम भोग अल्पस्वादी वेदनादायी आहेत, हे ज्ञानीजन जाणतात. (८)


१८७.परंतु ज्ञानीजन दिव्य कामभोगातही आसक्ति प्राप्त करत नाही, सम्यक संबुद्धाचे शिष्य तृष्णा नाशात मग्न रहातात. (९)


१८८.भितीने मानव पर्वत, वन, उद्यान, वृक्ष ,चैत्य, इत्यादींना शरण जातो, यांना शरण जाण्याने सर्व वेदनांचे उच्चाटन होणार नाही,.(१०)


१८९.हे शरण जाणे कल्याणकारी नाही, हे शरण जाणे उत्तम नाही, हे शरण जाणे उच्चाटन नाही. (११)


१९०.जो बुद्ध, धम्म आणी संघाला शरण जातो, तो आपल्या सम्यक प्रज्ञेने चार आर्यसत्य जाणतो. (१२)


१९१.वेदना, वेदनांचे कारण, वेदनेचे निवारण, वेदना निवारण्याचा आर्य अष्टांग मार्ग. (१३)


१९२.हेच त्याचे कल्याणकारी अनुसरण, उत्तम अनुसरण, याच अनुसरणाने सर्व वेदनांचे उच्चाटन होते. (१४)


१९३.उत्तम मानव जीवन दुर्लभ, ते सर्वांना प्राप्त होत नाही, ज्याला ते प्राप्त होते, त्या ज्ञानी मानवाच्या कुळाचे सुख वाढते. (१५)


१९४.भगवान बुद्धांचा जन्म सुखकारक आहे, भगवान बुद्धांची सद्धम्मोपदेश सुखकारक आहे, भगवान बुद्धांची संघएकता सुखकारक आहे, भगवान बुद्धांची समुह तपश्या सुखकारक आहे. (१६)


१९५.पुज्यनीय बुद्ध व त्यांचे शिष्य, जे प्रपंचाच्या आणी शोकाच्या पलीकडे गेले आहेत. (१७)


१९६.अशा शांत, निर्भय बुद्ध व त्यांचे शिष्य यांच्या पुजनाचे पावित्र्य 'फक्त इतके' असे सांगणे कोणासही शक्य नाही. (१८)








१५. सुखवग्ग






१९७.निश्चित सुखी आहोत! वैर करणा ऱ्यात अवैरी राहुन.. वैरी माणसांत आम्ही अवैरी सुखी आहोत.(१)


१९८.निश्चित सुखी आहोत! रोगी जीवांमध्ये निरोगी राहुन, रोगी माणसांत आम्ही निरोगी विहार करतो, (२)


१९९.निश्चित सुखी आहोत! आसक्त माणसांत अनासक्त राहुन. आसक्त माणसांत आम्ही अनासक्त विहार करतो.(३)


२००.निश्चित सुखी आहोत! आम्हाजवळ देण्यासारखे काहीच नाही, प्रियदर्शी देवांसारखे प्रेम हेच आमचे भोजन आहे. (४)


२०१.जयाने वैर निर्माण होते, परिजीत दुक्खात रहातो, शांतचित्त मानव जय-पराजय सोडुन सुखाने झोपतो.(५)


२०२.आसक्ति सारखा अग्नी नाही, द्वेषा सारखा पराजय नाही, पाच स्कंधांसारखे दुक्ख नाही, शांतीसारखे सुख नाही.(६)


२०३.भुक हा मोठा रोग आहे, संस्कार (भौतिकता) हे मोठे दुक्ख आहे, या यथार्थाला जो जाणतो त्याच्यासाठी निर्वाण हे मोठे सुख आहे. (७)


२०४.निरोगी असणे खुप लाभदायक, संतुष्टी श्रेष्ठ संपदा, विश्वास हा चांगला नातेवाईक आहे, निर्वाण हे श्रेष्ठ सुख आहे.(८)


२०५.एकांतवासाचे व शांतीच रसपान केल्याने मानव निर्भय होतो, सदाचाराच्या रसपानाने निष्पाप होतो. (९)


२०६.सज्जनांचे दर्शन चांगले, संगत सदा सुखकर, अज्ञानींचे दर्शनही न होणे, नित्य सुखकर.(१०)


२०७.अज्ञानींची संगत करणारा खुप काळापर्यंत पश्चाताप करतो, अज्ञानींची व शत्रुंची संगत सदैव सारखीच दुक्खदायक. बुद्धीमानांची संगती नातेवाईकांच्या मेळ्यांसारखी सुखद असते.(११)


२०८.म्हणुन बुद्धीमान, प्रज्ञावंत, बहुश्रुत, शीलभार साहणारा, व्रतस्थ सुजन व सुबुद्ध सज्जनांची संगत करावी, जसा चंद्र नक्षत्र मार्गाची संगत करतो... (१२)








१६.पियवग्ग






२०९.स्वतःला अनुचीत कार्यात लावणारा, उचीत कार्यात न लावणारा, अर्थपुर्ण सोडुन प्रियाच्या मागे लागणारा त्याने आत्मसाधनेची इच्छा करावी.(१)


२१०.प्रियजनांच्या संगतीत राहु नका, अप्रियांच्या संगतीत तर कधीच राहु नका, प्रियजनांचे दर्शन न होणे, अप्रियांचे दर्शन होणे, दोन्ही दुःखाचे असते... (२)


२११.म्हणुन काहीही प्रिय करु नका.. प्रिय व्यक्ती अथवा वस्तु जीवनातुन निघुन गेल्याने दुःख होते... ज्यांना बंधन नसते त्यांना प्रिय अप्रिय असत नाही. (३)


२१२.प्रिया मुळे शोक उत्पन्न होते, प्रिया मुळे भिती उत्पन्न होते. जो प्रिया पासुन मुक्त असतो त्याला शोक नसतो, तर भिती कसली?(४)


२१३.प्रेमा मुळे शोक उत्पन्न होते, प्रेमा मुळे भिती उत्पन्न होते, जो प्रेमा पासुन मुक्त असतो, त्याला शोक नसतओ, तर भिती कसली?(५)


२१४.आसक्ती मुळे शोक उत्पन्न होतो, आसक्ती मुळे भिती उत्पन्न होते. जो आसक्ती पासुन मुक्त असतो, त्याला शोक नसतो,, तर भिती कसली?(६)


२१५.भोगा मुळे शोक उत्पन्न होतो, भोगामुळे भिती उत्पन्न होते. जो भोगा पासुन मुक्त असतो, त्याला शोक नसतो,, तर भिती कसली?(७)


२१६.लालसे मुळे शोक उत्पन्न होतो, लालसेमुळे भिती उत्पन्न होते. जो लालसे पासुन मुक्त असतो, त्याला शोक नसतो,, तर भिती कसली?(८)


२१७.जो शील संपन्न दृष्टीसंपन्न आहे, सदाचाराने सत्यवचनी आहे. स्वतःचे काम स्वतः करणारा आहे, त्या मानवास लोक प्रेम करतात. (९)


२१८.ज्याला अव्याख्याची अभिलाषा आहे आणी त्याला मनाने स्पर्ष केला आहे, जो काम-भोगात अनासक्त असतो त्याला उर्ध्वगामी (उच्च स्त्रोताकडे जाणारा) म्हणतात.(१०)


२१९.फार पुर्वी प्रवासाला गेलेला माणुस, दुरवरुन सुखरुप परत येतो, तेव्हा नातेवाईक-मित्र सुह्रदयाने येणार्याचे अभिनंदन करतात.(११)


२२०.याच प्रकारे सत्कर्म करणार्याचे या लोकांतुन दुसरीकडे,, त्याचे सत्कर्म स्वागत करतात... जसे नातेवाईक प्रिय व्यक्तीचे करतात... (१२)








१७.कोधवग्ग





२२१.क्रोध सोडावा, अभिमान सोडुन द्यावा. सर्व बंधनातुन मुक्त व्हावे. त्या नामरुपात आसक्त न होणाऱ्या व परिग्रहरहित माणसास दुःख, त्रास देत नाहीत.(१)


२२२.जो उसळलेल्या क्रोधाला भरकटलेल्या रथासारखे रोकु शकतो त्यालाच मी सारथी म्हणतो इतर लोक केवळ दोर धरणारेच आहेत.(२)


२२३.अक्रोधाने क्रोधाला जिंकावे. असाधुत्त्वाला साधुत्त्वाने जिंकावे. कंजुषाला दानाने जिंकावे. खोट्याला खऱ्याने जिंकावे.(३)


२२४.सत्य बोलावे रागावु नये. कमी मागीतल्यावरही द्यावे. या तिन्ही गोष्टींनी मनुष्य देवांच्या जवळ जातो.(४)


२२५.जी मानसे अहिंसक आहेत. नेहमी आपल्या शरीराने संयमीत आहेत. ते त्या अतिउच्च पदास जातात. ज्यामुळे तेथे जाऊन शोक करीत नाहीत.(५)


२२६.नेहमी जागृतशील होऊन दिवसरात्र योगाभ्यासात मग्न राहणाऱ्या व निर्वाण प्राप्तीचा उद्देश ठेवणार्या मानसाचे आश्रव नष्ट होतात.(६)


२२७.अतुल ही जुनी गोष्ट आहे. आजची नाही. शांत बसुन राहणाऱ्याची लोक निंदा करतात. आणी जास्त बोलणाऱ्याचीही निंदा करतात. कमी बोलणाऱ्याची सुद्धा निंदा करतात. जगात निंदा न होणारा कोणीही नाही.(७)


२२८.सर्वस्वी निंदीत म्हणुन किंवा सर्वस्वी प्रशंशीत म्हणुन इतर कोणीही होणार नाही. आणी सध्या पण नाही.(८)


२२९.ज्ञानी लोक जाणुन बुजुन जे निर्दोष आहेत, अशा आचरण करणाऱ्या बुद्धीमान, प्रज्ञा व शीलयुक्त माणसाची दररोज प्रशंशा करतात.(९)


२३०.जशी सोन्याच्या मोहरांची निंदा कोणी करीत नाही. त्याप्रमाणे त्या माणसाची निंदा कोणीही करु शकत नाही. देव (श्रेष्ठजन) सुद्धा त्याची स्तुती करतात.(१०)


२३१.कायीक दुराचारापासुन रक्षण करावे. कायेने संयमीत राहावे. कायीक दुराचार सोडुन वाची सदाचाराचे आचरण करावे.(११)


२३२.वाणीच्या दुराचारापासुन सावध रहावे, रक्षण करावे. वाचेने संयमीत राहावे. वाचीक दुराचार सोडुन वाचीक सदाचाराचे आचरण करावे.(१२)


२३३.मानसीक कोपापासुन रक्षण करावे. मनाने संयमी होतो. मनाचे दुचरित्र आचरण सोडुन देऊन मनानी चांगले आचरण करावे.(१३)


२३४.धैर्यवान पुरुष कायेने संयमीत असतात. किंवा वाणीने संयमीत असतात. मनाने संयमीत असतात ते पुर्णपणाने संयमीत असतात.. (१४)








१८.मलवग्ग






२३५.आतुन तु पिकल्या (पिवळ्या) पानासारखा आहेस, जवळ यमदुत उभे आहेत, तु मृत्युद्वारी उभा आहेस. आणी प्रवासासाठी तुझ्याजवळ शिदोरीही नाही. (१)


२३६.म्हणुन तु स्वतःच स्वतःचा दीपक हो, त्वरीत प्रयत्न करुन ज्ञानी हो, म्हणजे मलरहीत, दोषरहीत राहुन तु दिव्य आर्यभुमी प्राप्त करशील..(२)


२३७.आता तुझे आयुष्य अंतापर्यंत आणले आहे, तु यमाजवळ गेलेला आहेस. मध्ये कोठेही निवारा नाही. आणी तुझ्याजवळ शिदोरीही नाही.(३)


२३८.म्हणुन तु स्वतःच स्वतःचा दीपक हो, त्वरीत प्रयत्न करुन ज्ञानी हो,(४)


२३९.प्रज्ञावान क्रमाने, क्षणोक्षणी थोडा थोडा स्वतःचा मळ दुर करतो, जेसे सोनार सोन्याचा मळ दुर करतो.(५)


२४०.जसे लोखंडावर मळ (गंज) चढतो, आणी तेथेच स्वतःला (लोखंडाला) खातो, तसे सदाचाराची मर्यादा ओलांडणारे स्वकर्मानेच दुर्गतीला जातात.(६)


२४१.पठण नसणे मंत्राचा मळ, अकार्यशीलता घराचा मळ, दुषृत्य सदवर्तनाचा मळ, या लोकांत व दुसऱ्या लोकांतही. (७)


२४२.दुराचार स्त्रीचा मळ, कंजुसपणा दात्याचा मळ, दुष्कृत्य सदवर्तनाचा मळ आहे, या प्रदेशात, व दुसऱ्या प्रदेशातही.(८)


२४३.या सर्व मळांहुन अधिक मळ आहे, अविद्या हा मोठ्ठा मळ आहे. सुजनांनो या मळाला दुर करुन निर्मळ (९)


२४४.बळकावण्यात शुर, निर्लज्ज कावळ्यासमान दुस्साहसी, कलुषीत जीवन जगणे सोपे आहे. (१०)


२४५.दुराचारास लज्जीत नित्य पवित्र्याचा ध्यास असणारे, शुद्धतेत निसंकोच व विस्तृत, जीवन जगणे कठीण आहे.(११)


२४६.जो या जगात प्राण्यास मारतो, खोटे वचन बोलतो, जे दिलेले नाही ते घेतो, पर स्त्री कडे जातो,,(१२)


२४७.जो नशा करतो, असा मनुष्य प्रयत्नित असतो, इथेच याच लोकांत स्वतःचापाया (आधार) खणण्यात. (१३)


२४८.म्हणुन हे मानवा! दुराचार असंयम जाणुन घे, तुझे लोभ आणी दुराचार तुला कायमचे दुःखात लोटु नयेत. (१४)


२४९.लोक श्रद्धेनुसार, प्रसन्नतेनुसारदान देतात, तेथे, इथेर जणांच्या खाणपाणात उत्साहहीन असतात, ते दिवसा किंवा रात्री एकाग्रचित्त होत नाही. (१५)


२५०.या इर्ष्या भावनेचे संपुर्णपणे, मुळासकट उच्चाटन करतात. ते दिवसा किंवा रात्री कधीही एकाग्रचित्त होतात.(१६)


२५१.आसक्ती सारखी आग नाही, द्वेषासारखा ग्रह नाही, अज्ञानासारखे जाळे नाही, तृष्णेसारखा प्रवाह नाही.(१७)


२५२.इतरांचे दोष पाहणे सहज, स्वतःचे मात्र कठीण, दुसर्यांच्या दोषांना मानव भुशांसारखे उडवतो, स्वतःचे दोष असे झाकतो, जसे ठग स्वतःचा पराजय.(१८)


२५३.जो दुसऱ्याचे दोष पाहणारा, कायम तक्रार करणारा, त्याचे दुर्विचार वाढतात, त्याच्या दुर्विचारांचा क्षय होत नाही.(१९)


२५४.आकाशात चिन्ह नाही, बुद्ध जीवन मार्गाबाहेर (विना) श्रमण नाही. सामान्यजन प्रपंचात मग्न असतात, तथागत प्रपंचहीन आहेत.(२०)


२५५.आकाशात चिन्ह नाही, बुद्ध जीवन मार्गाबाहेर (विना) श्रमण नाही. संस्कार (भौतीकता) शाश्वत नाही. बुद्धांमध्ये संस्कार उत्सुकता नाही. (२१)








१९.धम्मट्ठवग्ग




२५६.जो न्यायी होत नाही, ज्याच्याकडुन अर्थाची मनमानी होते, ज्ञानी मानव अर्थ-अनर्थ दोहोंची निश्चिती करतो.(१)


२५७.जो मनमानी न करता, पक्षपात न करता, न्यायाचे मार्गदर्शन करतो, सदाचाराचे रक्षण करतो, त्यालाच प्रज्ञावंत न्यायी म्हटले जाते.(२)


२५८जो खुप बोलतो, तो ज्ञानी असत नाही, क्षमाशील अवैरी (सर्वमित्र), निर्भय असा मानव ज्ञानी म्हटल्या जातो.(३)


२५९.जोवर मानव खुप बोलतो, तोवर तो सदाचारी (धम्मधर) होत नाही, जो थोडे ऐकुन त्यानुसार आचरण करतो, जो आचरणात बेपर्वा नसतो, तोच सदाचारी (धम्मधर) असतो.(४)


२६०.डोक्याचे केस पांढरे झाल्याने कोणी थोर होत नाही, त्याचे वय वाढले असते, तो व्यर्थच म्हातारा म्हणविल्या जातो, (५)


२६१.ज्याच्यात सत्य, अहिंसा, संयम व दम आहे तो निर्मळ बुद्धीमान मानव थोर म्हणविल्या जातो.(६)


२६२.बोलायला, चालायला चांगले असल्याने, कमळासारखे सौंदर्य असल्याने, इर्ष्यावान, मत्सरी शठ मानव सर्वगुणसंपन्न साधु होत नाही.(७)


२६३.या ( इर्ष्या-मत्सर) भावनेचे संपुर्णपणे, मुळासकट उच्चाटन करतो, तो दोषहीन, प्रज्ञावान मानव सद्गुणसंपन्न साधु म्हणविला जातो.(८)


२६४.व्रतस्थ नसलेला, अयोग्य बोलणारा, मुण्डन केल्याने श्रमण होत नाही, इच्छा लोभाने भरलेला श्रमण कसा होईल?(९)


२६५.जो लहान मोठ्या सर्व दुष्कर्मांचे निवारण करतो, तो दुष्कर्म निवारण्याने श्रमण म्हणविला जातो.(१०)


२६६.तोपर्यंत केवळ भिक मागतो म्हणुन भिक्खु होत नाही, जोपर्यंत तो ताज्य गुणांचा अंगीकार करतो, भिक्खु होत नाही.(११)


२६७.जो पाप पुण्याच्या सिमेपार आहे, ब्रह्मचारी आहे, जो विचारपुर्वक आचरण करतो, तो भिक्खु म्हणविला जातो. (१२)


२६८.फक्त मौन पालनाने मुर्ख, अज्ञानी मानव मुनी होत नाही.जो तराजु धारण केल्याप्रमाणे उत्तमाचे ग्रहण करतो तो ज्ञानी. (१३)


२६९.मनन करुन जो दुष्कृत्याचा त्याग करतो तो मुनी, सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागतो, त्याला सज्जन म्हटले जाते, (१४)


२७०.प्राण्यांना मारतो तो सज्जन होत नाही, सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागतो त्याला सज्जन म्हटले जाते.(१५)


२७१.शीलवान होवुन, व्रतस्थ होवुन, खुप सदुपदेश ऐकुन, किंवा एकाग्रचित्त होवुन, वेगळे एकांत राहुन,,,(१६)


२७२.संसारत्यागाचे सुख, असामान्यजनांची सेवा, मी स्पर्शीली, (असे समजुन) हे भिक्खु! चित्त मल क्षय विश्वस्त होवु नका..(१७)








२०.मग्गवग्ग






२७३.मार्गात अष्टांग मार्ग श्रेष्ठ, सत्यात चार वचन (आर्यसत्य) श्रेष्ठ, सिद्धांतात विराग (निर्वाण) श्रेष्ठ, द्विपादांत (मानवात) दृष्टीवंत (बुद्ध).(१)


२७४.विशुद्धी दर्शनाचा (पावित्र्य प्राप्तीचा) हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही, तुम्ही याच मार्गावर चला, हा मार्ग भुल भुलैयालाच भुलवतो.(२)


२७५.या मार्गानेच तुम्ही दुक्खाचा अंत करु शकाल, हा मार्ग मी स्वतः बाणाचे शल्य (वेदनेचे कारण) समजुन सांगीतला आहे.(३)


२७६.तुम्हालाच प्रयत्न करायचा आहे, तथागत मार्गदर्शक आहेत, या मार्गक्रमणाने, एकाग्र होवुन तुम्ही भुलैयाच्या बंधनातुन मुक्त व्हाल.(४)


२७७.सर्व संस्कार अनित्य आहे, हे जेव्हा प्रज्ञेने पहातो, तेव्हा दुक्खाची समाप्ती होते. हाच विशुद्धीचा मार्ग आहे.(५)


२७८.सर्व संस्कार (भौतिकता) दुक्खद आहेत, हे जेव्हा प्रज्ञेने पहातो, तेव्हा दुक्खाची अवहेलना (समाप्ती) होते. हाच विशुद्धीचा मार्ग आहे.(६)


२७९.सर्व गुण, स्वभाव अनित्य आहेत, हे जेव्हा प्रज्ञेने पहातो, तेव्हा दुक्खाची अवहेलना (समाप्ती) होते, हाच विशुद्धीचा मार्ग आहे.(७)


२८०.उठण्याच्या वेळीही जो उठत नाही, तरुण, बलवान असुनही आळसावलेला असतो, मनातले सुसंकल्प आळसाने दडवतो, अशा आळशी माणवाला प्रज्ञामार्ग प्राप्त होत नाही.(८)


२८१.वाणीचे रक्षण करतो, मन संयमीत ठेवतो, शरीराने अयोग्य कृत्य करत नाही. (९)


२८२.असे या तीन इंद्रियांना कर्म मार्गावर शुद्ध ठेवतो, तोच श्रेष्ठजनांनी सांगीतलेला मार्ग प्रसन्न प्राप्त करतो,(१०)


२८३.अभ्यासाने प्रज्ञा उत्पन्न होते, अनाभ्यासाने प्रज्ञेची हानी होते. उत्पत्ती व विनाश या दोहोंची जाणीव ठेवुन तसे स्वतःला स्थापित केल्याने प्रज्ञेची वृद्धी होते.(११)


२८४.(तृष्णेला) जंगल तोडा, वृक्ष तोडु नका, जंगलाने (तृष्णेने) भय उत्पन्न होते. हे भिक्खुंनो! तृष्णेची जंगल झुडपे तोडुन तृष्णाहीन करा.(१२)


२८५.जोवर पुरुषाला असलेली स्त्रीची तृष्णा अणुमात्रही भेदलेली नाही, तोवर तो मनाने (स्त्रीशी) बद्ध असतो, जसे दुध पिणारे वासरु मातेशी!(१३)


२८६.शरद ऋतुत कमळ तोडावे तसा स्वतःचा स्नेह तोडावा, आणी सन्मार्गी गेलेल्याने (बुद्धाने) उपदेशीलेला निर्वाणाचा मार्ग जोडावा.(१४)


२८७.इथे वर्षात, इथे हेमंतात, ग्रीष्मात, वासकरेन असे अजाण मानव विचार करतात, मोहाचे विघ्न जाणीत नाहीत.(१५)


२८८.ना पुत्र, ना पिता, ना बंधु, तुमचे रक्षण करु शकतात, ना नातेवाईक जेव्हा मृत्यु तुम्हास गृहीत धरतो.(१६)


२८९.या अर्थाचा प्रभाव जाणुन शीलवंत, प्रज्ञावंतांनी निर्वाणाचा मार्ग त्वरीत शोधावा.(१७)








२१.पक्किणकवग्ग






२९०.सिमीत सुखाच्या त्यागाने जर सुखप्राप्ती दिसत असेल, तर त्या विद्वान मानवाने सीमीत सुख त्यागुन असीम सुखाकडे पहावे.(१)


२९१.दुसऱ्याला दुक्ख देवुन जो स्वतःचे सुख इच्छितो, शत्रुत्वसंकल्पातील अशा मानवाची शत्रुपासुन मुक्ती होत नाही.(२)


२९२.जे कर्तव्य आहे त्याचा अव्हेर करुन जे अकर्तव्य ते मनाने करतो, त्या अहंकारी प्रमादी मानवाचे चित्तविकार वाढतात.(३)


२९३.ज्याची शारीरी जागृकता, नित्य मंगलारंभी सदैव तत्पर असते, जे अकृत्य करत नाही, कृत्य ते सातत्याने करतात, त्या चेतन कार्यमग्न मानवाचे चित्तविकार विनाशाकडे जातात.(४)


२९४.माता (तृष्णा), पिता (अहंकार), दोन क्षत्रीय राजांचा (आत्मदृष्टी-उच्छेददृष्टी) वध करुन त्यांच्या अनुयायांसह राज्याच्या (अहंकार व तृष्णेसोबत येणाऱ्या चित्तविकाराचा) संहार करुन (ब्राह्मण) सुजन दुक्खविहीन होतो.(५)


२९५.माता (तृष्णा), पिता (अहंकार), दोन क्षत्रीय राजांचा (आत्मदृष्टी-उच्छेददृष्टी) वध करुन पाच व्याघ्रचर्म अच्छादने (ज्ञानाची पाच आवरणे) नष्ट करुन(ब्राह्मण) सुजन दुक्खविहीन होतो.(६)


२९६.त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य बुद्धांकडे जात असते.(७)


२९७.त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य धम्माकडे जात असते, (८)


२९८.त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य संघाकडे जात असते.(९)


२९९.त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य शरीराकडे जात असते.(१०)


३००.त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, जे रात्रौ दिवस नित्य मनःपुर्वक अहिंसेत मग्न असतात.(११)


३०१.त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, जे रात्रौ दिवस नित्य मनाच्या सद्भावनेत मग्न असतात.(१२)


३०२.प्रव्रज्जीत असणे दुष्कर, भोगात रहाणे दुष्कर, गृहस्थ घरी रहाणे दुक्खकर, अवागामात पडणे दुक्खकर, म्हणुन अवागमात पडु नये, दुक्खात पडु नये.(१३)


३०३.जो श्रद्धा व शीलाने संपन्न असतो, यश व संपत्तीचे समर्पन करतो, तो ज्या ज्या स्थानी जातो, तेथे तेथे पुजला जातो.(१४)


३०४.सत्पुरुष बर्फाच्छादित पर्वतासारखे दुरुनही प्रकाशीत असतात, असत्पुरुष रात्री फेकलेल्या बाणासारखे दिसत नाही.(१५)


३०५.एक आसनी, एक शैयी, न थकता एकटा रहाणारा, स्वतःचे एकट्याने संयमन करणारा, वनात रममाण असतो.(१६)








२२.निरयवग्ग






३०६.असत्य बोलणारे लोक नरकात जातात, दुष्कृत करुनही "न केले" असे सांगणारे सुद्धा, मरेपर्यंत सारखेच..(१)


३०७.भगवे वस्त्र घालणारे अनेक लोक जे दुर्गुणी, असंयमी आहेत, ते नरकात उत्पन्न होतात.(२)


३०८.अग्नी-ज्वालांसारखा तप्त लोह गोळा खाणे चांगले, शिलभ्रष्ट व असंयमी होऊन राष्ट्रांचे अन्न खाणे याहुन.(३)


३०९.परस्त्रीच्या संगतीत राहणाऱ्या पुरुषाच्या चार स्थीती होतात. अपुण्यलाभ, ठिक झोप न येणे, तिसरी निंदा व चौथी नरकवास.(४)


३१०.अपुण्यलाभ, दुर्गती, भयग्रस्ताची भयभीतेशी थोडीसीच रतिक्रीडा, राजाकडुन कठोर सजा होते, म्हणुन माणसाने परस्त्रीशी भोग करु नये.(५)


३११.गवताची पाती नीट न धरल्यास हाताला जखमी करतात, तसेच श्रामण्याचे नीट पालण न केल्यास ते माणवाला नरकात ढकलते. (६)


३१२.शिथीलपणे केलेले काहीही कार्य, मलीनपणे केलेले व्रत, सशंक ब्रह्मचर्या यांचे फलीत मोठे असत नाही.(७)


३१३.जे करायचे असेल ते दृढ पराक्रमाने करावे, शिथीलपणे प्रव्रज्या पाळणारा अधिक धुळ उडवतो.(८)


३१४.दुष्कृत्य न करणे चांगले, दुष्कृत्याने पश्चाताप होतो, सत्कृत्य करणे चांगले, असे केल्याने पश्चाताप होत नाही.(९)


३१५.जसे नगर आतुन, बाहेरुन संरक्षीत असते, तसे स्वतःला सुरक्षीत ठेवावे, क्षणभरही निसटु नये, क्षणभराच्या निसटल्या जाण्याने नरकात समर्पण होते.(१०)


३१६.लाज वाटु नये पण तेथे लाज वाटते पण लाजीरवाण्या कामात लाज वाटत नाही. अशी खोटी समजुत बाळगणारे दुर्गतीला जातात.(११)


३१७.भिती वाटु नये तिथे भितातपण भिती वाटावी तिथे भित नाही, अशी खोटी समजुत बाळगणारे दुर्गतीला जातात. (१२)


३१८.अवर्ज्य ते वर्ज्य मानतात पण वर्ज्य ते अवर्ज्य मानीत नाही, अशी खोटी समजुत बाळगणारे लोक दुर्गतीला जातात.(१३)


३१९.वर्ज्य ते वर्ज्य समजतात, अवर्ज्य ते अवर्ज्य,, अशी सम्यक दृष्टी बाळगणारे लोक सुगती प्राप्त करतात.(१४)








२३.नागवग्ग






३२०.जसे युद्धात धनुष्यातुन सुटलेल्या बाणांना सहन करतो, तसेच मी अपशब्द सहन करेन कारण जगात खुप दुर्जन आहेत. (१)


३२१.संयमीत हत्तीस परिषदेत नेतात, संयमीतावर राजा स्वार होतो, संयमीत मानव श्रेष्ठ आहे तो अपशब्द सहन करतो.(२)


३२२.संयमीत खेचर, चांगल्या प्रतिचा सिंधी घोडा श्रेष्ठ आहे, महानाग हत्ती तसेच स्व-स्वयंमीत मानव श्रेष्ठ आहे.(३)


३२३.या वाहनांनी (घोडा), न गेलेल्या दिवसाकडे (भविष्याकडे) जाता येत नाही. जसे स्वयं-सुसंयमीत मानव संयमामुळे भविष्याकडे जातो, (४)


३२४.धनपालक नावाचा हत्ती, तिक्ष्णतेला (अंकुश) रोखणारा कठीण असा, बंधनात असताना काहीही न खाता, हत्ती वनातल्या हत्तींना आठवत राहतो.(५)


३२५.मानव जेव्हा, आळशी, खादाडा, लोळत झोपणारा असा होतो, चारा खाऊन माजलेल्या डुकरासारखा सुस्तावलेला, तेव्हा तो पुन्हा गर्भात पडतो.(६)


३२६.या पुर्वी चित्त त्याच्या इच्छेने, जशी कामना असेल, तसे सुख वाटेल, तसे विहरले, आजपासुन मी निग्रहाने यथार्थ ठेवीन, हत्तीस अंकुशधारी ठेवतो (तत्सम).(७)


३२७.अप्रमादात रममाण होऊन स्व चित्ताचे रक्षण करावे, चिखलात रुतलेला हत्ती जसे स्वतःला वर काढतो, तसे स्वतःला कठीण मार्गातुन वर न्यावे.(८)


३२८.जर दक्ष, बुद्धीमान, चांगला मित्र लाभला तर सर्व विघ्नांवर मात करुन, प्रसन्न चित्ताने त्याच्या सोबत राहावे. (९)


३२९.जर दक्ष, बुद्धीमान, चांगला मित्र लाभला नाही, तर (एकटे रहावे) जसे मातङग राजा, पराजित राष्ट्र सोडुन एकटा अरण्यात रहातो.(१०)


३३०अज्ञानी मानवाची मैत्री करु नये (त्यापेक्षा) एकटे रहाणे चांगले, एकटे रहावे, दुष्कृत्य करु नये, अनासक्त मातंङग राजा हत्ती सारखे. (११)


३३१.गरज असेल तेव्हा मित्र सुखावह, या सर्वाहुन दुक्ख विनाश सुखावह.(१२)


३३२.जनात मातृसेवा सुखावह आणी पितृसेवा सुखावह,, जनात श्रमणत्व सुखावह आणी परमश्रेष्ठजीवन सुखावह. (१३)


३३३.वृद्धत्त्वापर्यंत शील सुखावह, स्थापित श्रद्ध सुखावह, प्रज्ञेची प्राप्ती सुखावह,, या सर्वाहुन दुष्कृत्य न करणे सुखावह..(१४)








२४.तण्हावग्ग






३३४.प्रमादी माणसाची तृष्णा आकाश-वेली सारखी वाढते, तो लोकालोकात उड्या मारीत राहतो, जसे फळाच्या इच्छेने वनातले वानर.(१)


३३५.हि निम्नतल विषारी तृष्णा ज्याला जिंकुन घेते त्याची दुक्खे पावसाळ्यातल्या बीरण गवतासम वाढतात.(२)


३३६.जो या निम्नतल, दुर्लाघ्य तृष्णेला जिंकुन घेतो, त्याचे शोक गळुन पडतात, जसे कमळावर पडलेले जलबिंदु.. (३)


३३७.इथे आलेल्या तुम्हा सर्वांना मंगल सांगतो, तृष्णेचे मुळ खणुन काढा 'खस' च्या अपेक्षेणे 'बीरण' खणुन काढावे तसे, त्याने भुलैया पुन्हा पुन्हा हानी करणार नाही, जसे पुर कळकीची करतो.(४)


३३८.जर मुळे इजाहीन व दृढ असतील, तोडलेला वृक्ष पुन्हा उगवतो, तसे तृष्णेची वृत्ती समुळ खणली नाही तोवर दुक्ख पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात.(५)


३३९.ज्याचे छत्तीस स्त्रोत अधिक मनासारखे असतात, त्या दु-दृष्टी मानवाचे संकल्प आसक्ति आश्रित होतात.(६)


३४०.सारे स्त्रोत वाहतात (तृष्णारुपी) वेल अंकुरीत होत रहाते.म्हणुन ती वेल उगवताना दिसताच, प्रज्ञेनी तिची मुळे कापावीत (७)


३४१.स्नेहरुपी नद्या प्राण्यांना प्रसन्न वाटतात, स्त्रोतासक्त सुखाचा वेध घेतात, आणी ते मानव जन्म-वार्धक्य-मृत्युत गुंततात. (८)


३४२.तृष्णेने पुरस्कृत जन, बांधलेल्या सशासारखे (तृष्णेभोवती) घोटाळत राह्तात. आसक्तीने बांधलेले मानव चिरकाल पुन्हा पुन्हा दुक्खाकडे जातात.(९)


३४३.तृष्णेने पुरस्कृत जन, बांधलेल्या सशासारखे (तृष्णेभोवती) घोटाळत राह्तात. म्हणुन वैराग्याची आकांक्षा असलेल्या भिक्खुने तृष्णेला दुर करावे. (१०)


३४४.जो निर्वाणार्थी, वनस्थ संकल्पी, तृष्णामुक्त होतो व पुन्हा तृष्णेकडे धावतो, असा व्यक्ती म्हणजे बंधनमुक्त होऊन पुन्हा बंधनाकडे धावणारा.(११)


३४५.या लोहाच्या, लाकडाच्या, दोराच्या बंधनाला ज्ञानीजन दृढ बंधन मानत नाही. माणकांच्या, कुंडलकांच्या, पुत्राच्या, स्त्रिच्या आसक्तित रमणे, हे दृढ बंधन.(१२)


३४६.या त्यागण्यास कठीण बंधनांना, ज्ञानी जन पतनोन्मुख शिथील मानतात ही बंधने तोडुन, कामसुख त्यागुन, अनपेक्षीत होऊन ते प्रव्रज्जीत होतात.(१३)


३४७.आसक्तीत रममाण होतात ते धारेत पडतात,जसे कोळी स्वतः केलेल्या जाळ्यात अडकतो. ही बंधने तोडुन सर्व दुक्ख त्यागुन, अनपेक्षीत होऊन ज्ञानीजन प्रव्रज्जीत होतात.(१४)


३४८.पुर्वी मुक्त, नंतर मुक्त, आता मुक्त होऊन भौतिकतेच्या पार हो, सर्व बाजुंनी मनाला मुक्त करणारे, जन्म, वृद्धत्व, मृत्युत पुन्हा येत नाही. (१५)


३४९.तर्क वितर्कात पडलेले, तीव्र आसक्त, फक्त शुभ पाहणारे या जीवांची... तृष्णा खुपच वाढते, ते वास्तवात बंधनांना दृढ करतात.(१६)


३५०.वितर्क शमविण्यात मग्न, जागृत राहुन सदा अशुभ पाहणारे, असे मानव वास्तवात तृष्णा नष्ट करतात. भुलैयाला छेदुन जातात. (१७)


३५१.निष्ठेप्रत पोचलेला, निर्भय, तृष्णाहीन, द्वेषहीन असा जो, भौतीक शल्यांचा उच्छेद करतो, हा त्याचा अंतीम समुच्चय होय. (१८)


३५२.जो तृष्णाहीन, परिग्रहहीन, भाषा काव्य पंडीत, अक्षरांचा मेळ व त्याचे पुर्व उत्तर क्रम जाणणारा आहे, तो मोठा प्रज्ञावान म्हणविला जातो, हे त्याचे अंतिम शरीर आहे.(१९)


३५३.मी सर्व विजयी, सर्व बुद्धी युक्त, सर्व स्वभाव अलिप्त, सर्व ज्ञानी तृष्णा क्षया मुळे मुक्त, स्वताला योग्य जाणणारा आहे, तर मी कोणाचा उद्देश करु?(२०)


३५४.धम्मदान सर्व दानांना जिंकतो, धम्मरस सर्व रसांना जिंकतो, धम्म रमण सर्व रमणांना जिंकतो, तृष्णा क्षय सर्व दुक्खांना जिंकतो, (२१)


३५५.विलास दुर्बुद्धाला नष्ट करतात, जर तो पार जाणे शोधत नाही, विलास तृष्णेने दुर्बुद्ध, दुसऱ्या सारखे स्वतःलाच नष्ट करतो.(२२)


३५६.शेताचा दोष गवत, या जनांचा दोष आसक्ती, म्हणुन अनासक्तास दिलेल्या दानाचे मोठे फळ होते.(२३)


३५७.शेताचा दोष गवत, या जनांचा दोष द्वेष, म्हणुन द्वेषहीनास दिलेल्या दानाचे मोठे फळ होते.(२४)


३५८.शेताचा दोष गवत, या जनांचा दोष मोह, म्हणुन निर्मोहास दिलेल्या दानांचे मोठे फळ होते.(२५)


३५९.शेताचा दोष गवत, या जनांचा दोष इच्छा, म्हणुन निरीच्छास दिलेल्या दानाचे मोठे फळ होते. (२६)








२५. भिक्खुवग्ग






३६०.चक्षुंचा संयम चांगला.. कानांचा संयम चांगला.. नाकाचा संयम चांगला.. जिभेचा संयम चांगला.. (१)


३६१.शरीराचा संयम चांगला.. वाचेचा संयम चांगला.. मनाचा संयम चांगला.. सर्वत्र संयम चांगला.. सर्वत्र संयमाने मनुष्य सर्व वेदनांचे उच्चाटन करतो.(२)


३६२.हात संयमीतो, पाय संयमीतो, वाचा संयमीतो, उत्तम संयमीतो, स्वतःत रममाण, एकटा मनन करतो, संतुष्ट राहतो तोच भिक्खु.(३)


३६३.जो वाणीने संयमीत, विचाराने बोलणारा, निअहंकारी, सिद्धांत-अर्थ प्रकाशतो त्याचे बोलणे मधुर असते. (४)


३६४.जो धम्म विहारतो, धम्मात रममाण असतो, धम्माचे चिंतन करतो, धम्माचे आचरण करतो, तो भिक्खु धम्माचा परिहार करत नाही.(५)


३६५.स्वलाभाची अवहेलना करु नये, इतरांच्या लाभाची इर्ष्या करु नये, इतरांच्या लाभाची इर्ष्या करणारा भिक्खु एकाग्रतेकडे जात नाही. (६)


३६६.अल्पलाभाने देखील जो भिक्खु स्वलाभाची अवहेलना करत नाही, त्या क्रियाशील बुद्धजीवी भिक्खुची श्रेष्ठजन प्रशंसा करतात.(७)


३६७.सर्व नाम-रुपात (भौतीक जगात), ज्याचा काहीच स्व-अर्थ नाही, काहीच नसतानाही जो चिंता करत नाही, त्याला भिक्खु म्हणतात.(८)


३६८.मैत्री भावाने विहार करणारा, बुद्ध उपदेशाने प्रसन्न होणारा, जीवन क्रियांचे शमन करुन, सुखरुप शांती पदाला जातो, (९)


३६९.भिक्खु! हि होडी रिकामी करा, रिकामी होडी त्वरीत पोहोचेल, आसक्ती आणी द्वेष तोडा, त्याने तुम्ही निर्वाणाप्रत पोचाल.(१०)


३७०.पाच तोडा ( स्वसंकल्पना, संशय, अंधविश्वास, वासनासक्ती, मिथ्याइच्छा) पाच सोडा (निराकार आसक्ती, अतिरेक, पश्चाताप, अज्ञान, अभिमान) पाचांचे उत्तम पालन करा (प्रज्ञा, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी), पाच पार करा (राग, द्वेष, मोह, अहंकार, मिथ्यादृष्टी).(११)


३७१.ध्यान ठेव भिक्खु,! भ्रमीत चित्त होणे, नको प्रमादात, नको कामगुणात, प्रमादात तप्त लोह गोळा गिळु नकोस, जळताना हे दुक्ख आहे असा आक्रोश तुला करावा लागु नये.(१२)


३७२.अप्रज्ञ मानवास चित्त एकाग्रता नाही, चित्त एकाग्रता नसेल तर प्रज्ञा नाही, ज्याच्याकडे चित्त एकाग्रता व प्रज्ञा आहे, तो निर्वाणा जवळ असतो.(१३)


३७३.शुन्यागारा एकांत-घरात प्रवेशणारा भिक्खु शांत चित्त होतो, सम्यक सम्यक सिद्धांत पाहणारा, लोकोत्तर आनंदीत होतो, (१४)


३७४.जसे जसे मानवाला स्कंधांची उत्पत्ती-विनाश आकलन होतो, तसे तसे त्याला प्रेम-प्रसन्नता आणी अमृताची जाण होते.(१५)


३७५.प्रज्ञावान भिक्खुने सर्वप्रथम हे केले पाहिजेत,,, इंद्रिय-संयम, संतुष्टी, भिक्खु नियमांचे संयमाचे पालन...(१६)


३७६.शुद्ध जीवीका असलेल्या, मंगलकारी, क्रियाशील, मित्राची संगत करावी, मैत्रीपुर्ण सेवा करणारा, कुशल आचार करणारा व्हावे, यातुनच अति आनंदीत होऊन दुक्खाचा अंत करावा. (१७)


३७७.जसे कळे कोमेजलेल्या फुलांना पाडुन टाकते, तसे आसक्ती व द्वेष यांचे उच्चाटन करावे, (१८)


३७८.जो कायेने शांत, वाचेने शांत, शांत एकाग्र चित्त, लौकीक अमिष त्यागलेला आहे, त्या भिक्खुला उपशांत म्हणतात. (१९)


३७९.जो स्वतःचे उदय स्वतः, स्वतःचे परिक्षण स्वतः करतो, तो आत्मसंयमी स्मृतीवान भिक्खु सुखात विहरतो, (२०)


३८०मानव स्वतःचा स्वामी आहे, स्वतः स्वतःची गती आहे. म्हणुन स्वतःच स्वतःला असे संयमीत ठेवा, जसे व्यापारी उमद्या घोड्याला.(२१)


३८१.जो भिक्खु आनंद चित्त आहे, बुद्धाच्या शिकवणीने प्रसन्न आहे, तो जिवनक्रीयांचे शमन करुन सुखरुप शांतीपदाला जातो,(२२)


३८२.जो सर्वस्वाचा त्याग करुन आपल्या तारुण्यात बुद्धाला शरण जातो, तो वादळातुन मुक्त झालेल्या चंद्राप्रमाने ह्या लोकांत प्रकाशमान होतो.(२३)


२६. ब्राह्मणवग्ग










३८३.हे ब्राह्मणा.! स्त्रोत तोडुन टाक, प्रयत्नाने कामना दुर कर, भौतीकतेचा क्षय करुन अकृताचा जाणकार हो, ब्राह्मणा!(१)


३८४.जेव्हा ब्राह्मण दोन स्वभाव (चित्त संयम व विपश्यना) गुणात पारंगत होतो, त्या ज्ञानीची सर्व बंधने विनाशाकडे जातात.(२)


३८५. ज्याचा पार, अपार, पारापार असत नाही. जो निर्भय आहे, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३)


३८६. जो ध्यानी, निर्मळ, कृतकृत्य, स्त्रोतहीन आहे ज्याने उत्तम अर्थ प्राप्त केला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. (४)


३८७. दिवसा सुर्य तळपतो, रात्री चंद्र प्रकाशतो, सशस्त्र क्षत्रीय तळपतो, ध्यानमग्न ब्राह्मण तळपतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवसरात्र तळपत असतात.(५)


३८८. ज्याचे दुष्कर्म वाहुन गेले आहेत तो ब्राह्मण, ज्याचे आचरण सम्यक आहे तो श्रमण, ज्याचे चित्त-दोष दुर सारले आहेत तो प्रवज्जीत म्हणवीला जातो.(६)


३८९. ब्राह्मणावर प्रहार करु नये, ब्राह्मणांनी त्याच्यावर कोपु नये. ब्राह्मणांची हत्या करणाऱ्याचा धिक्कार, त्यापेक्षा त्याच्यावर कोपणाऱ्याचा धिक्कार. (७)


३९०.मनाला प्रिय असलेल्याचा निषेध, हि गोष्ट ब्राह्मणाला कमी श्रेष्ठ नाही, जसे मन हिंसा निवृत्त होते, तस तसे दुक्खाचे शमन होते. (८)


३९१. ज्याच्या कायेने, वाचेने, मनाने दुष्कृत्य केलेले नाही, या तिन्ही ठिकाणी जो संयमीत आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(९)


३९२. सम्यक संबुद्धाने उपदेशीलेला सिद्धांत ज्याच्याकडुन जाणुन घेतला त्याला तसाच दक्षतेने नमस्कार करावा. (१०)


३९३. ना जटेने, ना गोत्राने, जन्माने ब्राह्मण होत. ज्याच्यात सत्यता, सदाचार, शुचिता असतो तो ब्राह्मण. (११)


३९४. हे दुर्बुद्ध मानवा! या जटा कशाला? हे व्यघ्र वस्त्र कशाला? तु आतुन मळलेला आहेस. आणी बाहेरुन धुतो(गंगास्नान) आहेस.(१२)


३९५. जो चिंध्या धारण केलेला जीव, ज्याच्या धमन्या दिसत आहेत, एकटा वनात ध्यानस्थ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. (१३)


३९६. ब्राह्मण मातेच्या योनीतुन उत्त्पन्न झालेला आहे त्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. त्याला भो(सन्माननीय संबोध) सबोधतात. जो काहीही बाळगुण नाही काहीही घेत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(१४)


३९७. सर्व बंधने तोडुन ज्याला चिंता वाटत नाही, ज्याने सर्व संगती विभक्त केले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(१५)


३९८. दोऱ्या, पट्टे, साखळ्या तोडुन (गाडी जुंपतात ते) जु झिडकारुन जो बाधारहीत होऊन बुद्ध होतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(१६)


३९९. शिव्या, दण्ड, बंधन यांना जो अदृष्टपणे (चांगुलपणाने) सहन करतो, क्षमा शक्ती हीच ज्याची प्रबळ सेना आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(१७)


४००. जो अक्रोधी, शिलवान, स्वल्प, जो संयमीत, अंतीम-शरीरी आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(१८)


४०१. कमळ पानावर जलबिंदु, वा सुईच्या टोकावर मोहोरी, तसा कामनांशी जो चिकटुन राहात नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(१९)


४०२. जो आपल्या दुःखाचा क्षय इथेच स्पष्ट जाणतो, जो भारमुक्त, बंधमुक्त आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.(२०)


४०३. जो गंभीर प्रज्ञ, सुजाण, मार्ग- अमार्गाचा सुज्ञ आहे ज्याला उत्तम अर्थ प्राप्त झालेला आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.(२१)


४०४.जो गृहस्थ, गृहहीन दोघांपासुन अलिप्त आहे, जो घरापासुन दुर निरिच्छ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(२२)


४०५. जो चर अचर प्राण्यांना दंडापासुन अलिप्त असतो, जो ना मारतो ना घात करतो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.(२३)


४०६. विरोधकात अविरोधी, दण्डधारींमध्ये शांत, ग्रहणकर्त्यात अग्रहणकारी, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(२४)


४०७. ज्याच्या चित्तातुन, मोह, द्वेष, मान, अहंकार, मत्सर निखळला आहे, जसे सुईच्या टोकावरुन मोहोरी निखळावी, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.(२५)


४०८.जो अप्रिय न बोलता, सत्य वचन बोलतो, ज्याच्या बोलण्याने कोणीही क्रोधीत होत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(२६)


४०९. लांब वा आखुड, लहान वा मोठी, चांगली वा वाईट, जी जोवर कुणी दिलेली नाही, तोवर घेत नाही. (चोरी करत नाही) त्याला मी ब्राह्मण म्हणतो. (२७)


४१०. ज्याला कुठेही कसलीच आशा असत नाही, जो निरिच्छ, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(२८)


४११. ज्याच्या मनात इतरांचा संशयाने काहीही निमीत्य असत नाही, ज्याला अगाध अमृताची प्राप्ती झाली आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(२९)


४१२. ज्याचे सत्कर्म व दुष्कर्म दोहोंच्या इच्छा पार केल्या आहेत. जो शुद्ध व शोकरहीत आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३०)


४१३. जो चंद्रासारखा निर्मळ, स्वच्छ मनाचा आहे. ज्याचा मोह-भाव अतिक्षीण झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३१)


४१४. ज्याने हा धोकादायक दुर्गम संसार-मोह ओलांडला आहे. ध्यानधारणेत उत्तीर्ण. तृष्णेचा पार गेलेला नि:संशयी ज्याच्या निवृत्तीला कारण नाही. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३२)


४१५. जो वासनांचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा वासना भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३३)


४१६.जो तृष्णाचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा तृष्णा भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३४)


४१७.ज्याने मानवी संबंध सोडले आहेत, जो दिव्य संबंधांच्या पार गेलेला आहे, जो सर्व संबंधांपासुन परावृत्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३५)


४१८. जो प्रीती आणी अप्रीती सोडुन शांत भावप्राप्त क्लेशहीन आहे. ज्या विराने सर्व लोकांना जिंकले त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३६)


४१९. जो सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती आणी अंत जाणतो, जो अनासक्त सन्मार्गावर आहे, सुज्ञानी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३७)


४२०.ज्याची गती देव, गंधर्व, मानव कुणीही जाणत नाही, ज्याचे स्त्रोत क्षीण झाले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(३८)


४२१. ज्याचे पुर्वी, आता, पुढेही काहीच नाही, जो काहीही बाळगुन नाही, काहीही घेत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो,(३९)


४२२. जो प्रज्ञावंत आहे, ज्याला निर्वान पद प्राप्त झाले आहे. जो वृषभ, श्रेष्ठ, वीर, महर्षी, विजेता, तृष्णाहीन आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो. (४०)


४२३.जो पुर्व स्थान जाणतो, स्वर्ग व नरक पहातो, ज्याचे जीवन क्षीण झाके आहे, जो प्रज्ञावान मननी आहे, जो निर्वाण प्राप्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.(४१)


११ टिप्पण्या:

  1. ज्याच्या ठायी पुर्वी अनास्था होती तो आता अस्था दाखवु लागतो; आपले पुर्वजीवन जो सद्गुणांनी झाकुन टाकतो आणी आपल्या तारुण्यात बुद्धाला शरण जातो तो वादळातुन मुक्त झालेल्या चंद्राप्रमाने सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो.....

    उत्तर द्याहटवा
  2. पियुष मित्रा तुझे मनपुर्वक आभार....

    उत्तर द्याहटवा
  3. मन:पुर्वक आभार....

    From,
    Ekach Saheb Baba Saheb Vicharmanch..!(Bhimachi Lekare)
    Khar-West .Mumbai

    उत्तर द्याहटवा
  4. नमोबुद्धाय जयभीम जय भारत

    उत्तम लेख आहे

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान विवेचन आहे. बुद्धाच्या मार्गाने सर्वांचे कल्याणच होते...

    उत्तर द्याहटवा
  6. खुप छान प्रयत्न आहे. Repeat झालेले काढून घ्यावे

    उत्तर द्याहटवा